Tuesday, February 5, 2008

सुरणाची भाजी

जगात अप्रतिम सुरणाची भाजी फक्त आणि फक्त माझी आजीच करु शकायची!
मला आठवतं एकदा अश्विनीने मला विचारलं होतं की "तुझ्यामते स्वर्ग म्हणजे काय?"
मी लगेच उत्तर दिलं होतं..."स्वर्ग आपल्या हिमालया सारखा दिसत असेल, मस्त background music असेल, सगळे हसरे आणि त्यामुळे सुंदर दिसणारे चेहरे असतिल आणि महत्वाचं म्हणजे आज्जीच्या हातचं जेवण असेल"

माझी आज्जी, आज्जुकली, एन्चिकुन्चिपुन्चि (नाही ही भाषा कुठली हे मला ही माहित नाहिये :) ) जगातली उत्तम सुगरण होती. (असं सगळ्यांना त्यान्च्या आज्जीबद्दल वाटत असेल. माझी हरकत नाही! कारण तुम्हाला माझ्या आज्जीच्या हातची चव चाखायला मिळाली नाही ना!!)

मी खायला लागल्यापासुनच आज्जीच्या हातच्या प्रत्येक पदार्थाची फॅन आहे. तेंव्हा तर फॅन हा शब्द पण माहित नव्हता! तिने केलेला भात.. म्हणजे नुस्ता भातसुद्धा चविष्ट असायचा! (ह्यात कुठलीही अतिशयोक्ति नाहिये राव), मग त्यात तिने कालवलेला तुप-मीठ-कैरिचं लोणचं-भात म्हणजे आह्ह्ह!!! काय यार सगळि पंचपक्वान्नं गेली तेल लावत अश्या भातापुढे!! मी १२वित असेपर्यंत तिच्याकडुनच भात कालवुन घ्यायचे जेंव्हा ती असायची, नंतर काय ती दुष्ट बाई आम्हाला सोडुनच गेली... ए आज्जे अजुन माझा राग कमी झालेला नाहीये... तु चिंच-गुळाची आमटी बनवुन देईपर्यंत तरी कमी होणार नाही आहे. ताक-भात आणि त्यावर चिंच-गुळाची typical कोकणस्थी आमटी! माझ्या आईला सुद्धा नाही जमत. मला कळत नाही सगळ्या आज्या, आयांना स्वयपाक करायला नीट का शिकवत नाहीत? आज्जी आईपेक्षा १०पट उत्तम स्वयपाक करायची!

मला भात देताना भाताची विहिर करुन त्यात आमटी घालुन द्यायची आज्जी! तिने केलेले आमटितले गोळेही मस्त असायचे! मी त्याला आमटीतले बटाटे म्हणायचे... आज्जी आमच्याकडे आली किन्वा मी आज्जीकडे गेले की हा मेन्यु ठरलेला असायचा! ती स्वत: मात्र पोळी कुस्करुन त्यावर आमटी घेउन खायची, ते combo पण सही लागतं!

तिची अजुन एक speciality होती ती म्हणजे "उकड", हा पण बहुतेक कोकणस्थीच पदार्थ आहे. चाच-पोहे खावे तर तिच्याच हातचे! वाटाण्याची उसळ, उपमा, शेकटाच्या शेंगांची भाजी... अजुन अशि कित्ती कित्ती नावं सांगु! अहो ती बाई , कोबीची भाजी सुद्धा मिटक्या मारत खावी अशी करायची.

गोड पदार्थांमध्ये सुकेळी, गुळ्पापडीच्या वड्या specialch!

फक्त नेहेमीचे पदार्थच नाही पण तिच्या भाषेत ’मॉड-र्र-न’ पदार्थपण ती छान करायची! रगडा-पॅटिस, पाव-भाजी, पाणी-पुरी..एक्दम झक्कास! ती स्वतः खव्वय्येगिरीत expert होती, आधीच्या पिढीतली असुन बाहेरच्या पदार्थांशी तिचं काहीही वाकडं नव्ह्तं. वडापाव, चाट, क.दा तिचे फेवरेट होते.

म्हणुन कदाचित आम्ही नाही म्हणत असुन जायच्या आदल्या दिवशी प्रबोधिनीच्या इथली दाबेली खावुन घेतली... बाकी सगळ्यांना अतृप्त ठेवुन स्वतं तृप्त हॊउन गेली! देव नक्किच जाडा झाला असणारे वरती!

(आज तिची आठवण येउन मी सुरणाची भाजी केली, सुरण खाजरा निघाल्यामुळे २ घासांपेक्षा जास्त नाही खाउ शकले. आज्जी इतकी मस्त भाजी कशी करायची काय महित? .. तर म्हणुन नाव - सुरणाची भाजी :) )

8 comments:

Monsieur K said...

apratim :)
ho, majhi ajji pan "world's best cook" aahe - tu ajun tichya haat ch jevli naahiyes na, mhanun u cant compare it with your own ajji ;-)

mala majhya ajji chya haat chya badaamachya shiryaa chi aathvan jhaali :D

aata tilaa saangto majhya karta karaayla :)

सर्किट said...

सही! आजीची आठवणही झाली, आणि कडकडून भूकही लागली सकाळी सकाळी, हे वर्णन ऐकून!

rayshma said...

i've never had d pleasure of being pampered by my aaji :( and every now & then i feel rather weird to hear someone talk so fondly of their grandparents... not that i miss mine... just that i wish i did...
nice post :)

स्नेहा said...

mala pan majhya aajichi aathavan yetey... :(
aani kaal mhanalya pramane jagatalya bahutek ajjya goad asataat....

तुमचा आनंद said...

माझी आजी...वडीलांची आई..
नाही माहीत तिच्या हातचे जेवण कसे लागत होते... कारण माझी आईच तिच्यासाठि जेवण बनवायची...
;)
पण माझ्या आईची आई....
बास्स्स्स जेवण म्हणजे काय... अग तिच्या हातचा कांदा पण टेस्टि लागतो....
जमलच तर माझ्या आजोळी पुण्याला ये... मस्त पैकि (आळान भाकरी) बेसण भाकरी खाउन बघ...

...बस्स्स्स ती शेतातली थंड हवा... ते गार गार पाणी आणि बेसण भाकर... वा...

मी चाल्लो गावाला... राम राम...

Veerendra said...

sahich baraka ..
yaala mhanatat thet hrudayala haat ghalana !

Jaswandi said...

ketan, nahi bolaychach nahi!
pan ata mhanatos ahes tar aadhi badaamacha shira taste karuyat.. tarihi majjhi aajjich best! pan taste karayla harakat nahi :)

thanx circuit!

i know rayshma, ajji-ajoba asna kiti mast asta he atta tyana miss kartana jast janavayla laglay!

right sneha! ajjya goad astaat!

thanx anand for comment :)

thanx veerendra!

Prajakta said...

Faarch Chhan! Of course tujhya ani majhya ajji madhe apan competition lavayla pahije, karan mala pan agdi assach vatta ki ajji cha swayampak mhanje the best! :)