Wednesday, September 16, 2009

आनंद

मी त्याला एकदाच भेटले. तेसुद्धा फक्त २ तास बोलणं झालं... म्हणजे २ तास तो बोलत होता मी ऐकलं. पण उसमें कुछ बात थी! भन्नाट माणुस होता. मला इतके दिवस गर्व होता की मी कितीही बडबडु शकते... खूप खूप बोलु शकते अगदी non-stop वगैरे.. पण साडेसाती संपता संपता शनिने आनंदला भेटवुन माझं गर्वहरण केलं. Boss.. 2 तास एका अनोळखी माणसाशी बोलणं, ते सुद्धा अगदी प्रामाणिकपणे.. परीक्षेच्या दिवशी..महान होतं ते! काही माणसं बघुनच कशी आहेत ते कळतात..म्हणजे त्यांच्या डोळ्यांना खोटं बोलताच येत नाही..तसे आनंदचे डोळे होते. कित्ती प्रामाणिक, साधे... किती भोळा माणुस आहे तो!

परीक्षेसाठी मी सेंटरवर गेले आणि नोटिस बोर्डावर माझा नंबर बघत होते. तो तिथे बाजुलाच उभा होता.. अगदी कोणाचंही त्याच्याकडे लक्षसुद्धा जाणार नाही असा दिसणारा.. मी नंबर बघुन माझ्या exam hall कडे निघाले.. तो पण मागुन आला... "कुठे आलाय तुमचा वर्ग?"
मी वळुन पाहिलं फक्त.. "बेसमेन्ट"...
त्याला लगेच आनंद झालेला दिसला.. "माझा पण तिथेच आलाय नंबर.. कुठे असतं ते माहित्ये का?"
म्हणजे मी शिष्ठ नाहीये आणि मुद्दामहुन पण तसं करत नाही पण माझी एक भुवई उंचावली गेली.. बब्बा.. तू इथे इतकी मोठी परीक्षा द्यायला आला आहेस.. बेसमेन्ट नाही माहित? .. " हे काय इथे खाली जाउन.. लिहीलं आहे तिथे बेसमेन्ट म्हणुन".. तो हसला आणि म्हणाला "हो का? असेल.. कोणत्या वर्गात आलाय तुमचा नंबर?"
"तीन नंबर खोली".. तो परत हसला... त्यांच्या हसण्यामधे काहीतरी वेगळं जाणवलं मला.. पण तेव्हा कोणाचं analysis करण्याचा mood नव्हता..
"अभ्यास झाला का तुमचा? माझा नाही झालाय नीट.. पत्रकारितेचा इतिहास वाचलात का? महत्वाचा भाग आहे.. त्यावर येतात प्रश्न.. काय वापरुन केलात तुम्ही अभ्यास?"
" मी college notes फक्त"
तो परत हसला...

मी माझ्या जागेवर येउन बसले.. त्याची जागा खरं तरं खूप पुढे होती पण तोसुद्धा आला माझ्या बाजुच्या बाकावर.
" अश्या ओळखी झाल्या ना की बरं असतं.. contacts निर्माण होतात. एकमेकां साह्य करु म्हणतात ना..तसं , म्हणजे आता उद्या विद्यापीठात काही काम असेल तर मला सांगु शकतेस.. मला काही मदत हवी असेल तर मी तुला विचारु शकतो.. मला ना ह्या क्षेत्रातलं काही माहित नाही..म्हणुन मी मैत्री केली तुझ्याशी..नवीन गोष्टी कळतात नवीन माणसं भेटली की"... मी बघत होते फक्त त्याच्याकडे.. गाडी तुम्ही वरुन तू वर आली.. मैत्री पण केली? मला खरं तरं हसुच येत होतं.. पण मी फक्त "हो बरोबरे" इतकंच म्हणाले.
"माझं नाव आनंद.. तुझं काय आहे?" असं म्हणुन त्याने हात पुढे केला.. मी (again m not at all शिष्ठ) हात नाही पुढे केला फक्त माझं नाव सांगितलं.. आता तो बिचारा हसला आणि पुढे केलेल्या हाताचं काय करायचं ह्या विचारात पडला.. मग मलाच वाईट वाटलं आणि मी handshake केला. मग तो परत मोठ्ठं हसला... हां, आता कळलं त्याच्या हसण्यात काय वेगळं आहे ते.. तो हसताना त्याचे खालचे-वरचे सगळे दात दिसतात.. (माझे फक्त वरचेच दिसतात.. तुम्ही पण हसुन बघा.. म्हणजे पाहिलं असेलचं एव्हाना :P )

5'5''-6'' वगैरे उंची, दाढीचे खुंट वाढलेले, मिशी, बारीक डोळे, व्यवस्थित कापलेले केस, पांढरा सदरा आणि मातकट पॅंण्ट... त्याच्यासारखी दिसणारी ६७ माणसं असतील एखाद्या ST standवर... पण त्या ६७ माणसांपासुन ह्याला काही वेगळं करत असेल तर त्याचं मनापासुनचं मोठ्ठं smile..
"वडील काय करतात तुझे?.. ओह चांगलं आहे.. भाउ-बहिण कोण? फक्त एक बहिण? आधुनिक दिसता म्हणजे तुम्ही..चांगलं आहे. मी सोलापुरचा आहे.. आमची शेती आहे तिथे. मी आधी मराठीत MA केलं आहे.. आणि आता पत्रकारिता" हा माणुस बोलतच राहिला.. मी फक्त उत्तरं देत होते तो विचारत होता त्याची.. आणि "हो बरोबरे" एवढंच.. म्हणजे त्या पलीकडे मला बोलायला काही chanceच नव्हता. घरुन निघतानाचं परीक्षेचं tension ह्याच्या बडबडीमुळे कुठच्या कुठे गेलं होतं. तो त्याच्या बाकावर जायला निघाला आणि एकदम थांबुन म्हणाला.. "तुझी पिशवी आहे ना? माझी वही ठेव त्यात"... दिपीकाला मी अजुन सांगितलं नाही आहे की तिच्या नवीन trendy college bag ला एक मु्लगा पिशवी म्हणाला... "best of luck.. पेपर झाला की बसुया एकत्र म्हणजे जरा चर्चा करता येईल नं" असं म्हणाला तो पुन्हा एकदा सगळे दात दाखवुन.. मी जरासं smile दिलं.. "best of luck"... त्याच्या बाकावर बसल्यावर परत एकदा त्याने मागे वळुन पाहिलं आणि हसला... मी किती sad आहे म्हणजे मी किती कमी हसते ते मला एकदम तेव्हा जाणवलं.

माझा पेपर तसा लवकर झाला.. मी बसले होते अशीच. आनंद लिहीत होता, मधेच त्याने इथे-तिथे पाहिलं ..मी तशीच बसल्ये हे पाहिल्यावर त्याचे बारीक डोळे जेवढे मोठे होऊ शकतात तेवढे मोठे करुन .. "झाला?" असं विचारलं. मी मान हलवली.. ती सुद्धा किती थो्डीशी...आणि त्याचा पेपर लिहीणं सुरु असुनसुद्धा तो किती मनमोकळं हसला... त्याच्या आई-बाबांनी अगदी बरोबर नाव ठेवलं आहे त्याचं.
एक पेपर झाल्यावर दुसरा पेपर सुरु व्हायला दिड तास वेळ होता. बाहेर पडतानाच त्याने विचारलं.. "शेवटच्या प्रश्नाचं काय लिहीलं उत्तर?" मला दडपणचं आलं.. बापरे आता हा चर्चा करणार की काय? पण मी उत्तर द्यायच्या आधीच तो बोलायला लागला " मी तिसरा पर्याय लिहीला.. तोच आहे बरोबर पण म्हणजे वर्तमानपत्र आणि त्याचे संपादक पाठ केले होते.. तसा चांगला होता नं पेपर? आता पुढचा कसा जातो बघायचं, वेळ आहे अजुन.. बसुया कुठेतरी.. काही खायचं आहे का तुला? मला नकोय काही.. एखादं फ्रुटी प्यायलं तरी बास होतं.. पण आत्ता बसुया जरा.. जरा बोलु आणि मग बघुयात. तू बस मी आणतो एक पुस्तक मित्राकडुन.. तो दुस-या वर्गात होता...." आणि मी म्हंटलं.. "हं..ये"

"आमचं गाव अक्कलकोट, पंढरपुर आणि तुळजापुर पासुन प्रत्येकी ४० किमीवर आहे. ये कधी गावाला आमच्या.. अक्कलकोट्ला घेउन जाईन तुला.. तिथे गेल्यावर काहीतरी वेगळंच वाटतं बघ.. म्हणजे सांगता येत नाही. आपल्याबरोबर कोणीतरी असल्यासारखं.. माझी स्वामींवर खुप श्रद्धा आहे. आपण कष्ट करतो पण शेवटी फळ मिळण्यासाठी बरोबर कोणीतरी असावं लागतं. स्वामी मदत करतात, मी गावाला गेलो की जाउन येतो दोस्तांसोबत स्वामींच्या दर्शनाला"... मला एकदम तो टिळा लावुन वगैरे दिसायला लागला "तू धार्मिक दिसतेस.. घरी आई-वडिल, आजी-आजोबा करत असतील ना देवाचं.. म्हणजे रामायण-महाभारत वाचत असतील ना?" इतका वेळ मी हसले नव्हते पण आत्ता हसले.. "नाही मी इतकी नाही.. बाबा वाचतात".. रामायण-महाभारत.. :)

मी आईला कॉल केला मधेच.. बोलुन झाल्यावर हा सुरु झाला "तुला सांगतो तेजश्री... (मला सॉलिड्ड राग आला होता. पण काही बोलले नाही) आमच्या गावात अजुन वीज नाही. कोम्प्यूटर सोड मला मोबाईलही अजुन वापरता येत नाही. म्हणजे आजच्या भाषेत MA करुनही मी अशिक्षीत आहे बघ. मी मराठीत MA केलं.. पण पुढे काय करणार? phd करुनही पुढे काय? म्हणजे उगाच इतकं शिका..आणि पुढे काय उपयोग? म्हणुन हा पत्रकारितेचा कोर्स केला.. विद्यापीठात राहतो मी.. आमची शेती आहे ६ एकर उसाची.. भाऊ नोकरी करतोय त्यामुळे शिकु शकतोय.. म्हणजे तसं चांगलं आहे. पण अपराधी वाटत राहातं.. रोजचा बस, जेवणाचा खर्च वगैरे धरुन २५-३० रुपये होतात. आई आठवड्यातुन एखादवेळा फोन करते.. विचारते कसं चालु आहे? नीट जेवतोय्स ना?.. खुप वाईट वाटतं. ते आपल्यासाठी इतकं राबतात आपण काहीतरी करायला हवं.. म्हणुन मला प्राध्यापक होयचं आहे. तेवढाच आईला अभिमान पोरगा प्राध्यापक झाला! गावात असं शिक्षणाचं वातावरण नसतं.. झालाच तर पोरगा शिक्षक होतो. पण इतक्या शिक्षकांना नोक-या द्यायला शाळापण हव्यात ना.. मला दहावीत असताना ७२% मिळाले. तेव्हाच ठरवलं प्राध्यापक व्हायचं, काहीतरी करायला हवं.. त्यांच्यासाठी." त्याच्या डोळ्यांत कळवळ दिसत होती. किती वेगळी जगं आहेत आमची...मी काही बोलणार तेवढ्यात तो परत सुरु झाला..
"अगं पण हे कळत नाही आजच्या मुलांना.. तुला सांगतो तेजु ( तेजश्रीपेक्शा तेजु बरं होतं) विद्यापीठातलं वातावरण इतकं वाईट आहे.. परवाची गोष्ट आहे..आम्ही कॅण्टीनमधे बसलो होतो. एक मुलगी रडत होती आमच्या बाजुच्या टेबलवर तिचा प्रियकर असावा सोबत. तो तिला काहीतरी सांगत होता, आणि ती रडत होती.. ह्या पोरींना उध्वस्त होण्यात काय मिळतं? त्या शिकायला आलेल्या असताना प्रेमात पडतात.. त्यांना कळत नाही जेवढं उडाल तेवढं जोरात आपटाल.. कळत कसं नाही ह्यांना? माझी बहीणीने असं काही केलं असतं तर मी तिला एक दिली असती लगावुन.. उध्वस्त होण्याची ओढ.. दुसरं काय?" माझा चेह-यावर मी सिरिअस भाव ठेवले होते.. पण मनात ह्सत होते.. मला आवडलं.. ’उध्वस्त होण्याची ओढ’
"माझ्या मागे लागली होती एक मुलगी.. विश्वास नाही बसणार तुझा" hehe.. आता हे interesting होतं.. " अगं, माझ्या मागे लागली.. मी संयमाने वागुन होतो. कारण मला माहित होतं एकदा ह्यात पडलो की उध्वस्त होऊनच बाहेर पडतो माणुस.. मी तिला जरा चांगल्या गोष्टी सांगायला लागलो.. तिला म्हणालो.. अभ्यास कर.. मी friendship देउ शकतो. पण १४ फेब्रुवारी ला प्रपोजचं मारलं कि तिनं मला... " बाबाबाबास्स्स... मला sollidd हसु यायला लागलं.. तो कसला blush होत होता हे सांगताना..किती निरागस..
" मी आधी नाहीच म्हणालो.. पण मग म्हणालो.. माझ्यामुळे सुधारेल मुलगी...पण कुठचं काय? अगं एक दिवस म्हणाली बागेत जाउया.. तिथली जोडपी बघुन मला कसंतरीच वाटलं.. शिकायला येता विद्यापीठात का आसं काही करायला? मी निघुन आलो तिथुन.. तिला म्हणालो जरा दिवस थांबुया.. प्रेम खरं असेल तर काही होणार नाही.. २-३ महिने गेले मधे.. मी सुट्टीसाठी गावाला गेलो.. शेवटी मी पण माणुस ना.. मला पण तिच्याबद्दल वाटायला लागलं.. परत आलो तेव्हा मित्र म्हणाला ती दुस-याबरोबर असते..आणि त्याच संध्याकाळी दिसली ना दोघं एकत्र.. मी सरळ गेलो आणि थोबाडीत मारली तिच्या.." काय्य? मी त्याला परत विचारलं.. "काय केलंस तू?" म्हणजे हे भन्नाटच होतं..
"मारलं.. आणि हेसुद्धा म्हणालो.. तुझा अपमान झाला असेल तर ह्यापेक्षा जास्त गर्दी असताना दोन्ही गालांवर मार माझ्या.. बदलाच घ्यायचा असेल तर.. पण तुला परत काही करता येत नाही.. प्रेम पण परत नाही करता आलं.. पण आत्ता मी तुझं प्रेम तुला व्याजासाकट परत केलं... आणि निघुन आलो तिथुन मी" मला एकदम आदर वाटायला लागला त्याचाबद्दल.. कसला माणुस आहे.. काहीही करतो..आणि कोण कुठली मी .मला अगदी लहान मुलं गोष्ट सांगतात तसं सगळं सांगत होता.

"तुझा नंबर देउन ठेव.. संपर्कात राहुया आपण" तेवढ्यात पेपरची बेल वाजली, आम्ही आत गेलो.. त्याने सगळे दात दाखवुन परत एकदा best of luck दिलं. मी पण हसुन बघितलं. पेपर झाल्यावर खुप जोरात पाऊस पडत होता. बाबा घ्यायला आले होते मला.. त्याला म्हणाले चल स्टॅण्डपर्यन्त सोडते तुला.. बाबांनी विचारलं मला "कसा होता पेपर?" मी म्हणाले "चांगला होता".. तेवढ्यात आनंद लगेच म्हणाला "पुढच्या वेळी नक्की पास होईन हा विश्वास आहे मला"... मग मी बाबांशी बोलत राहिले. त्याची उतरायची जागा आली.. तो उतरला..पाउस होता त्यामुळे पळत पळत आडोश्याला जाउन उभा राहिला... आणि तिथुन हात हलवला.. मला एकदम लक्षात आलं की त्याला आपण फोन नंबर दिलाच नाही.. पण तेव्हा उशिर झाला होता. मी पण फक्त हात हलवला.. त्याने त्याचं मोठ्ठं smile दिलं..

पुन्हा कधी तो भेटेल माहित नाही.. जेव्हा कधी भेटेल तेव्हा मी आपणहुन जेवढं मोठं smile देउ शकते तेवढं देईन.. :)



34 comments:

Ashish Sarode said...

Solid लिहिल आहेस.
व. पु. न्च पुस्तक वाचत असल्याचा भास झाला २ मिनिट

Abhijit Bathe said...

कमॉन मॅन! व.पु!!
Now thats not a compliment!!!
कॉम्प्लिमेंट द्यायचीच असेल तर आपण जास्वंदीला एम भलंमोठं स्माईल देऊयात. दोन पेपरांच्या मध्ये मला उगीच तिची गाडी ’उध्वस्त विध्वंसाकडे’ तर चालली नाहिए ना - असा संशय यायला लागला होता! :))
बहुतेक पाऊस आणि बाबांनी वाचवलं तिला :)))))

Unknown said...

Sachi ahe tuzhe Post !!!
Keep Writing
As Abhijit said, this is for u...

:) :) :) :)))))

साधक said...

तेजश्री छान लिहिता तुम्ही ! :)

Vidya Bhutkar said...

:ड वाचताना उगाचंच गिल्टी वाटत राहिलं आपण त्याच्यापे्क्षा किती ’चालू’ आहोत असं वाटून. खूपच छान लिहिलं आहेस. त्याचं हसू तुझ्या शब्दांतून एकदम स्पष्टं दिसलं. खरंच अभिजीत म्हणाला तसं, नंबर दिला असतास तर तुझी गाडीही गेलीच असती विध्वंसाकडॆ. :-)
हा ’आनंद’ नक्कीच लक्षात राहील खूप दिवस. भेट्ला तर मलाही नंबर दे. ;-)
-विद्या.

Ashish Sarode said...

माझ मत अजूनही तेच आहे.

व. पु. न्शी तुलना तेजश्री :D ची केली आहे, आनंद ची नाही. आनंदची तुलना सखाराम गटणेशी होऊ शकते कदाचित.
जाऊदे, जास्त तुलना न करता थांबवतो :)))))

परीक्षेच्या वेळी मी पण वैतागलो असतो अशा माणसाशी बोलून, पण अशा माणसांशी बोलून चांगल वाटत मला.

समीक्षक said...

हे खरं आहे की काल्पनिक आहे असा संभ्रम निर्माण झाला. असा संभ्रम निर्माण होणं हा लेखकाचा पराभव आहे असे मला व्यक्तिशः वाटते. आपले लिखाण चांगले असते, वाचावेसे वाटते, पण ते लिखाण चांगले असते म्हणून वाचावेसे वाटते की आपण लिहिता म्हणून वाचावेसे वाटते हे अजून नक्की समजलेले नाही. लिखाणात आत्ममग्नता नेहमीसारखीच डोकावली. हे चूक की बरोबर ते आपले आपण ठरवणे. लिहिता लिहिता आपण स्वतःवरतीही टिप्पणी करत गेलात. ती का ते समजले नाही. आनंदबद्दल अधिक समजले की आपल्याबद्दल ते मला समजले नाही. असो, प्रयत्न चांगला होता, पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

Jaswandi said...

@ Ashish.. Thank you

@ Abhijit Bathe... :)) एवढं ऐकल्यावर नाही जायची आता गाडी उध्वस्त व्हायला.. :)

@ Mahesh.. Thanks for ur comment

Jaswandi said...

@ साधक.. :)

@ Vidya.. :) मलाही खूप गिल्टी वाटलं गं..
आणि नंबर मिळाला तर नक्की.. ;)

@ समीक्षक..तुमच्या समीक्षेसाठी धन्यवाद.. आत्ममग्नता कायमच येते माझ्या पोस्ट्समधे.. पुढच्यावेळी प्रयत्न करेन चांगलं लिहीण्याचा :)
तुमचं लक्ष असु द्या ह्या ब्लॉगवर :)

Yawning Dog said...

2-3da vachala, ekdum bharee lihilay !

Sneha said...

lai bhari..:)

Jaswandi said...

@ Yawning Dog.. Thank you :)

@ Sneha... :) Thanks :)

ani @ doghahi... tumhi liha ki rao ata.. kiti diwas nahi lihilay

Shardul said...

आवडलं लिखाण.. समोर घडल्यासारखं दिसत होतं डोळ्यासमोर.. :)

Samved said...

EKDUM SAHHHHHHHHHHIIIIII

दीपिका said...

sahi!!
kharach dolyasamor sagla disla..

:)

Jaswandi said...

@ Shardul, Samved and Dipika

Thanks a lot :)

Unknown said...

too good yar....how can you, rather how can anybody write such things !!!

Rajesh Mhatre said...

तुमचा "आनंद " थोड़ा नेहमी पेक्षा वेगळा वाटला...का कुणास ठावुक पण
ज़ास्वन्दि टच थोडासा कमी पड़लेला…[:)] .. मागच्या पोस्ट मधले "सावरी" एकदम उत्कृष्ट .. आणि. “म्याव” “Feeling Blue” “Valentines day” झकास... कदाचित् "सावरी" सारखे लेख वाचण्याचि सवय झाली आहे म्हणुन “आनंद” बद्दल वाटले असे. . expecting much better next time….[:)]

Abhi said...

kya baat hai!!! chan!!!

HAREKRISHNAJI said...

happy dasara

Dk said...

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! :)

saurabh V said...

मला राजेश खन्नाचा "आनंद" आठवला - "बाबूमोशाऽऽऽऽऽऽऽय!" छान लिहिलं आहेस! नेहमीप्रमाणेच!

Unknown said...

ek number!

Jaswandi said...

@ Vinit, innocent warrior, abhishek .. Thank you :)

@ Deep आणि harekrishnaji.. tumhalahi khup shubhechchha

@ Saurabh..धन्यवाद बाबा :)

Jaswandi said...

@ Rajesh.. जास्वंदी टच म्हणजे नक्की काय? m glad that you have "much better expectations" वगैरे.. पण तरी शंका-निरसन करावं :)

Rajesh Mhatre said...
This comment has been removed by the author.
Rajesh Mhatre said...

एखादि गोष्ट कमी शब्दात सांगण्याचि कला...

Jaswandi said...

:) will try that :)

अभिजीत गोंधळेकर said...

तेजु एकदम सही पोस्ट. असच लिहित जा... आम्हालाहि कधी लिहण्याची प्रेरणा मिळेल त्यामुळे...

Vijay Deshmukh said...

आज पहिल्यांदाच तुमचा ब्लॊग वाचला. "आनंद" आवडला.

असेही लोक अजुन आहेत याच समाधान वाटलं. खर तर अनोळखी माणसाने खुप बोल्लव असं तुमच्यत काही असावं, I don't know.

Best Wishes....

Sarang Gujarathi said...

तेजु अगदी छान लिहिले आहेस.

sagar said...

:D

Unknown said...

Kya Baat...........
Kya Baat..............
Kya Baaat.................
Khup Chan Watala.

Unknown said...

Tejshri(TEJU heych Chan Watata) Khuup bara Chan Lihita Tumhi,khup bara Watata, Sagali Margal zatkun takata tumacha Likhan.....