Sunday, December 22, 2013

Writer's Block is all शेण!

नाही लिहिलं खूप खूप दिवसात... Writer's Blockला मी कायम हसत आल्ये.. असं काही अस्तित्वात नसतं हे माझं मत होतं/आहे. sometimes you are just not yourself! मला एक मित्र म्हणाला होता "लग्नानंतर तू कसं लिहितेस बघुया"... लग्नानंतर काही विशेष फरक पडेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं... मी अधिक आळशी बनेन हे तर अजिबातच वाटलं नव्हतं. आता लिहायचं ठरवलं आहे पण मी.. जानेवारी सुरु होय्च्या आधीचं resolution वगैरे...

बरेच दिवस पाण्याची टाकी वापरात नसेल आणि मग अचानक वापरात आली कि सुरुवातीचं पाणी कसं गढूळ येतं. (ह्या analogy इतकं गढूळ ) तसं होऊ शकतं blogचं.. भंपक पोस्ट पाडू शकते मी ह्या ब्लॉगवर! त्या तश्या नेहमीच टाकत आल्ये...

----

देवयानी खोब्रागडे बद्दल मिडीया कोंबड्यांना दाणे टाकावं तश्या बातम्या उधळतायत फक्त... इतक्या इतक्या बातम्या, लेख वगैरे आलेत गेल्या आठवड्यात ह्या विषयावर की नक्की आपण काय stand घ्यावा कळलंच नाहीये मला अजून.. बरेच प्रश्नच पडतात फक्त
१. माझा काही stand असायलाच हवा का?
२. जर तिने ठरल्याप्रमाणे पगार दिला असता तर तिच्या मोलकरणीला माझ्या नवर्यापेक्षा जास्त पगार असता का? (बिचारे IT वाले.)
३. भारतातल्या तिच्या गडगंज वगैरे मालमत्तेचा अमेरिकेतल्या वागणुकीशी काय संबंध?
४. "काहीतरी हेरगिरीचा मामला असायला हवा" FBवर इतकी मौक्तिके उधळणारा माझा विद्यार्थी परीक्षेत पेपर कोरा का ठेवायचा?
५. 'मौक्तिकं' किती वेगळाच शब्द आहे न?

----

गेले काही दिवस मला "आठवणीतल्या कविता" वाचायचं आहे. लहान असताना मला विशेष नाही आवडायचा तो पुस्तकांचा सेट.. कारण अर्थात बर्याच कविता कळायच्याच नाहीत. आता जितक्या आठवतायत अर्धवट, त्या मात्र पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या  वाटत आहेत. भारतातून मागवावं लागणार पुस्तक असं दिसतंय!

----

मध्यंतरी मी मुराकामीचं एक पुस्तक वाचत होते. मला का कोण जाणे बरेच दिवस मुराकामी बाई आहे कि पुरुष माहित नव्हतं. (म्हणजे मला मुराकामी बाई वाटत होती ) आतासारखं आधी काहीही नवीन ऐकलं कि गुगल करुन बघायचं वेड लागलं नव्हतं तेव्हा.. त्यामुळे बरेच दिवस मुराकामी म्हंटलं की बॉब कट मधली जपानी बाई माझ्या डोळ्यासमोर यायची... लिहिणारा, गोष्ट सांगणारा पुरुष आहे कि बाई ह्यावरूनही काहीवेळा गोष्टीत उगाच फरक पडत असतो.
आता काही प्रश्न पडला, काही अडलं, काही आठवत नसलं.. गुगल हाताच्या बोटांवर असतं , लगेच उत्तर देत असतं.. याहू आन्सर्स वर जगातले कुठलेही प्रश्न असतात.. अगदी कुठलेही... म्हणजे काहीच्या काही कुठलेही.. "असा कोणता प्रश्न आहे का जो याहूवर नाही विचारलाय?" हा पण प्रश्न आहे याहूवर...
तर anyway, माणसाला डोक्यासाठी curiosity असणं खूप गरजेचं आहे.. आणि अनेकदा गुगलला इतका सोप्पा access असणं ती curiosity नुसती शमवत नसतो तर मारत असतो... कारण उत्सुकते इतकीच महत्वाची असते कल्पकता, सर्जनशीलता... एखादं उत्तर माहित नसताना आपण ते शोधायचा प्रयत्न करणं.. ते बनवायचा प्रयत्न करणं, आठवणं (creativityला मराठीत काय म्हणतात ते गुगल केलं मी आत्ता) ... मी मुराकामीला जपानी बॉब कट मधल्या बाईचा चेहरा दिला होता... एका जपानी आज्जीने सांगितलेल्या गोष्टी म्हणून मी मुराकामीची पुस्तकं वाचत होते.. आणि (उगाचच असेल) मला तेंव्हा जास्त आवडल्या होत्या त्या गोष्टी!

-----

हे वर्ष मस्त होतं... पुढचं वर्ष अजून मस्त असू दे.. २०१४ साठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा... (तुम्हाला दोघांनाही...)




4 comments:

Meghana Bhuskute said...

वा! मस्त संकल्प आहे. तुलाही येतं वर्ष मस्त जावो. :)

Samved said...

परत एकदा लोक लिहीताहेत बघून बरं वाटतय. लिहीत राहा. नव्या वर्षाच्या शुभेच्छा

sagar said...

संसारिक जबाबदाऱ्यामधून वेळ काढून लिहिल्याबद्दल धन्यवाद! असाच वेळ काढून भरपूर आणि छान-छान लिहावस अशी अपेक्षा करतो. शुभेच्छा!
- सगळ्या वाचकांच्या वतीने.

Vidya Bhutkar said...

Looking forward to your posts in this new year. Happy New Year. One thing I have realized is that when I am not writing, I am not thinking. But when I start writing, it initiates my thinking on every small thing. And suddenly I get too many things to write. At the same time, I lose words because they are not frequently used anymore. So you might get the same issues. :) All the best.
Vidya.