Monday, November 30, 2009

इस शहरमें ना अपना ठिकाना रहा...

तो. त्याने खांद्याला सॅक अडकवली. दाराला कुलुप लावलं. उरलेल्या दोन जड बॅगा हातात घेतल्या आणि खाली उतरला. खालच्या मजल्यावरच्या कुलकर्णी काकुंकडे किल्ल्या दिल्या. काकू अगदी मनापासुन हसल्या आणि त्याला म्हणाल्या "येत जा हो अधुनमधुन.. घर नाही असं समजु नको, सरळ आमच्याकडे यायचं. हक्काने ये हो." बिल्डींगमधुन बाहेर पडताना त्याला हसु आलं.. गेल्या २ वर्षात, तो इथे आल्यापासुन एकदाही काकू इतकं हसुन बोलल्या नव्हत्या त्याच्याशी. पद्धत म्हणुन किती गोष्टी अश्याच करतो आपण.. काकू म्हणाल्या "ये".. तो म्हणाला, "येईन".. त्याला हे मनात पक्कं ठाऊक होतं.. हे शहर परत नाहीच आणि ही बिल्डींग त्याहुन नाही.. आता इथे कशाला परत यायचं?

गल्लीच्या टोकावरच्या देवळाबाहेर तो थांबला.हा देव नवसाला पावतो म्हणतात पण ह्या देवाकडे त्याने कधीच काही मागितलं नव्हतं, ह्या देवाने दिलं नव्हतं. कित्ती काय झालं दोन वर्षात. ४ सेमिस्टर्स, असंख्य प्रोजेक्ट्स, एक प्रेमप्रकरण, २ जॉब इंटर्व्युज आणि काय काय... पण ह्या देवाचा संबंध नाही आला कशाशीच! तो जेव्हा जेव्हा ह्या देवळात आला त्याने कायम "वक्रतुंड महाकाय" म्हण्ट्लं, आज त्याला गंमत वाटली त्याच्याच वागण्याची.. त्याने प्रयत्न केला ह्या देवाचा श्लोक आठवायचा पण त्याला रामरक्षाच आठवत होती. नंतर शुज घालताना त्याला "उडाला उडाला कपि तो उडाला" आठवलं.. पण त्याला काही हा श्लोक विशेष आवडला नाही.

चालत चालत तो बस स्टॉपवर आला. आजवर एकदाही तो इथे आला नव्हता. त्याला ह्या शहरातल्या बसेस नाही आवडायच्या.. धुळकट्ट, मळलेल्या, गर्दीने भरलेल्या, कधीही वेळेवर न येणा-या, खिळखिळ्या... आणि त्यातुन त्याला कधीच नीट बसायला मिळायचं नाही आणि धड उभंही राहता यायचं नाही... तरी आज तो इथे येउन उभा राहिला. स्टेशनला जाणा-या ३ बसेस त्याने सोडल्या कारण त्यात गर्दी होती भरपुर, त्याने आज ठरवलं होतं गर्दी नसलेल्या बसमधुन मी बसुन जाणार. चौथ्या बसमधे चढला आणि त्याला जागा मिळाली. त्याच्या शेजारच्या बाकावरच्या मुलीने मोजुन सहावेळा त्याच्याकडे वळुन पाहिलं. " what is it? my post breakup glow or is it my black shirt?" त्याने विचार करत बाहेर पाहिलं.

post breakup glow..त्याला हसु आलं. ह्याच सिग्नलवरुन डावीकडे गेल्यावर कॉफी शॉप लागतं.. तिथेच यादवच्या बाईकवर बसुन ते अश्या काही आर्बिट गोष्टींवर बोलत बसायचे. दोन वर्षात तिथे येणारे बरेच चेहरे त्याच्या ओळखीचे झाले होते.. तिथे कोणी कॉफी प्यायला येत नसत..तिथे आल्यावर गप्पा मारताना काहीतरी म्हणुन लोक कॉफी घ्यायचे... मग तरी इकडेच का यायचे? यादव म्हणायचा तसं.." इथे फक्त नावाला महत्व आहे.. i think this is the most brand-conscious city... तुमच्या पॅटिस, श्रीखंडापासुन बायकांचे परकर, मुलांची शाळेची दप्तरं.. सगळ्याला ह्या शहरात brands आहेत". त्याला यादव आवडायचा, यादवच्या ह्या विचारमौक्तिकांच्या बदल्यात तो त्याला कॉलेजचे प्रोजेक्टस करुन द्यायचा... यादव त्याच्या रुमवर पडिक असायचा पण स्वतःच्या घरी त्याला दोनदाच बोलवलं यादवनं, शहराचं नाव राखलं त्यानं!

प्रेमप्रकरणात यादवने मदत केली होती त्याला.. "साले, इश्क-विश्क तेरे बस की बात नही... अभी छोड दे.. बादमे रोयेगा भाई.."... आज त्याला तिची आठवण यायला हवी होती, पण नव्हती येत. तो मुद्दामहून तिच्याबद्दल विचार करायचा प्रयत्न करत होता.. पण त्याला नेहेमीसारखं ग्लुमी वाटत नव्हतं आणि त्याला तसं आज मनापासुन वाटुन घ्यायचं होतं. स्टेशनवर उतरला. ह्या शहराबद्दलचा तिटकारा इथपासुनच सुरु झाला होता २ वर्षापुर्वी... लाईनीने उभे असणारे बिर्याणीवाले त्याला नाही आवडायचे.. स्टेशनमधे आल्यावर त्याने नेहेमीच्या टपरीवरचा चहा घेतला आणि बसला.

दर शुक्रवारी दुपारी तो इथे यायचा घरी जाण्यासाठी.. सोमवारी पहाटे घरुन निघायचा. सोमवारी घरुन निघताना त्याला जे वाटायचं ते आज इथुन घरी जाताना वाटतं आहे म्हणुन त्याला थोडं विचीत्र वाटलं. स्टेशनवर जोरात रेडिओ लागला होता. नीट मराठी येत असुन मुद्दाम अशुद्ध मराठी बोलणारी आरजे त्याच्या कायम डोक्यात जायची, ते एकमेव रेडिओ स्टेशन होतं तो इथे आला तेव्हा. "मी जात्ये गोव्याला माज्या holidays साठी.. पण my dear listeners, i will miss you.. n i will miss this awesome city, पण २ weeks मधे return येईन..." ती बोलत होती, तो ऐकत होता.. त्याने विचार केला, "miss this city? आपण काय मिस करणार? मला हे शहर नाही आवडत, कधीच नाही आवडलं , मी काय मिस करणार” तो हसला आणि ट्रेनमधे चढला..

शहर असं नाही.. पण माझी रुम नक्कीच मिस करेन.. किचनमधुन दिसणारी नदी.. यादव नाला म्हणतो त्याला! इथली थंडी, indeed most romantic winters ह्या शहरात होते...कॉलेज, प्रोजेक्ट्स, यादव नक्कीच मिस करेन.. कॉफी, कुलकर्णी काका-काकु त्याच्या बाल्कनीत उभं राहुन गप्पा मारायचे आणि आपण ते शांत उभं राहुन ऐकायचो.. ते पण मिस करेन... देउळ, आणि त्यातल्या नवसाच्या घंटा, आपण मागितलं नाही कधी पण मागितलं तर दिलं असतं त्याने, इतकी ओळख होती आता त्याच्याकडे..इथले दाबेलीवाले, इथले रिक्षावाले, इथल्या बेशिस्त ट्रॅफिकमधली शिस्त, मराठीपण आणि मराठीपण "pretend" करणारी रेडिओस्टेशन्स.. तो अजुन नवीन गोष्टींचा विचार करत होता.. त्याला हे शहर आवडायचं नाही.. अजिबात नाही.. आणि ह्या शहराचं न आवडणंच तो सर्वात जास्त मिस करणार होता. घाटात ट्रेन आली. बोगद्यातुन ट्रेन बाहेर आली... नेटवर्क परत आल्यावर त्याचा मोबाईल वायब्रेट झाला. त्याने मोबाईल काढला, पटपट कॉल लावला.. " य़ादव.. you were right.. damn you.. I hate your city.. I really hate it.. But you know what? I will miss that bloody city of urs.. no not u saale.. ur city.."


17 comments:

Deep said...

Hmmm Should i say welcome back? or missed ur posts?? or ...

Gouri said...

post break up glow :D

नावात काय आहे? said...

छान पोस्ट आवडली. भावनाही पोहोचल्या असं म्हणायला हरकत नाही. तुझ्या मनापासुन आवडलेल्या काहींपैकी हे एक पोस्ट, ये हुइ ना बात म्हणण्यासारखं. :)

Amol said...

I loved it.Thanks for the post : )

Monsieur K said...

the city's none other than pune... pattice (santosh/hindustan/poona bakeries) kinva shrikhand (chitale/amul/etc)... kharch.. pratyek goshtich branding aahe ithe.. no idea abt parkars or daptara.. actually daptara = rajivdekar :))))


hmm.. forget which city it is.. but leaving a city which has been home for 1-2 years.. which u may love to hate..

little little things (choTya choTya goshti).. memories (aaThavaNI).. saglach ekdam mast tipla aahes!

vaachun ekdam mast vaatla! :)

Smile said...

it is just like my story...ekdam ditto...vachatana ekdam bharun aale...Punyatale te divas punha aathavale aani tithale sagale mitra suddha...tyachya pramane mi suddha miss karatoy...Thanks!!

I have read all ur posts!! U r truely wonderful writer!!

Vibha said...

khup chhan zalay post..Nostalgic feel ala :)

Rajesh said...

Nice one!!...Pune sodatana kahishi ashich avastha hoti...

पूनम छत्रे said...

mastach!! agadee pochala!

annand said...

quite a level of intensity u are able to maintain thruout the post. reading you for the first time. well written!

me said...

puna for sure! i experienced identical feelings while leaving that city :D

Vinit said...

perfect !!!

Veerendra said...
This comment has been removed by the author.
Veerendra said...

मी तुला टॅगलय .. इथे !! http://manatlakahi.blogspot.com/

मंदार जोशी said...

I TAG you on my blog

संदीप वि.सबनीस said...

mast.....chan lihale ahe...avadle...janavayala hava hota asa ek sunna pana janavala...surekh likhan...
"देउळ, आणि त्यातल्या नवसाच्या घंटा, आपण मागितलं नाही कधी पण मागितलं तर दिलं असतं त्याने, इतकी ओळख होती आता त्याच्याकडे"...kya baat hain...

Medha said...

’सोमवारी घरुन निघताना त्याला जे वाटायचं ते आज इथुन घरी जाताना वाटतं आहे म्हणुन त्याला थोडं विचीत्र वाटलं. ’
Really hats off to youकित्ती बरोब्बर पकडला आहेस mood... कुठलेही ठिकाण सोडताना दूर गेल्याशिवाय... आणि no contact possible वाला एक भोगदा पार झाल्याशिवाय खरच कळत नाही नेमके काय मागे सोडुन आलो आहे.. नेहेमीच्या miss करुच करु अश्या वाटणार्या गोष्टींपेक्षा वेगळ्याच जाणीवा कासावीस करत राहातात.. पण ते समझायला मात्र दूरच जावे लागते..
बाकी लेख एकदम सुंदर.. त्याच्या डोक्यातल्या भिरभिरी सारखे भिरभिरायला झाले एकदम...