Tuesday, September 30, 2008

The end...the beginning...

काही गोष्टी संपवाव्या लागतात, किंवा अर्ध्यावर सोडुन द्याव्या लागतात. कारण जेव्हा १ गोष्ट संपते तेव्हाच दुस-या गोष्टीला सुरुवात होते. cliche मारायचाच तर "प्रत्येक शेवट, एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात असते".

इथे आधी नवीन कहाण्या सुरु झाल्या आणि म्हणुन मग जुन्या गोष्टी... "hutt, I was so childish" म्हणत संपवल्या, संपवल्या म्हणण्यापेक्षा डोक्यातल्या कुठल्यातरी अडगळीच्या खोलीतल्या एका कोप-यातल्या जाड्जुड ट्रंकेत कुलुपबंद केल्या!

तिने तिच्या स्वतःची गोष्ट कधीच बदलली होती, त्याच्याविषयी काहीच माहित नव्हतं, काही दिवसांपुर्वी अचानक दोघे एकमेकांसमोर आले... :) तिने विचार केला होता तसं काहीच नाही झालं, तो प्लॅन अजुन १० वर्षांनंतरचा होता, आत्ताशी कुठे १-२ वर्षच झाली होती.

मुंबई भरपुर मोठी आहे... पण तरीही त्याच्याच उपनगरातल्या एका मॉलच्या बाहेर दुस-याच कोणाचीतरी वाट पाहत असताना तिला तो दिसला... त्याच्याबरोबर रेवा,

"huh, I knew this... हे तर होणारचं होतं, माझ्यानंतर तिच तर "best friend" होती"
best friend म्हणुन ती स्वतःशीच हसली... आपण इतके immature ही होतो कधीतरी!

ती: hey, hi! (मला ओळखतोस का?)

तो: Hellllooo.... तू इथे? कशी काय? कित्ती दिवसांनी... haah..m soo Happy to see u after so many days...

तिला ह्या आधी तो काय बोलतोय आणि त्याच्या मनात काय आहे हे दोन्ही कळायचं. पण आता त्या ultrasonic आवाजाचे बदलेले receivers त्याच्यासोबत होते.

ती: hi रेवा! :) u r looking cute...

तो: as usual

ती: yupp... (च्या मारी, काहीतरी लाज ठेव)... aahhaa.. somebody is blushing n all huh!

रेवा: अगं आत्ता काही दिवसांपुर्वीच आम्ही तुझी आठवण काढली होती...

ती: u want me to believe you babes? काय चालु आहे सध्या?

तो: यार मला वाटलं तू smart आहे, तू guess करू शकली असशील...

ती: हा हा ह... (हा प्रश्न मलाच विचारायचा होता का लेका?)

.......

रेवा: (त्याला) चल ना रे, m hungry! (तिच्याकडे बघुन) हिला पण घेउन चलु, चल ना आमच्यासोबत..

ती: नाही, माझी एक मैत्रिण येत्ये भेटायला, येईलच थोड्या वेळात आणि मला ’कबाब मधे हड्डी’ सारखं काही बनायची इच्छा नाहीये... ( यार निघा की आता... अजुन थोडावेळ तुम्हाला एकत्र नाही बघु शकत...)

तो: चल बे चुपचाप... पता नही नंतर कधी भेटु की नाही... तू तो जा रही है ना कही परदेस....

ती: ठीक आहे, चलो

त्या दोघांच्या पाठीमागे ती चालत होती
(परत कधीच भेटणार नाही? हो आता खरचं परत कधी भेटणार? पण भेटायचं तरी का आहे? २ वर्षांपुर्वी एकही दिवस असा जायचा नाही जेव्हा हा आपल्याशी बोलला नसेल. तेव्हा कोणी सांगितलं असतं की असाही एक दिवस येईल तर आपण त्यावर इतके हसलो असतो. इतक्या पटापट सगळं बदलतं आहे ह्यावर विश्वास नाही बसत...)

तो: hello, कहा खो गई? काय घेणार?

ती: १ कोक.. small ( as usual...)

तो: बास? इतकच? रेवा तुला?

रेवा: मला ना... आधी mcveggie, coke large नंतर बाकी सांगेन

तो: as usual!!

......

ती बसलेली, ती दोघं काहीतरी बोलत होती... १ कोक शेअर करत होती...
(thank god..दोन स्ट्रॉ नाही घालत्येत त्यात... घ्या की २ वेगवेगळे ग्लास, आख्खं जात नाही तर small घ्या की राव)

आता तिने आपला mobile काढला, ISD परवडत नाही पण आता तिने ठरवलचं होतं... (बास झालं, खुप पाहिलं आता.. मी पण काही "तेरे जुदाई मधे आसु वाहावत" नाहीये!)

ती: excuse me huh!

बोलायला सुरुवात केली मोबाईलवर, खरं तरं love u, miss u वगैरे कधी बोलत नाही ती कोणासमोर पण आज बोलली. संपुर्ण वेळात एकदाही त्याचा उल्लेख केला नाही. मग call cut केला आणि रेवाकडे बघुन हसली... मग पुढची १०-१५ मिनीटं रेवाकडे बघुन "अगं माझा हा ना असा आहे, तसा आहे" types काहीतरी बोलली.

ती: खुप पकवलं का मी? (नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त नाही) मला निघायला हवं आता.. मैत्रिण वाट पाहत असेल माझी! चल मी निघते .. आणि तुम्हाला दोघांना congrats n futureसाठी all the best! :)
.....

ती उठुन चालायला लागली, आधी तिने ठरवलं की मगे वळुन बघायचंच नाही.. पण मग अचानक आठवलं अरे आपण आता ह्यापुढे त्याला आणि तिला कधीच भेटणार नाही. म्हणुन तिने एकदा मागे वळुन पाहिलं दोघांनाही हात केला... त्यांच्यासाठी आत्ता ही सुरुवात होती... त्यांच्या ह्या सुरुवातीने हिच्या डोक्यातली एक ट्रंक कायमची बंद झाली होती...

मुंबईहुन परत येताना बसमध्ये अनेक आठवणी तिने play केल्या. संपलेल्या आठवणी recycle bin मधे टाकल्या!
....

रद्दी टाकायच्या आधी सगळे पेपर पुन्हा एकदा चाळायची माझी सवय नाही जायची कधीच बहुतेक!

24 comments:

veerendra said...

ekhaadach prasang jiwant karaychi tuzi kala kamalichi ahe.. je jabardast lekhan jhalay ! best of the best !

कोहम said...

anubhav ticha asel...pan sagalyannich kadhi na kadhi kuthe na kuthe anubhavalalea.... good work!!

HAREKRISHNAJI said...

mastacha

दीपिका said...

mast!

Dk said...

व्वा!! फारच छान आहे गं!

>> बाकी आमच्याही (स्वत:ला संबोधून) ब्लॉगला अवश्य भेट द्यावी! फार छान नसेनही लिहित मी तरी पण... बघावत जरा! कमेन्ट/ प्रतिसाद द्या! :( आवडल/ नाही आवडल तरी कळवा मगच मला कळेल! (आणी सुधरणा होईल)

saurabh V said...

भा.पो.

Satish said...

मस्तच.... शेवट्च वाक्य तर सहिच...

वर्षा ऋतु said...

hI जासूबाई,
माझ्या आजवरच्या Blog life मधला तू एकमेव जीव, जिचा Blog मी अगदी अख्खाच्या अख्खा वाचून काढला.
काल आणि आज .... अक्षरक्ष: hypnotise झाल्यासारख सगळ्या posts हाणल्या....
छान, great, सुंदर, मस्त, अफलातून, ......यांव - त्यांव... असा काहीच म्हणायच नाही.. (सगळी विशेषण लागू होत असली तरी... )

पण जस्सूबाई,
दिलसे सांगते, "तो पाहताच blog .......... " असच कायतरी वाटल....

लगे रहो जस्सूबाय .....

(तुला जस्सू - जस्सू करताना, Jasubhai media आठवला... कैच्या - कै )

Jaswandi said...

Thank you Veerendra! :)

naah.. pan konihi anubhavu naye asa anubhav ahe na koham!

harekrishnaji... dhanyawad!

Jaswandi said...

Thank you Deeps :)



@saurabh
BHA. PO. AA. RI. ZA :)

Jaswandi said...

@ Satish.. thank you for ur comment :).... I wish te shevatacha vakya nasayla hava hota... :)

@varsha rutu, Thanks a lott
know wat, tya diwashi was feeling verry low, ani sahaj blogwar ale tar tujhi comment disali... hey u made my day :).. tujhi comment vachlyawar ekdum chhan-chhan watayla lagala :)
nehemi yet ja ga ithe vachayla mi je kahi bahi lihite te.. :)

Abhi said...

तुमचा ब्लॉग मला खूप छान वाटला.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छया!!!
-अभी

Monsieur K said...

ekdam dil se post aahe.. khup haLvi..

Onkar Danke said...

ekdam mast.aagdi dolyasamor visuals ubhi rahvi aase likhan.khup awadle

Samved said...

बाई, आहात कुठे? दिवाळी संपली की...

veerendra said...

जास्वंदी..
मी तुझा ब्लॉग माझ्या या पोस्टमधे जोडला आहे. "ब्लॉग" या विषयावर मी एक पोस्ट लिहीली आहे. तरी एकदा नजर टाकावी.

शुभेच्छा !

Shardul said...

Dolya samor chitra ubha rahila.... khup chan....

Jaswandi said...

@ Innocent Warrior, Thank you!

@ Ketan, rao tumachya post ekdum dil se astat aamhi aapala prayatn karato :)

@ Onkar, Thanks

Jaswandi said...

@ Samved, arthik mandi pathopath mazyakade vaicharik mandi aliye :(
halli chhotussa kahitari suchata te dusarya blog var "tangent" var lihite... bagha ekda vachun :)


@ veerendra

Thank you! aabhari ahe :)

@ Shardul, Thank you! :)

me said...

chaan. uttam likhan, u write so simple, but amazing.

Yogesh Damle said...

तुझी ही पोस्ट हलवून गेली...
Ouch! It hurts!!

sagarkelkar said...
This comment has been removed by the author.
KRISHNA_BAVARI said...

hmmmmmmmm
khar sangayach tar baryach janani anubhavleli vedanaa nahi nahi sal!!!
shabd nadh sundar pane kelay!!!!

sagar said...

"रद्दी टाकायच्या आधी सगळे पेपर पुन्हा एकदा चाळायची माझी सवय नाही जायची कधीच बहुतेक !"
:D crux/core ?