Friday, February 22, 2008

हमार टुनटुनवा!!

साधारण ४ वर्षापुर्वीची गोष्ट, मी आणि कामना BMMच्या प्रवेशपरीक्षेसाठी (entrance test) मुंबईला जात होतो! बसमधे बाजुला बसलेला एक मुलगा सतत त्याचा mobile वाजवत होता. आम्ही दोघी पक्क्या "अलिबागकर" त्यामुळे... "कशाला लागतात mobile ह्या वयात? चैन आहे नुस्ती" वगैरे वगैरे बोलत होतो. मुंबई क्या चीज है? हे अजुन कळलं नव्हतं तोपर्यन्त! entrance testला पण "आजची तरुणपिढी"छाप विषय होता, आता नक्की आठवत नाही. पण आम्ही दोघींनीही कॉलेजातल्या मुलांना mobileसारख्या वस्तुचं व्यसन लागतयं वगैरे लिहिलं होतं. परिक्षेला आलेल्या बाकी "मुंबईकरांकडॆ" ..काय style मारताय्त भावाने आम्ही बघत होतो.



झालं, दोघीही तिथे select झालो, अलिबाग सोडुन मुंबैत रहायला आलो. आता आमच्या वर्गात बर्याच लोकांकडे mobile होता. group-project वगैरे असेल तर आमचे वांदे होयला लागले, आम्हाला मेसेज मिळायचेच नाही... मग लक्षात आलं की mobile ईथे चैन नाही already गरज बनला आहे.

मग "बाबा mobile असणं किती गरजेचं आहे" हे बाबांना पटवायला काही दिवस गेले. आणि मग २५ डिसेम्बर २००४ला मला mobile मिळाला... तेसुद्धा surprise बरं का? दिपीकाने हातात box ठेवला... "बघ बघ काय आहे"...boxच्या आकारावरुन तो mobile आहे हे लक्षात आलं होतं... मी खुश होते! रॅपर फाडलं, आता mobileचा खोका दिसायला लागला, आणि मला हसावं की रडावं कळेना... आनंद होत होता.. कारण mobile मिळाला होता... पण नोकिआ ३३१५? :।



FM नाही, कॅमेरा नाही.. काहीचं नाही... साधेस्ट मॉडेल! मला थोडा राग पण आला होता... पण मग म्हंटलं ठीक आहे. त्याच्याबरोबर airtelचं सिम फ़्री होतं :)... मग दुस-या दिवशी वर्गात "तेजु तेरा mobile दिखा ना" असं १०वेळा ऐकल्यावर mobile बाहेर काढला. "यार ठिक है, atleast अभी contactme तो रहोगी" ... "३३१५ बहोत स्टर्डी मॉडेल है रे" असे sympathyवाले टोमणे मला कळत होते. मला माझा Mobile खरचं आवडत नव्हता! मी तो बाहेर कोणासमोर काढायचे नाही. पण मग हळु-हळु त्याबद्दल थोडा आपलेपणा वाटायला लागला...यार, कसाही का असेना, आता आपला आहे! माझा स्वतःचा आहे!

मग त्याच्याबरोबर (३३१५बरोबर) Love-hate relationship सुरु झालं. i used to hate it पण मला हवाही होता... मग मला कोणि त्याच्यावरुन चिडवलं की मीसुद्धा माझा आवाज चढवायचे "माझा mobile हा real mobile आहे! तुमच्या मोबईलसारखा मुळूमुळू आवाज नाहिये, आख्या bldg.ला ऐकु जाईल असा दणदणित आवाज आहे. आणि ३-४ मजल्यावरुन खाली टाकलात तरिही काही होणार नाहीये माझ्या पठ्ठ्याला! तुमच्यासारखा delicate darling नक्किच नाहिये! हा.. बोलायचं कामचं नाही! फोटो काढायला digi-cam आहे माझ्याकडे आणि मी स्वतः गाते, मला FM नकोय (शेवटचं argument फक्त for sake of an argument होतं :P) खरं सांगु तर ही सगळि कारणं बाबांनी मला दिली होती जेन्व्हा मी त्यांना मोबाईल बदलुन मागितला होता!

कायम वाटतं हा जिवंत असता तरं? आईचा कॉल आल्यावर मी थिएटरमधे असुन लायब्ररीत आहे सांगताना त्याने मला डोळा मारला असता! पलिकडच्या व्यक्तिला smart उत्तर देताना माझ्याकडे बघुन smart smile दिलं असतं! मग मी कधी लाजल्यावर हा पण लाजला असता! मला चिडवलं असतं... मी रडताना पाठीवरुन हात फिरवला असता! मी भांडताना मला शांत केलं असतं!

तो इतक्यांदा पडला, पण कधिही तक्रार नाही केली! मी त्याला इतक्या शिव्या दिल्या पण सतत माझ्याबरोबरच होता.. मी एकटि असताना फक्त तोच तर होता माझा आधार! मी हसले, रड्ले, लाजले, भांडले... सगळं ह्याच्याच साक्षीने! माझा गुंडु mobile! मी कायम मजेत म्हणायचे "ईट का जवाब ३३१५से" :)

परवा त्याला धक्का लागुन तो पडला... ह्यावेळि दमला होता बहुतेक... त्याच्या चेहेर्याला लागलं.. तुमच्या भाषेत त्याची screen तुटली.. पण तरिही रडला नाही.. अजुनही माझ्याबरोबर आहे. आणि कायम माझ्याबरोबर राहिल! आता मोठा झालाय, थोड्या कुरबुरी करतो.. पण माझा तेवढा गुण नाही पण वाण लागणारचं ना त्याला! कोणितरी त्यादिवशी म्हणालं "असल्या निर्जीव गोष्टीत काय जिव गुंतवायचा? बदल तो मोबाईल आता" नाही यार नाही जमणार.. मला ह्याने कायम साथ दिलिये.. ह्याच्या शेवट्च्या श्वासापर्यन्त मी त्याला साथ देणारे.. तो फक्त माझाच राहिल!

21 comments:

निनाद said...

प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
मलाही तुझी अनुदिनी आवडली. मन-मोकळं लिहितेस.
मला तुझे हे माय ड्रीम हाउस तर खुपच आवडलेय...

-निनाद

Rohini said...

Hey stumbled on your page accidentally...maja aali vaachun..chaan lihites:-)
1st mobileshi attached sentiments kalataat mala...keep writing and smiling
Rohini

Sneha said...

wat a coincidence... majhahi 1hila mobile haach aani ashich kahishi chd chid...majha matra thakun gelay par... navin ghetala pan to javalach thevalay... khup sarya athavanincha sakkshidar mhanun....a adun madhun mi bolate tyachyashi.... :)

Monsieur K said...

know wot?
i bought my cell phone (nokia 6610) in 2004 - navin job laagla tevha - and i lost it almost a year later in a cinema hall - "kaal" baghaaylaa gelo hoto tevha!! :((
tya du:khaat javal-javal mahinaa bhar navin phone navhta ghetla.. mag ek 6610i ghetlaa.. to geli 2.5-2.75 varsha mast chaaltoy.. s'times i feel i shud change it.. US madhe ekda ek scare milaalela.. i thot i lost it... pan to gharaat ch ekaa box madhe padlela.. but i actually felt good.. feeling tht now i cant be reached by anyone.. and now i can buy a new one :D

anyways, mast lihila aahes nehmi pramaane!

Tulip said...

छान झालय पोस्ट.

मी खरंच ऍप्रिशिएट करते आणि मला कौतुकही वाटतं ज्यांचा जीव असा वस्तूंमधे अडकतो. मी ह्याबाबतीत अगदी कोरडी म्हणावी इतकी अलिप्त राहू शकते. म्हणजे मला घरातल्या जऽरा जुन्या झालेल्या वस्तू कधी टाकून देतेय किंवा नवीन लेटेस्ट मॉडेल्स कधी घेतेय असंच होतं रहातं:P तेव्हढाच नव्या शॉपिंगला स्कोप आणि चान्स:)).वेल जोक्स अपार्ट पण माझ्या मित्रमैत्रीणी कधी त्यांनी एसेसीला पेपर ज्याने लिहिला ती पेनं, पहिल्या डेटबरोबर पाहिलेल्या पहिल्या पिक्चरची तिकिटं, 'त्याचे' किंवा 'तिचे' चुकून त्यांच्याकडे राहून गेलेले रुमाल, लहानपणी चालवलेल्या सायकलच्या मोडक्या घंटा, बाहुल्या वगैरे तत्सम प्रकार दाखवतात किंवा त्याबद्दल बोलतात तेव्हा बरेचदा मी आपल्याला वाईट वगैरे वाटतय की काय कारण आपल्याकडे असल्या काहीच आठवणीतल्या वस्तू आपण ठेवल्या नाहीत असा विचार करुन बघते. पण मग लक्षात आलं की हा एकेक स्वभाव असतो.. वस्तूंमधे गुंतून रहाण्याचा. आणि असं म्हणता म्हणता ह्याला एक सणसणीत अपवाद माझ्याबाबतीत झालाच तो म्हणजे आमचं नुकतचं डेमॉलिश करुन सोसायटीत कन्वर्ट झालेलं घर. त्या एका वेळी मात्र मला आयुष्यभर पुरुन उरेल इतकं वाईट वाटून गेलं. अगदी जवळची व्यक्ती किंवा आपल्याच व्यक्तिमत्वाचा एक भाग मरुन गेल्यासारखं वाटून. त्याबद्दल नंतर.

आधीच्या पोस्टवर राहून गेली कमेन्ट पण तेही खूप आवडलं

veerendra said...

wa ..
jhakaas post ..

सर्किट said...

मस्त लिहीलंयेस. :-)

Jaswandi said...

thanx ninad ani rohini; veerendra ani thanx circuit :)

oh sneha, good to know mazyasarkha 3315wala ajun koni ahe :).. mi agadi tyachyashi bolnyaitake tyache laad karat nahi rather laadch karat nahi!

ketan, suruwatichya kalat mi "mobile ghalavanyache 101 paryay" vagaire pustak lihu shakale aste itkya opionscha vichar kela hota! e.g. kapatat khalchya khanat sarvat mage theun dyaycha ani babana sangaycha localmadhun padala :)

Jaswandi said...

@tulip,

thanx :)

mi suddha sagalya vastunchya babtit itaki halavi hot nahi... pan specially computer ani mobile baddal halli zalye!
ani atta tu dileli baki udaharana specially "dahavichi pariksha lihilela pen" vachun malahi khup vait vattay.. mala he kadhi suchlach nahi! mi ashya kahi goshti ajun thevlyat tashya mhanaje mazyakade mazya pahilya ekatine kelelya localchya pravasacha ticket aahe :D
mi actually khup madhe padate hyababtit! navin goshti ghenyachi utsukta aste ani tyasathi junya goshti takaychya astat pan kaih kahi goshtinmadhe itka jeev guntato ki tya takaychya laykichya aslya tari tasa vicharhi karavat nahi!

ani juna ghar, tyavar aakkhi blogschi malika lihita yeil.. :)

पूनम छत्रे said...

same pinch.. mazhyakadehi 3315 ch hota- blue color cha. lagnanantar navryane gheun dilela. tyachyawar poorn vishwas thevoon 'konataahi ghe' asa tyala mare sangitlela ani he 'dhyan' baghoon kharach apexabhang zala hota :) :) but u get used to it. goD aahe to :)

paN tyachya sturdy-panachach kantala yeon ek samsung cha sleek mobile ghetala madhe :) te mhaNaje nustach ranga-roopaala bhulaNa zala :PP mag sturdy hi ani sleek hi asa nokia 6300 ahe ata ani touchwood to rahil barech diwas :)

Raj said...

मोबूकहाणी आवडली.:)
अनुदिनी छान आहे.

दीपिका said...

:D

rayshma said...

seriously... u still use that handset? it was my second handset... a gift from my bro... me college madhye hote tevha... :) and u're rite... it's a VERY sturdy phone!

really well written piece... :)

Jaswandi said...

oh thanx poonam ani rayshma.. aikun kharach changla vatla ki ajun koni ha phone waparat hota!

rayshma mi ajunhi ha phone waparate... ata fakt tras hoto te phone memorycha 250 numberschya limitcha!

thanx dipu ani thanx raj :D

Sneha said...

aga.. kiti alashi aahes tu? mi roj alya alya tujha blog ughadun baghate... tar kahich nahi... :(
lihi bara chanashi post...

Yogesh Damle said...

अय्या, इश्श, अग्गोब्बाई इ. इ... माझा मोबाइल 3310. (3315 pexaahee पाच आकडे डावा :P)

हँडसेट्सच्या ह्या गोत्राला 'हथौड़ा मोबाइल' म्हणत असू- ह्यांनी खिळाही भिंतीत ठोकता येत असे.

ह्यांचं waterproofing पण जबरदस्त होतं. हॉटेलात माझ्या मित्राचा अख्खा फोन ग्लासात पडला- त्याच्या तीर्थरूपांना आठवून आम्ही टरकलो. घाबरत तो फोन बाहेर काढला, आणि टॅण्णकन त्याची रिंग वाजली. थरथरत्या vibrations ने पाण्याचे थेंब पण आपोआप बाहेर पडत होते- भिजलेल्या कुत्र्याने पाणी झटकल्याप्रमाणे :)

तो फोन ज्या चोराने नेला, अजून वापरत असेल! :(

Massssssst lihites ga Teju!! :)

Jaswandi said...

hmm Sneha TAI!


:) :D thanks Yogesh!

Chirag said...

सहीच !! मस्त लिहिलंय तुम्ही...तसे तुमचे दोन्ही ब्लॊग छान आहेत..

Dk said...

माहित्येय की आता तू हे वाचण्याची शक्यता फार नाहीये तरीपण... :(

ओ बाई काय ग्रेटच लिहिताय तुम्ही.... :) when you say that you are not teen it is hard to belive really! you no why? coz the way u r writing is simple n sweet I know my comment is too late but what to do dear got this GREAT blog jst now!

कायम वाटतं हा जिवंत असता तरं? >> आता काय बोलणार मी पामर तुझ्या ह्या imagination वर? शब्दच नाहीयेत... आम्हाला असल काही सुचतच नाही केवळ अप्रतिम! माझा गुंडु mobile>>> well all this sounds tipical girli. but stil it is ok coz it is real!

तुझ्या आधीच्या पोस्टस् ही वाचल्या पण इथं कमेन्ट करण्याचा मोह आवरला नाही :)

well keep writing! :)

deep
"I am not a complete idiot.. Some parts are missing!"

Jaswandi said...

thanx chirag :)

ani thanx deep.... mi tujhi comment vachali ...chhan watala
ata tu he kadhi vachshil ki nahi mahit nahi... :)

Dk said...

baas ka madem?? :)