Thursday, February 28, 2008

दही-टिंकी! :)

मी पुण्याला राहायला आल्यावर आई अलिबागला राहायला निघुन गेली. मला कंटाळुन नाही राव, पण आता आम्ही दोघी बहिणी एकट्या (?) राहु शकतो म्हणुन!
त्यामुळे आता स्वयपाकघरावर आमचंच राज्य आलं! (स्वयपाक मधल्या य वरचा अनुस्वार माझ्या डोक्यात जातो, म्हणुन लिहिला नाहिये... हा शब्द स्वयपाकच वाचावा, स्वयंपाक नाही!)
आता आम्ही तिथे हवं ते करायला लागलो, हवं ते म्हणजे काहीच्या काही पदार्थ बनवायला लागलो! नेहेमीचा टाईमपास म्हणजे घरातलं उपलब्ध सामान बघायचं, ते गुगलमध्ये टाईपायचं १०१ रेसिपी हजर होतात. त्यातली interesting वाटेल ती रेसिपी करायची! आम्ही तिबेटियन मोमो करुन पाहिले, गाजराचं सॅण्डविच केलं, कोबीचा पुलाव केला, १-२ प्रकारचे पास्ते केले.. आणि बरचं काहि अजुन विचित्र!!!!
आणि हे सगळं करताना ना आम्ही असं मानतो कि आपण कोणत्यातरी कुकरी-शो वर आहोत आणि मग एखाद्या काल्पनिक कॅमे-याकडे बघुन पदार्थ बनवतो. with our special comments! (आत्ता हे लिहिताना realise होतयं कि आम्ही जरा जास्तचं विचीत्र आहोत :) )

आज मात्र जरा वेगळा दिवस होता! दिपीकाला अचानक दहिवडे खावेसे वाटले. नेटवर रेसिपी पाहणार होतो पण म्हंटलं instant पिठं मिळतात ना... करु त्याचेच! एका नामांकित कंपनीचं instant दहिवडा पीठ आणलं. कंपनीचं नाव सांगत नाहीये कारण १) आम्ही केलेली रेसिपी त्यांना अभिप्रेत नाहीये. आणि २) त्या कंपनीकडुन मला पैसे मिळाले नाहीयेत त्यांची पब्लिसिटी करायला (अजुन तरि) :)
so आता आजचा पदार्थ (नाही, रोज रेसिप्या नाही लिहिणारे इथे)
आज दहिवड्याचा बेत होता पण माझी बहिण इतकी धसमुसळी आहे की बदाक्कन पाणी घातलं त्या पिठात! आता जे सेमि-लिक्विड होयला हवं होतं ते मस्त पाणी-पाणी झालं. पण दही तर आता मस्त चाट मसाला, तिखट, मीठ वगैरे घालुन फेटलं होतं. मस्त चव लागत होती! मग आता काय करावं ह्या विचारात होतो... त्या पीठात रवा घातला, सोडा घातला तरी काही जास्त फरक पडेना! मग जरा डोकं लढवलं... असं पीठ उत्तप्प्यांच असतं, म्हंटलं उत्तप्पे घालावे अन दह्यासोबत खावे! पण मज्जा येत नव्हती... मग बहिणीनं तिचं डोकं लावलं, लावायलाचं हवं होतं तिनेच घोळ केला होता ना! फ़्रायपॅन वर उत्तप्प्याप्रमाणे छोटे छोटे गोल बनवले (आणि त्या गोलांचं नामकरण केलं "टिंक्या" )

(माफ करा, डेकोरेट वगैरे करता येत नाही मला! पण प्रयत्न केला.. फोटु काढायचा होता ना!!)

आणि मग हा पदार्थ दह्यासोबत खाल्ला. खायचे भरपुर प्रकार आहेत. एक तर दह्यात बुडवुन खा! त्यावर दहि-कांदा घालुन खा! चिंगु चटणी (चिंच-गुळाची चटणी) वगैरे वगैरे... ते तुमच्या आवडिवर आहे.आणि ह्या पदार्थाचा plus point म्हणजे चवीला ब-यापैकी दहिवड्यासारखं आणि विदाउट तेल! कुठेतरी "ताईचा सल्ला: तव्यावर कांदा घासावा म्हणजे पिठ तव्याला चिकटत नाही " हे वाचलं होतं आणि it works! :). त्यामुळे आज तेल न वापरता हा प्रकार केला!

उत्तर आणि दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक अनोखा मेळ ह्या पदार्थाद्वारे आम्ही घडवला! (टाळ्या...)
मी sollidd पकवत्ये ना? (श्लेष लक्षात घ्यावा!)

तर हा पदार्थ तुम्ही घरी करुन बघा, आणि आम्हाला नक्की कळवा कसा झाला ते! तुमच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत... तो पर्यन्त "मस्त खा आणि स्वस्थ रहा" :D


p.s. हा पदार्थ केलाच तर जेव्हा टिंक्या तव्यावर घालाल तेन्व्हा mobileवर बोलणे टाळा नाहीतर...19 comments:

सर्किट said...

-- दिपीकाला अचानक दहिवडे खावेसे वाटले --

yacha artha dipika nakkich premaat paDaleli nahiye. becoz, they say, "agar koi laDaki dahi-vaDa khanese inkaar karr de, to 2 baate ho sakti hai. ek, yaa to woh laDki se laDka bann rahi hai, yaa fir use kisise pyaar ho gaya hai."

(reference : GolMaal (old) )

ghe, mi pan pakavu shakto!! :p

Abhijit Bathe said...

सही बनलेत दहिवडे! :))

कोहम said...

Taicha salla lakshant thevala pahije. Tinke masta zalet....

स्नेहा said...

aee mala pan khayache...
pan tumhi banavalele....

Monsieur K said...

punha kadhi karat aahes?
aadhich saang, mhanje mag mi yeto khaaylaa :D

निनाद said...

पाणी सुटलय तोंडाला हे पाहून...

Jaswandi said...

circuit, ashakya ahes! :D

abhijit, dahivade nahi ho dahi-tinki :)

yeah sometimes "sallawali tai" rocks! thanx koham :)

sneha ani ketan, u r most welcome! kadhi yetay sanga. tinke banvin tumchyasathi!

thanx ninad, tumhalahi amantran ahe!

Prajakta said...

Ayya! Adhi dahivade bighadavaychi kruti neet samjavun sang ki :)Tyashivay kase karta yetil "tinke" haha

Jaswandi said...

aga muliicchh kathin nasta... andajane instant dahivada pithat jast pani ghhal ani todasa rava ani thodasa soda (andajane chukichya) :P
ani mag te ghal tavyavar.. layi soppay!

Veerendra said...

baap re .. tu tar pakki khawayya distes !
kay lihites tu ani last chi line mhanje great ch .. mala kadhi bolawtes ase prayog khayla ? :P

Nandan said...

sahi :). garaj hee shodhachi janani asate tyacha proof :)

Abhi said...

फोटो बघून पाणी सुटलंय तोंडाला.. बायकोला सांगून करुन बघितलं पाहिजे एकदा :P

दीपिका said...

" dhasmusali" hya shabdala fakt majha virodh aahe! :P
great! mast lihilays!

Yogesh Damle said...

व्वा!! तुझा नवरा तुझ्या प्रयोगांवर इतका खुष होईल की वडाच्या झाडाला मांझा गुंडाळेल (साधा धागा नाही!!)... बळकट दोरी- इति.

:) Well, पण खरंच, तोंडाला मस्स्स्स्तपैकी पाणी सुटलंय, माझा कीबोर्ड भिजायच्या आधी बंद करतो. :D

rayshma said...

yummm!!! :)

Jaswandi said...

veerendra, ye ki kadhihi!

nandan :) :)

abhi, nakki karun bagha!

dipika, asa ka?

yogesh, bass ka? ekdam ati haan! :)

thanx rayshma! :)

Meghana Bhuskute said...

503$
हेहेहे! धमाल आहे.. मी कुठे उलथले होते हे लिहिलं होतं तेव्हा... हाहाहा! मस्त आहे!

Jaswandi said...

:) thanx meghana!

Deep said...

hmmmm hehe mi aani minu (mazee bahin) lahan astaanaa asaach कुकरी-शो karaaycho :D pan aataa mostly tich karte an kadhee taree mala try karayla mhnje khaayla dete!

माझी बहिण इतकी धसमुसळी आहे की बदाक्कन पाणी घातलं त्या पिठात>> hahahahahahaha baddkan ha shbd tu kasa mhnsheel hyaacha andaaj aalaa! :D

हा पदार्थ तुम्ही घरी करुन बघा>> baghitla an saangto vaadyaancha bet cancel kela aani saral dose type tatsam padarth kela! phaar vait zaala hota to mhnun aajwar he kunalaCH sangitl naahi :P