Friday, March 28, 2008

खो-खो, चिमणी, मंत्रा!!

Get this widget | Track details | eSnips Social DNA

अगं पकड... पळ पळ.. हट, खो दे.. इथे खो दे..."


"डावीकडे जा.. धर तिला... मुर्खा हात पसरता येत नाहीत का?... खो दे पटकन"


"लगेच वळायचं नाही... आधी सरळ रेषेत पळायचं मग भिडु कोणत्या दिशेला जातोय बघायचं मग आपली दिशा ठरावायची"


पीटी सर सांगत होते, आम्ही बघत होतो... खो-खो... सोप्पा नाहीये राव!! माझ्यापेक्षा सगळे मोठे, माझ्यापेक्षा जास्त अनुभवी, काही मुली इंटरनॅशनल लेवलवर खेळतील इतक्या भारी.... मग आम्ही ५-६वीतल्या चिल्ल्या-पिल्ल्या तिथे काय करत होतो? त्या सगळ्या तायांमधें आम्ही लिंबु-टिंबु... आम्हाला त्यांच्यासारखं पळता कुठं येणारे? त्याच्या ट्रिक्स कुठे माहित्येत?

सर म्हणाले.. "भिडु नाही पकडला गेला तरी चालेल.. पण खेळा, धडपडा, पळा...त्यातुनचं शिकाल!"

मेघना, संवेद, ट्युलिप, राज, निमिष, केतन, विद्या.... पटापट भिडु पकडणारी लोकं, त्यांचा खेळ बघत बसावा इतका सुंदर... खो द्यायची पद्धत अप्रतिम! आपल्याला ह्याची ट्रिक कळली बुवा म्हणुन आपण त्यांना पकडायला जाउ.. पण हि लोक कधीच नाही सापडायची!! मग मी लिंबु-टिंबु काय करत्ये इथे?मी इथे का आहे...का लिहित्ये?

नाही लिहायला जमलं, नाही सापडली उत्तरं-नाही पकडता येत हो नेहेमी भिडु...

पण लिहित्ये.. लिहायचा प्रयत्न करत्ये... चुकत्ये...आणि त्यातुनचं शिकत्ये!!!

yeah i guess इतक्या सिंपली मी हे म्हणु शकत्ये... मी इथे हा खेळ, ही कला म्हणा शिकायला आहे... अनेक फालतु.. अनेक फिलॊसोफिकल, अनेक emotional प्रश्नांची उत्तरं सापडवत्ये... लिहिल्यामुळे जराशी organize होतायंत उत्तरं इतकचं!! so म्हणुन लिहित्ये...

..........................................................................................

काही दिवसांपुर्वी लहान मुलं आणि लिहिणं ह्याबाबतीत काहीतरी वाचत होते. एका बाईनी तिचा एक अनुभव लिहिला होता... ती तिच्या कामात होती, अचानक तिची मुलगी तिथे आली , घराबाहेर एक लहान चिमणी पडल्ये आणि तिला मुंग्या त्रास देताय्त हे आईला सांगायला लागली... आईला मुळ्ळीच वेळ नव्हता.. आईनी तरी एकदा बाहेर येउन चिमणी पाहिली.. मुलीला सांगितलं... "बाळ, ती चिमणी आता देवाघरी गेल्ये... तु आत येउन खेळ" आई परत आपल्या कामात बुडाली... मुलीने तिच्या एका मैत्रिणीला बोलावुन आणलं आणि दोघींची काहीतरी खुडबुड सुरु झाली.. घरातुन बाहेर.. बाहेरुन आत सतत काहीतरी चालू होतं... आईनी खिडकीतुन बाहेर ह्या मुलींकडे पाहिल्यावर त्या झाडाखाली काहीतरी करताना दिसल्या, आई तिथे गेली... तिथे एक खड्डा खणुन तो परत बुजवल्याच्या खुणा होत्या, त्याच्या आजुबाजुला पांढरे दगड ठेवले होते... काड्यांचा एक क्रॉस त्या खड्यावर लावला होता आणि त्यावर एक कागद लावला होता ज्यावर लिहिलं होतं "we had to let everyone know, how we felt"

एक छोटासा पक्षी.. कधीतरी जिवन्त असणारा, आता या जगात नाही... कदाचित आपल्या मोठ्यांसाठी इतकी महत्वाची गोष्ट नसेल ही.. पण त्या पिल्लांसाठी नक्कीच होती... आणि त्यांनी ती लिहुन व्यक्त केली... लिहायचं मन मोकळं करण्यासाठी... स्वतःला express करण्यासाठी!!

.......................................

काल रात्री ह्याबाबतीत भरपुर विचार करत होते... नेहेमी सारखी उत्तरं तर सापडत नव्हतीच... अचानक आयपॉड वर युफोरियाचं हे गाणं सुरु झालं.... यार हेच तर उत्तर आहे!! का लिहित्ये ह्याचं... हे सगळे प्रश्न मलाही तर रोज पडताय्त! blogging is just an attempt of ascertaining My Mantra....

माझा ’खो’ संवादिनीला

15 comments:

Jaswandi said...

vidya, thanx a lott mala 'kho' dilyabaddal!

मोरपीस said...

खो देण्याची पध्दत मला आवडली

a Sane man said...

खो‍खोः कौतुकाचं दडपण येतंय...मनापासून आभार. नि तूही मस्त खेळतेस कि खोखो.

चिमणीः गोष्ट सुंदर आहे. स्वतःला व्यक्त करणं हा मला वाटतं, लिहिण्याचा अविभाज्य भाग आहे.

मंत्रः गाणं छान आहे...समर्पक वगैरे...:)

Raj said...

छान. एकाच प्रश्नाला सगळ्यांची वेगवेगळी उत्तरे पाहून मजा वाटते आहे. गाणे आत्ताच पहिल्यांदा ऐकले, निमिष म्हणाला तसे समर्पक आहे. :-)

Monsieur K said...

manaat aalela pahilaa vichaar - indian cricket team madhe aata seniors peksha juniors na jaasti demand aahe! tasach, in this game of kho-kho, juniors baaji maarun jaanaar ;-)

mast lihila aahes. ajun gaana aikla naahiye mi, tey pan aikto :)

Abhijit Bathe said...

'We had to let everyone know' - या वाक्यापेक्षाही ते कुणी आणि कुठल्या परिस्थितीत लिहिलंय हे वाचुन एकच प्रतिक्रिया उमटली -
’आई शपत! सही!!’

Silence said...

अभिजीत ला अनुमोदन... "We had to let everyone know" साधच वाक्य पण महत्वाकांक्षी.

स्नेहा said...

mastach ga... kharach tu goad lihates...aani mala tujhya likhanatali hich gosht khup aavadate...
god bless you...
tula asech kho milu det :)

Monsieur K said...

'je je uttam' karta tulaa 'kho' dilaa aahe :)

Rohini said...

Lihava svatasaathi..svatala express karnyaasathi..ani khup khup chaan loka jodnyaasaathi, like u :-) ...gaana nahi eikala..pan mantra aavadla..my mantra:-)

संवादिनी said...

thanks for the Kho.....give me couple of days to THINK.....WHY?

Meghana Bhuskute said...

आभार! Keep on blogging!

Jaswandi said...

thanx, Morpis

sane man, kho-kho shikatye ajun :)
thanx gana awadla he sangitlyabaddal, Euphoriachi mi khup mothi fan ahe, pan majhya ajubajuchya konalahi euphoria awadat nahi :(

thanx raj

ketan, Comment awadali :D... bass utarate ata khali :P, ani kho sathi thanx, tu khup vel lavlas to kho ghyayla.. malahi lagel bahutek jarasa vel.. lihin pan lavkarch

silence, abhijit... mi suddha ti gosht vachali ani hich pratikriya hoti... sadhach ahe pan bhannat ahe!

thank you sneha :)

thanx rohini, :)

thanx sanvadini and meghna!!

Jaswandi said...

meghna ho kho-kho suru karnyasathi thanx..
ani samvadini mi kho dilyawar tyabar tu apratim lihilyabaddal thanx :D :P

Vidya Bhutkar said...

Hey Jaswandi,
Sorry for being so late in commenting here. Thanks for taking it up and doing so well. :-) I liked the post very much. :-)
-Vidya.