Saturday, January 19, 2008

रोहिणी

who रोहिणी?
ne friend? कि कोणी काकु, मावशी, आत्या....?
कोणी ओळखीची मुलगी?...umm.. not exactly!

पण ह्या सगळ्यांमधे कुठेतरी आहे ती... दरवेळी दिसेलच असं नाही आणि काहीवेळा फक्त तीच दिसेल!
पण हे "रोहिणी" प्रकरण आहे काय?...
प्रकरण वगैरे नाही पण ती proper लग्नाची बायको आहे चंद्राची...
yeah right, चंद्र म्हणजे आकाशात दिसतो तोच!
चंद्राबरोबर प्रत्येक रात्र ती फिरत असते आकाशात, कधी त्याच्या पुढे, कधी त्याच्या पाठी, अनेकदा झाकोळली जाते त्याच्या प्रकाशात...कधी-कधी तो तिला सोडुन खुप पुढे निघुन जातो... ती आपली चालत राहते त्याच्या सोबतीने, एवढ्या मोठ्ठ्या आकाशात!
कधी राग येत असेल तिला त्याचा? कधी कंटाळली असेल का त्याच्याबरोबर चालुन? एवढ्या सगळ्या चमचमणार्या चांदण्या चंद्राभोवती असतात... कधीतरी ती पण जळत असेलच ना!
त्या दिवशी रात्री अंगणात उभी राहुन मी दोघांना पाहत होते, ती खुप उदास, थकलेली दिसत होती!
चंद्राने तिच्याकडे पहिलं, नाही म्हंट्लं तरी तो "देव" आणि तिचा नवरा, त्याने ओळखलं तिच्या मनात काय चाल्लयं ते! तो cuteसा हसला आणि तिच्याकडे बघुन म्हणाला
"हमसे यु मुह न फेरो ए हसी,
तुम्हीसे तो है जिंदगी मेरी"
"तुम्हे मेरे साथ चलना है दुरतक...
क्युकि तुमही तो हो रोशनी मेरी"
ती वेडी, लगेच फुलली आणि त्याच्याबरोबर आनंदाने चालायला लागली...
चंद्र खरचं खरं बोलत होता का?

1 comment:

Monsieur K said...

:)
jar chandra khota bol-la, tar rohini la lagech kalel.
khara mhanje rohini kinva chandra ni khara-khota cha vichaar karuch naye. fakt ek-mekaan var vishwaas thevaaychaa - adhun-madhun kadhit tari amavasya yete, pan sukhaaachaa prakash nehmi ch padat raahil :)