Thursday, February 28, 2008

दही-टिंकी! :)

मी पुण्याला राहायला आल्यावर आई अलिबागला राहायला निघुन गेली. मला कंटाळुन नाही राव, पण आता आम्ही दोघी बहिणी एकट्या (?) राहु शकतो म्हणुन!
त्यामुळे आता स्वयपाकघरावर आमचंच राज्य आलं! (स्वयपाक मधल्या य वरचा अनुस्वार माझ्या डोक्यात जातो, म्हणुन लिहिला नाहिये... हा शब्द स्वयपाकच वाचावा, स्वयंपाक नाही!)
आता आम्ही तिथे हवं ते करायला लागलो, हवं ते म्हणजे काहीच्या काही पदार्थ बनवायला लागलो! नेहेमीचा टाईमपास म्हणजे घरातलं उपलब्ध सामान बघायचं, ते गुगलमध्ये टाईपायचं १०१ रेसिपी हजर होतात. त्यातली interesting वाटेल ती रेसिपी करायची! आम्ही तिबेटियन मोमो करुन पाहिले, गाजराचं सॅण्डविच केलं, कोबीचा पुलाव केला, १-२ प्रकारचे पास्ते केले.. आणि बरचं काहि अजुन विचित्र!!!!
आणि हे सगळं करताना ना आम्ही असं मानतो कि आपण कोणत्यातरी कुकरी-शो वर आहोत आणि मग एखाद्या काल्पनिक कॅमे-याकडे बघुन पदार्थ बनवतो. with our special comments! (आत्ता हे लिहिताना realise होतयं कि आम्ही जरा जास्तचं विचीत्र आहोत :) )

आज मात्र जरा वेगळा दिवस होता! दिपीकाला अचानक दहिवडे खावेसे वाटले. नेटवर रेसिपी पाहणार होतो पण म्हंटलं instant पिठं मिळतात ना... करु त्याचेच! एका नामांकित कंपनीचं instant दहिवडा पीठ आणलं. कंपनीचं नाव सांगत नाहीये कारण १) आम्ही केलेली रेसिपी त्यांना अभिप्रेत नाहीये. आणि २) त्या कंपनीकडुन मला पैसे मिळाले नाहीयेत त्यांची पब्लिसिटी करायला (अजुन तरि) :)
so आता आजचा पदार्थ (नाही, रोज रेसिप्या नाही लिहिणारे इथे)
आज दहिवड्याचा बेत होता पण माझी बहिण इतकी धसमुसळी आहे की बदाक्कन पाणी घातलं त्या पिठात! आता जे सेमि-लिक्विड होयला हवं होतं ते मस्त पाणी-पाणी झालं. पण दही तर आता मस्त चाट मसाला, तिखट, मीठ वगैरे घालुन फेटलं होतं. मस्त चव लागत होती! मग आता काय करावं ह्या विचारात होतो... त्या पीठात रवा घातला, सोडा घातला तरी काही जास्त फरक पडेना! मग जरा डोकं लढवलं... असं पीठ उत्तप्प्यांच असतं, म्हंटलं उत्तप्पे घालावे अन दह्यासोबत खावे! पण मज्जा येत नव्हती... मग बहिणीनं तिचं डोकं लावलं, लावायलाचं हवं होतं तिनेच घोळ केला होता ना! फ़्रायपॅन वर उत्तप्प्याप्रमाणे छोटे छोटे गोल बनवले (आणि त्या गोलांचं नामकरण केलं "टिंक्या" )

(माफ करा, डेकोरेट वगैरे करता येत नाही मला! पण प्रयत्न केला.. फोटु काढायचा होता ना!!)

आणि मग हा पदार्थ दह्यासोबत खाल्ला. खायचे भरपुर प्रकार आहेत. एक तर दह्यात बुडवुन खा! त्यावर दहि-कांदा घालुन खा! चिंगु चटणी (चिंच-गुळाची चटणी) वगैरे वगैरे... ते तुमच्या आवडिवर आहे.आणि ह्या पदार्थाचा plus point म्हणजे चवीला ब-यापैकी दहिवड्यासारखं आणि विदाउट तेल! कुठेतरी "ताईचा सल्ला: तव्यावर कांदा घासावा म्हणजे पिठ तव्याला चिकटत नाही " हे वाचलं होतं आणि it works! :). त्यामुळे आज तेल न वापरता हा प्रकार केला!

उत्तर आणि दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक अनोखा मेळ ह्या पदार्थाद्वारे आम्ही घडवला! (टाळ्या...)
मी sollidd पकवत्ये ना? (श्लेष लक्षात घ्यावा!)

तर हा पदार्थ तुम्ही घरी करुन बघा, आणि आम्हाला नक्की कळवा कसा झाला ते! तुमच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत... तो पर्यन्त "मस्त खा आणि स्वस्थ रहा" :D


p.s. हा पदार्थ केलाच तर जेव्हा टिंक्या तव्यावर घालाल तेन्व्हा mobileवर बोलणे टाळा नाहीतर...Friday, February 22, 2008

हमार टुनटुनवा!!

साधारण ४ वर्षापुर्वीची गोष्ट, मी आणि कामना BMMच्या प्रवेशपरीक्षेसाठी (entrance test) मुंबईला जात होतो! बसमधे बाजुला बसलेला एक मुलगा सतत त्याचा mobile वाजवत होता. आम्ही दोघी पक्क्या "अलिबागकर" त्यामुळे... "कशाला लागतात mobile ह्या वयात? चैन आहे नुस्ती" वगैरे वगैरे बोलत होतो. मुंबई क्या चीज है? हे अजुन कळलं नव्हतं तोपर्यन्त! entrance testला पण "आजची तरुणपिढी"छाप विषय होता, आता नक्की आठवत नाही. पण आम्ही दोघींनीही कॉलेजातल्या मुलांना mobileसारख्या वस्तुचं व्यसन लागतयं वगैरे लिहिलं होतं. परिक्षेला आलेल्या बाकी "मुंबईकरांकडॆ" ..काय style मारताय्त भावाने आम्ही बघत होतो.झालं, दोघीही तिथे select झालो, अलिबाग सोडुन मुंबैत रहायला आलो. आता आमच्या वर्गात बर्याच लोकांकडे mobile होता. group-project वगैरे असेल तर आमचे वांदे होयला लागले, आम्हाला मेसेज मिळायचेच नाही... मग लक्षात आलं की mobile ईथे चैन नाही already गरज बनला आहे.

मग "बाबा mobile असणं किती गरजेचं आहे" हे बाबांना पटवायला काही दिवस गेले. आणि मग २५ डिसेम्बर २००४ला मला mobile मिळाला... तेसुद्धा surprise बरं का? दिपीकाने हातात box ठेवला... "बघ बघ काय आहे"...boxच्या आकारावरुन तो mobile आहे हे लक्षात आलं होतं... मी खुश होते! रॅपर फाडलं, आता mobileचा खोका दिसायला लागला, आणि मला हसावं की रडावं कळेना... आनंद होत होता.. कारण mobile मिळाला होता... पण नोकिआ ३३१५? :।FM नाही, कॅमेरा नाही.. काहीचं नाही... साधेस्ट मॉडेल! मला थोडा राग पण आला होता... पण मग म्हंटलं ठीक आहे. त्याच्याबरोबर airtelचं सिम फ़्री होतं :)... मग दुस-या दिवशी वर्गात "तेजु तेरा mobile दिखा ना" असं १०वेळा ऐकल्यावर mobile बाहेर काढला. "यार ठिक है, atleast अभी contactme तो रहोगी" ... "३३१५ बहोत स्टर्डी मॉडेल है रे" असे sympathyवाले टोमणे मला कळत होते. मला माझा Mobile खरचं आवडत नव्हता! मी तो बाहेर कोणासमोर काढायचे नाही. पण मग हळु-हळु त्याबद्दल थोडा आपलेपणा वाटायला लागला...यार, कसाही का असेना, आता आपला आहे! माझा स्वतःचा आहे!

मग त्याच्याबरोबर (३३१५बरोबर) Love-hate relationship सुरु झालं. i used to hate it पण मला हवाही होता... मग मला कोणि त्याच्यावरुन चिडवलं की मीसुद्धा माझा आवाज चढवायचे "माझा mobile हा real mobile आहे! तुमच्या मोबईलसारखा मुळूमुळू आवाज नाहिये, आख्या bldg.ला ऐकु जाईल असा दणदणित आवाज आहे. आणि ३-४ मजल्यावरुन खाली टाकलात तरिही काही होणार नाहीये माझ्या पठ्ठ्याला! तुमच्यासारखा delicate darling नक्किच नाहिये! हा.. बोलायचं कामचं नाही! फोटो काढायला digi-cam आहे माझ्याकडे आणि मी स्वतः गाते, मला FM नकोय (शेवटचं argument फक्त for sake of an argument होतं :P) खरं सांगु तर ही सगळि कारणं बाबांनी मला दिली होती जेन्व्हा मी त्यांना मोबाईल बदलुन मागितला होता!

कायम वाटतं हा जिवंत असता तरं? आईचा कॉल आल्यावर मी थिएटरमधे असुन लायब्ररीत आहे सांगताना त्याने मला डोळा मारला असता! पलिकडच्या व्यक्तिला smart उत्तर देताना माझ्याकडे बघुन smart smile दिलं असतं! मग मी कधी लाजल्यावर हा पण लाजला असता! मला चिडवलं असतं... मी रडताना पाठीवरुन हात फिरवला असता! मी भांडताना मला शांत केलं असतं!

तो इतक्यांदा पडला, पण कधिही तक्रार नाही केली! मी त्याला इतक्या शिव्या दिल्या पण सतत माझ्याबरोबरच होता.. मी एकटि असताना फक्त तोच तर होता माझा आधार! मी हसले, रड्ले, लाजले, भांडले... सगळं ह्याच्याच साक्षीने! माझा गुंडु mobile! मी कायम मजेत म्हणायचे "ईट का जवाब ३३१५से" :)

परवा त्याला धक्का लागुन तो पडला... ह्यावेळि दमला होता बहुतेक... त्याच्या चेहेर्याला लागलं.. तुमच्या भाषेत त्याची screen तुटली.. पण तरिही रडला नाही.. अजुनही माझ्याबरोबर आहे. आणि कायम माझ्याबरोबर राहिल! आता मोठा झालाय, थोड्या कुरबुरी करतो.. पण माझा तेवढा गुण नाही पण वाण लागणारचं ना त्याला! कोणितरी त्यादिवशी म्हणालं "असल्या निर्जीव गोष्टीत काय जिव गुंतवायचा? बदल तो मोबाईल आता" नाही यार नाही जमणार.. मला ह्याने कायम साथ दिलिये.. ह्याच्या शेवट्च्या श्वासापर्यन्त मी त्याला साथ देणारे.. तो फक्त माझाच राहिल!

Saturday, February 16, 2008

My Dream House! :)

मी ज्या शाळेत शिकायला जाते मुलांकडुन तिथे ह्या आठवड्यात आम्ही त्यांना त्यांचं dream house काढायला सांगितलं होतं! मुलांनी इतकी भन्नाट घरं काढली...


मी तर बघतचं बसले होते. चॉकलेटांचं घर, पाण्यातलं घर, हिरेजडित घर आणि अशी ब-याच प्रकारची घरं मुलांनी काढली! मी माझ्या तुट्पुंज्या शब्दात काय सांगु? फोटोच बघा!


हे candy ने बनलेलं घर आहे, ज्याचं छत आइस्क्रिमनी बनलेलं आहे. आणि बाजुला जे पाण्यासारखं दिसतयं ना ते रसना आहे बरं का...

हे बर्गर-नुडल्स हाउस आहे! mmm home yummy home :), ह्या घराच्या आर्किटेक्टला विचारलं "अरे कोणी खाउन टाकेल ना तुझं घर" तर त्यावर तो लगेच म्हणाला " घरावर जि मिरची दिसत्ये ती एक वेपन आहे, कोणी खायला आलं की ती तिखट सोडेल"

हे भन्नाटेस्ट घर आहे, हे हत्तीच्या आकाराचं घर, ज्याला चाकं आहेत..ते चालू शकतं आणि तुम्ही किल्लीने लॉक उघडलं की चाक वेगळि होतात आणि हत्तिला जे वरती पंख दिस्ताय्त ना त्यांनी हे घर उडु शकतं.. हत्तिच्या पोटात टॉफींचा साठा आहे...आणि जर कोणि शत्रु आले तर hidden पाण्याचा मारा आहे हत्तीच्या सोंडेमधुन आणि गंमत म्हणजे ह्या घराला हि-यांचं फेन्सिंग आहे :)


हे पाण्यावरचं घर आहे.. आणि महत्वाचं म्हणजे हे बोलकं घर आहे! त्याचे डोळे आणि मिश्या दिसतायंत ना?


ह्या आर्किटेक्टनी मला १० वेळा ह्या प्राण्याचं/superhero/ कोणितरी mon (digimon or pokemon) नाव सांगितलं पण मला काही आठवत नाहीये... तर त्याच्या एका पायातुन घरात जायचं आणि दुसर्यातुन बाहेर :)


हे घर indo-pak borderवर बांधलं जाणार आहे. तोफा आणि शस्त्रांनी भरलेलं हे घर पाकिस्तानी शिपायांना मारणारे!


हि-यांचं घर :)


आणि सर्वात शेवटी...

अद्रुश्य घर :) :)


अशी अजुन बरीच छान घरं तिसरीतल्या पिल्लांनी काढली!
आपण 2bhk, 3bhk आणि त्यातल्या त्यात काही जणं बंगला... ह्याच्या पुढे स्वप्न बघतचं नाही ना?माणसं जसजशी मोठी होतात, स्वप्नं लहान होत जातात ना?

Tuesday, February 12, 2008

:|

आज ह्या अवघड वाटेवरुन जाताना,
आठवत्ये मला जुनी सोप्पी वाट...
आठवतोय तो आनंदी प्रवास...

ती वाट सोप्पी होती?
कि ती तुझी साथ होती?
जिनं कधी वाटेतले अडथळे जाणवुचं दिले नाहीत?


(राव copy नाहीये... मला पण होता येतं senti! कधीकधी)

आज माझ्या काही जुन्या मित्र-मैत्रिणिंची खुप आठवण येत्ये.. आत्ता अगदी काय खुप अवघड वाट वगैरे नाहीये, पण i need those people back in my life with me... नाहीये ना पण शक्य...सगळे आपल्या-आपल्या कामात आता दंग आहेत... मलासुद्धा कित्त्ती... दिवसांनी आज आठवताय्त सगळे!
miss those old good days!! :

Saturday, February 9, 2008

...

ओघळलेले ते दोन अश्रु तळहातावर घेतले...
हातांमधे एक ताकद आल्यासारखं वाटलं...

बाबा तुम्ही सुरु केलेलं हे सेवाव्रत पुढेही असंच चालु राहिल...
आनंदवनात आनंद फुलत राहील!

तुम्हाला आम्ही वाहु शकतॊ फक्त सेवांजली!

Wednesday, February 6, 2008

तेरी खुशी, मेरी खुशी...

मी बावळट्ट आहे.. हे महित्ये मला पण माझ्या आजुबाजुची ते मला कायम प्रुव्ह का करुन देतात माहित नाही!
म्हणजे मलाच काल काही गरज नव्हती पण उगाच काहीतरी senti वगैरे झाल्यासारखं झालं ! त्याला म्हंट्लं "तेरी खुशी मे मेरी खुशी है!" तो हसला आणि म्हणाला "ठीक है तो अभी मै सो रहा हुं, मेरी सुबह call करके उठा देना...m khush wen m sleeping"

मग माझ्या बहिणिला पकडलं, जरा senti गप्पा मारुन झाल्यावर म्हणाले.."पिल्ल्या तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे" लगेच तिने लाडॆलाडे विचारलं ’मग आज मी शाळेत नको जाउ?"

यार, काय हे? मी expect करत होते कि समोरचाहि मला म्हणेल कि ’नाहि ग बाई, तु आनंदात रहा, खुश रहा.. आम्हाला तेवढंच पुरे" .... नाहीच ना पण!!रहा बाबा खुश.. शेवटि काय? "तुम्हारी खुशीमेही मेरी खुशी आहे ना?"

काल अभिषेक बच्चन आणि माझ्या एका crushचा वाढदिवस होता... "xxx@#xx मला ditch करुन दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करणाऱ्या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी... :(
मी कालचा दिवस त्यामुळे ’काळा दिवस’ म्हणुन साजरा केला.
कालचा संपुर्ण दिवस sunday फिल्मच्या गाण्यातली.. "बेहोशिया, बेताबिया, बेकरारी 24/7" हि ओळ तोंडात बसली होती!

man this is what i call " a real Sad day"

Tuesday, February 5, 2008

सुरणाची भाजी

जगात अप्रतिम सुरणाची भाजी फक्त आणि फक्त माझी आजीच करु शकायची!
मला आठवतं एकदा अश्विनीने मला विचारलं होतं की "तुझ्यामते स्वर्ग म्हणजे काय?"
मी लगेच उत्तर दिलं होतं..."स्वर्ग आपल्या हिमालया सारखा दिसत असेल, मस्त background music असेल, सगळे हसरे आणि त्यामुळे सुंदर दिसणारे चेहरे असतिल आणि महत्वाचं म्हणजे आज्जीच्या हातचं जेवण असेल"

माझी आज्जी, आज्जुकली, एन्चिकुन्चिपुन्चि (नाही ही भाषा कुठली हे मला ही माहित नाहिये :) ) जगातली उत्तम सुगरण होती. (असं सगळ्यांना त्यान्च्या आज्जीबद्दल वाटत असेल. माझी हरकत नाही! कारण तुम्हाला माझ्या आज्जीच्या हातची चव चाखायला मिळाली नाही ना!!)

मी खायला लागल्यापासुनच आज्जीच्या हातच्या प्रत्येक पदार्थाची फॅन आहे. तेंव्हा तर फॅन हा शब्द पण माहित नव्हता! तिने केलेला भात.. म्हणजे नुस्ता भातसुद्धा चविष्ट असायचा! (ह्यात कुठलीही अतिशयोक्ति नाहिये राव), मग त्यात तिने कालवलेला तुप-मीठ-कैरिचं लोणचं-भात म्हणजे आह्ह्ह!!! काय यार सगळि पंचपक्वान्नं गेली तेल लावत अश्या भातापुढे!! मी १२वित असेपर्यंत तिच्याकडुनच भात कालवुन घ्यायचे जेंव्हा ती असायची, नंतर काय ती दुष्ट बाई आम्हाला सोडुनच गेली... ए आज्जे अजुन माझा राग कमी झालेला नाहीये... तु चिंच-गुळाची आमटी बनवुन देईपर्यंत तरी कमी होणार नाही आहे. ताक-भात आणि त्यावर चिंच-गुळाची typical कोकणस्थी आमटी! माझ्या आईला सुद्धा नाही जमत. मला कळत नाही सगळ्या आज्या, आयांना स्वयपाक करायला नीट का शिकवत नाहीत? आज्जी आईपेक्षा १०पट उत्तम स्वयपाक करायची!

मला भात देताना भाताची विहिर करुन त्यात आमटी घालुन द्यायची आज्जी! तिने केलेले आमटितले गोळेही मस्त असायचे! मी त्याला आमटीतले बटाटे म्हणायचे... आज्जी आमच्याकडे आली किन्वा मी आज्जीकडे गेले की हा मेन्यु ठरलेला असायचा! ती स्वत: मात्र पोळी कुस्करुन त्यावर आमटी घेउन खायची, ते combo पण सही लागतं!

तिची अजुन एक speciality होती ती म्हणजे "उकड", हा पण बहुतेक कोकणस्थीच पदार्थ आहे. चाच-पोहे खावे तर तिच्याच हातचे! वाटाण्याची उसळ, उपमा, शेकटाच्या शेंगांची भाजी... अजुन अशि कित्ती कित्ती नावं सांगु! अहो ती बाई , कोबीची भाजी सुद्धा मिटक्या मारत खावी अशी करायची.

गोड पदार्थांमध्ये सुकेळी, गुळ्पापडीच्या वड्या specialch!

फक्त नेहेमीचे पदार्थच नाही पण तिच्या भाषेत ’मॉड-र्र-न’ पदार्थपण ती छान करायची! रगडा-पॅटिस, पाव-भाजी, पाणी-पुरी..एक्दम झक्कास! ती स्वतः खव्वय्येगिरीत expert होती, आधीच्या पिढीतली असुन बाहेरच्या पदार्थांशी तिचं काहीही वाकडं नव्ह्तं. वडापाव, चाट, क.दा तिचे फेवरेट होते.

म्हणुन कदाचित आम्ही नाही म्हणत असुन जायच्या आदल्या दिवशी प्रबोधिनीच्या इथली दाबेली खावुन घेतली... बाकी सगळ्यांना अतृप्त ठेवुन स्वतं तृप्त हॊउन गेली! देव नक्किच जाडा झाला असणारे वरती!

(आज तिची आठवण येउन मी सुरणाची भाजी केली, सुरण खाजरा निघाल्यामुळे २ घासांपेक्षा जास्त नाही खाउ शकले. आज्जी इतकी मस्त भाजी कशी करायची काय महित? .. तर म्हणुन नाव - सुरणाची भाजी :) )