Friday, April 4, 2008

जे जे उत्तम!

केतनने खो दिला खरा, पण इतक्यात तो घ्यायचा विचार नव्हता...
सध्या ब्लॉग आणि अभ्यासाची पुस्तकं सोडता काहीच वाचन चालू नाहीये! :(
त्यातलचं एक पुस्तक (वाचत होते रेफ़रन्स म्हणुन, पण अभ्यासाचं पुस्तक नाही), त्यातलाच एक आवडलेला उतारा....

.............

सर्वसाधारणपणे आवडणारी कामेही काही जण पाट्या टाकल्यासारखी करतात, तर अगदी कंटाळवाण्या कामातही काही जण लय कशी उत्पन्न करतात याचे रहस्य, ’आता-इथे-या क्षणी’ मधे आहे.

एका मोठ्या फॅक्टरीच्या परिसरामध्ये मी उभा होतो.माझ्या शेजारीच लाल दगडांचा लांबसडक फूटपाथ होता. एक सफाई कामगार तो फूट्पाथ साफ करत होता. दिवस पावसाळ्याचे होते. ब्रश, पावडरचा डबा, बादली, पाण्याचा पाईप अशा आयुधांनिशी तो कामाला भिडला होता, त्याच्या हालचालींमध्ये लय होती.मग्न होता कामामध्ये. त्याचा चेहरा तल्लीन होता... मला तो कबीरासारखा भासला, थोडा बहिणाबाईसारखा. मी त्याच्या जवळ गेलो. त्याच्याकडे पाहुन हसलो. त्याने प्रतिसाद दिला. मी म्हणालो, " किती रंगुन काम करताय तुम्ही...छान वाटतंय तुम्हाला पाहतानाच."

तो चकित झाला. त्याला कदाचित अशी दाद या आधी कुणी दिली नसावी. "आता हे काम करताना तुमच्या डोक्यात काय विचार चालले होते, सांगू शकाल?" मी विचारले.

"कुठले विचार, साहेब... काही नाही..., नुस्तं काम करत होतो... दुसरं काही नाही" तो बावचळला.मीही ताणून धरले नाही. तो त्याच्या कामाला लागला. मी मला न्यायला येणार्या वाहनाची वाट पाहायला लागलो. काही मिनिटे तशीच गेली.

"साहेब... गावला... सापडला... विचार" तो मला म्हणाला. मी पुन्हा त्याच्याजवळ गेलो. "ऐका... या समद्या लाद्या साफ करत करत मी त्या टोकाला पोचन ना... तवा पाठी वळून बघनं...अन म्हनेन...चकाचक.. हा फूट्पाथ मी साफ क्येलाय." तो म्हणाला..मी मान डोलावली. " आणि हे मला तिथं ताठ मानेनं म्हणायचं तर मला आता हा दगड पयला चकाचक नको करायला... शेवटी हा रस्ता आख्खा बनला कसा... दगडांनीच का न्हाय!" मला त्याच्या कबीरपणाचा पुरावा ’त्या-क्षणी’ देत तो म्हणाला.

अशी गंमत आणणारे पानवाले असतात, भेळवाले असतात, शहाळी सोलणारे मलबारी असतात, भजी तळणारे असतात, चहा करणारे असतात, केबल खेचणारे असतात, पॉलिश करणारे असतात, केस कापणारे असतात... तिकिटे फाडणारे कंडक्टरही असतात... प्रत्येक क्षणाला ते जिवंत करतात.

अनुभवांशी समरस होणारी ही मंडळी, ते करत असलेल्या प्रत्येक कृतीला ’चव’ आणतात. आपण त्यांचे कौतुक केले तर ते आनंदतात जरुर, पण आपण कौतुक करावे म्हणून ते काहीही करत नसतात.


स्वभाव-विभाव
डॉ. आनंद नाडकर्णी

12 comments:

मोरपीस said...

खूप मस्त आहे.झक्कास!

Silence said...

वाचायला खूप छान वाटला... पण नक्की समजलं नाही ह्या वाक्याचा अर्थ
" आणि हे मला तिथं ताठ मानेनं म्हणायचं तर मला आता हा दगड पयला चकाचक नको करायला... शेवटी हा रस्ता आख्खा बनला कसा... दगडांनीच का न्हाय!" मला त्याच्या कबीरपणाचा पुरावा ’त्या-क्षणी’ देत तो म्हणाला.
pls. सांगशील का?

Anamika Joshi said...

"पण आपण कौतुक करावे म्हणून ते काहीही करत नसतात."

gr8!! isn't it? ani apan ithe vachakanni koutukachya comments lihavyat mhanun adhikadhik changala blog lihit rahato. :)

Sneha said...

:)...

Monsieur K said...

ashaa lokaan kade aapan bahutek velaa dhunkun hee pahaat naahi na.. most of the times, we either take their presence/work for granted.. or mostly, we just never bother to look at them..

good choice :)
aani abhyaasaat vyatyay aanlya baddal kshamasva :)

saurabh V said...

डॉ.आनंद नाडकर्णी हा माणुस "मानसोपचार तज्ञ" आहे की मनकवडा जादुगार आहे? हेच कळत नाहि. कारण साधारणत: आपल्याला जे प्रश्न पडतात ते त्या माणासाने आधीच त्यांच्या कुठल्याश्या पुस्तकात लिहुन ठेवले असतात. त्यांच "गद्धेपंचवीशी" तर २-३ वेळा वाचुन झालय. स्वभाव-विभाव देखिल दोन वेळा वाचुन झालय. स्वभाव-विभाव मधला "तोफेच्या तोंडी" ही कन्सेप्ट तर प्रत्येकाच्या आयुष्यात वरचेवर येतेच येते. गद्धेपंचवीशीची सुरुवात देखिल हा माणुस "ब्लु-फिल्म" पासुन करतो(म्हणजे वर्णन नव्हे :p) आणि मग त्या नंतर जे विचारांच चक्र दाखवलय ते केवळ अप्रतिम. अलगद तो माणुस ब्लु फिल्म मधुन बाहेर काअढुन आपल्यालाच अंतर्मुख करुन जातो.

हॅट्स ऑफ मि.नाडकर्णी!

आणि त्याची आठवण करुन दिल्या बद्दल थॅंक्स - "जास्वंदी"!

Anand Sarolkar said...

wah! mast utara nivadla ahes. vachun ekdun fresh vatala :)

Jaswandi said...

thanx मोरपीस :)

@ silence, तुला नक्की काय कळलं नाही ते मला कळ्लं नाही रे!

@ vidushi, very true!!

स्नेहा :)

केतन, हो रे, मला आठवतं असाच एक धडा आम्हाला शाळेत असताना होता, तो धडा शिकल्यानंतर कचरेवाला, रिक्षावाला कोणिही असो.. त्यांना thanx म्हणायची सवय लागली होती.
आणि अभ्यासात व्यक्तय कसला... मज्जाच आली हे करताना!

हो रे सौरभ, आनंद नाडकर्णी खरचं मस्त लिहितात.. कुठेही त्यांची पुस्तकं वाचताना आपण "self help books" वाचतॊय असं वाटत नाही, ते आपल्याशी गप्पा मारताय्त असंच वाटतं!

thanx आनंद!

Neeta said...

mi pan lihaayalaa lagale ga!

saurabh V said...

ए टगे, अगं नविन लिहि कि काहितरी.

Monsieur K said...

pariksha sampli ki nahi?

Dk said...

Jas,
आपण कौतुक करावे म्हणून ते काहीही करत नसतात>> Well I do not totally agree with this coz somehow somewhere everybody at some point of time needs two words of appreciation! Some are fortunate enough some are not.

Even these people who are doing not so great jobs,(drivers, dabbawallas ...)also feel the same way! The only difference is here we have the power of writing, expressing our thoughts…

Hey as usual U R ROCKING!! Boss tera to jawab nhi!

Keep writing! :)