गेले २-३ दिवस खूप कंटाळ्यात घालवले, कंटाळा म्हणण्यापेक्षा अस्वस्थतेत घालवले. अंगावर आलं होतं सगळं, लोकं बेजबाबदार, unreasonable वागत होती. सगळ्यातुन बाहेर यायचं होतं ... पण तरीही बाहेर पडायचा मुड नव्हता. त्यातुन आमच्या एरिआत नवरात्रीमधे जत्रा असते. ९ दिवस माणसंच माणसं, गर्दी, फेरीवाले, गाड्या आणि सगळ्याचा आवाज.. भयानक कंटाळा आला होता!
पण तरीही बाहेर पडले...गर्दीतुन वाट काढत, माणसांमधुन चालत मी पुढे जात होते. I hate it when people walk real slow and that too in groups! चमचमत्या साड्या नेसुन, नटुन-थटुन आलेल्या मुलींचे घोळके डोक्यात जातात राव.. अगं बायांन्नो मज्जा करा, खरेदी करा, धमाल करा, खा-प्या.. वाट्टेल ते करा.. पण अशी वाट अडवु नका गं.. जरा, म्हणजे अगदी जर भराभर चाला की.. बरं slow चालायचं आहे? चाला.. हळू चाला. पण मग निदान रस्त्याच्या कडेने तरी चाला ना पोरीन्नो.. राग राग होतो अगदी!
असे मंद घोळके पाहिले की आमचं पुणं आठवतं ( कसलं सहजपणे आमचं पुणं लिहीलं मी.. आवडलं मला) . तुळशीबागेत, मंडईत, लक्ष्मी रोडवर असे मंद घोळके फिरत असतात पण तिथे कोणालाच विशेष घाई नसते त्यामुळे कितीही हळू चाललं तरी त्रास होत नाही. तिथल्या हवेत आहे तो मंदपण, पण छान असतो तो.. पुण्याबाहेरच्या लोकांनांच त्रास असतो.. उगाच नावं ठेवत असतात. आई गं, पण मी तरी कुठे पुण्याची आहे? हे असं confusion कायम होतं माझं मी कुठली आहे हे ठरवताना.
तोच विचार करत मी पुढे चालले होते. तेव्हा एका कपड्यांच्या दुकानासमोर एक आई आणि सुप्पर्रगोड छोटीशी मुलगी, त्या मुलीसाठी छानसा, cuteसा, छोटासा स्कर्ट घेत होत्या. ते इतकं cute होतं की नकळतपणे मी जरा मोठयानेच म्हणाले "कसलं गोड" . ती आई मा्झ्याकडे बघुन हसली. व्यवस्थित घारी-गोरी असुन हसली ह्याचं मला आश्चर्यच वाटत होतं. मी पण हसले मग...
तिथुन पुढे वळल्यानंतर पाणीपुरी-भेळपुरीच्या गाड्या दिसायला लागल्या आणि एकदम भुक लागल्याचं जाणवलं. भुक म्हणजे अगदी भुक नाही पण शरीराला पाणीपुरी-शेवपुरी-भेळ वगैरे अश्या उघड्यावरच्या अन्नाची deficiency जाणवायला लागली. १-२ प्लेट पाणीपुरी कोणीही खातं राव.. म्हणजे खायलाच पाहिजे. पण एका पाणीपुरीवाल्याकडुन २ प्लेट खाउन "तिखा बनाया भैय्या" सारखं हिंदी फाडत त्याच्यासमोर दुस-या पाणीपुरीवाल्याकडुन मिडीयम पाणीपुरी खायला मज्जा येते. पाणीपुरी खाल्यानंतर डोळ्यांतुन पाणी आलं तरचं ती पापु best असते. तृप्ती आणि आनंदाश्रु at their best असतात तेव्हा!
थोडं पुढे गेल्यावर गर्दी वाढली. खुप फेरीवाले होते. काय काय भारी भारी विकत होते. खेळणी, गाड्या, फुगे, पिपाण्या, धनुष्य-बाण, टोप्या, खोटे दागिने, घड्याळं, पिना-बिना, दिवा लागणारं पेन, रेडियम ची खेळणी, पिसांची पेन्सिल, शाकालाकाबुमबुमच्या पेन्सिली आणि खूप काही. भविष्य सांगणारे रोबो होते, आकाशपाळणे, टोरो-टोरो, ट्रेन, आकाशात उंच उडणारे आणि दिवा लागणारे चेंडु फेरीवाले उडवुन दाखवत होते, मेंदीचे ठसेवाल्या बायका, फुलंवाले, खाजा, सुतारफेणी, बदाम हलवा आणि तत्सम मिठाईवाले, सगळीकडे गलका.. सगळे आपापली वस्तु जोरजोरात ओरडुन विकायचा प्रयत्न करत होते. मी हरखुन गेले होते, माझ्यातली लहान तेजु उड्या मारुन मला सांगत होती "बाबा नाहीयेत ना आत्ता इथे.. घे की तुला हवं आहे ते बिन्धास्त.." काय काय होतं तिथे. इथे तिथे बघत असताना अचानक माझं लक्ष गेलं साबणाच्या फुग्यांकडे.. लहानपणापासुन आत्तापर्यंतचा माझा सर्वात आवडता खेळ.. साबणाचे फुगे. त्या बाईच्या दिशेने जायला लागले आणि दिपीकाने आडवलं "ताई उगाच काय काहीतरी? वेडी आहेस का? लहान आहेस का आता?" मी इतरवेळी तिला दचकुन असले तरी मी ह्यावेळेला तिचं ऐकलं नाही मी त्या बाईकडुन ८ रुपयांची साबणाच्या द्रावणाची डबी घेतली. बाबा पुर्वी घेउन द्यायचे तेव्हा जसा आनंद व्हायचा तसाच आनंद झाला.. भारी वाटलं, एकदम भारी!
लहान मुलांसारखं ते विकत घेतल्यावर रस्त्यावर फुगे उडवणं बरं नसतं दिसलं म्हणुन पटापट घरी चालत आले. घरी आल्या आल्या चपला उडवुन पिशवीतुन डबी काढली आणि साबणाचे फुगे बनवायला सुरुवात केली.. कसली मज्जा आली राव.. काय ना त्या फुग्यांचं आयुष्य.. काही क्षणाचं.. माझ्या बदलत्या मुड्सप्रमाणे.. कंटाळा, राग, confusion, आश्चर्य, आनंद... एक फुगा फुटुन लगेच दुसरा उडणार..
काही वेळासाठीच पण खुप आनंद देणारे आणि मग काही हवेत विरुन जाणारे तर काही फुटुन जाणारे.. डोक्यातल्या असंख्य विचारांसारखे..
त्यांच्यातल्या वेगवेगळ्या रंगांच्या छटा, लहान मोठे आकार, काही खुप दुर उडणारे काही जवळ्जवळ राहणारे.. माझ्या आजुबाजुच्या लोकांसारखे.. त्यांच्या आठवणींसारखे!
जोरात फुंकर घातलीत तर भर्रकन अनेक लहान फुगे उडतील. हळुवार नाजुकपणे फुंकर मारलीत तर मोट्ठा छान जास्त वेळ टिकणारा एखादा फुगा तयार होईल. Time, patience, commitment आणि relationship ची गणितं एका क्षणात समजावुन सांगणारे फुगे.
असाच एक मोठ्ठा फुगा मी हळुवार फुंकर घालुन तयार केला आणि मग तो उडायच्या आधीच त्याला माझ्या हातानी फोडला... माझा २-३ दिवसांचा कंटाळा हवेत विरुन गेला.
(ही पोस्ट अपुर्ण आहे, random आहे, पण तरीही publish करावीशी वाटली म्हणुन..)
19 comments:
Jatreche varnan chhan ahe.
Mala pan lay avdayche sabanache fuge udvayla. Poodhchyaveli japun udav, dolyat gele tar dole churchutat
*
(ही पोस्ट अपुर्ण आहे, random आहे, पण तरीही publish करावीशी वाटली म्हणुन..)
asech ardhavat publish karat ja.
**
पापु!?!?!?!?
ugggh .. he kaay khaas punekari term aahe ka ?
साबणाचे फुगे.....माझ्या मुलांचा आवडता खेळ...आणि थांबा मी शिकवते म्हणत मधेमधे लुडबुडणे हा माझा छंद....माझी लेक त्याला ’फुगा’ म्हणु की ’बबल’ अशी गोंधळूण गेल्याने ’फुगल’ म्हणते....मग त्या डबीतलं पाणी संपल की ते लाडिगोडी लावतात अजुन पाणी बनवून दे म्हणुन....
तुझे वर्णन वाचले आणि डोळ्यासमोर भविष्यातली माझी लेक आली!!!
पोस्ट अपुर्ण आणि रॅंडम वाटत नाही. फक्त कन्क्लुड केलेली नाही. म्हणजे दुसरा भाग येणार तर.. :)
"जिवनाचा संपुर्ण आनंद उपभोगायचा असेल तर स्वतःमधली ’ती’ लहान मुलगी नेहेमी जिवंत ठेवा." :P
छान post आहे :)
sahi jhalay. agdi fresh utsahi vatala vachun. pan he post vachlyavar tujha adhich post rahila hota vachayacha te vachala ani te hyapeksha jast avadala. te post ati sunder lihila ahes tu!!!
"व्यवस्थित घारी-गोरी असुन हसली" :P :P
Nice observation !!!
छान आहे ... असे मंद घोळके पाहिले की आमचं पुणं आठवतं ( कसलं सहजपणे आमचं पुणं लिहीलं मी..आवडलं मला) . …हे असं confusion कायम होतं माझं मी कुठली आहे हे ठरवताना....:-)
एक फुगा फुटुन लगेच दुसरा उडणार..
काही वेळासाठीच पण खुप आनंद देणारे आणि मग काही हवेत विरुन जाणारे तर काही फुटुन जाणारे.. डोक्यातल्या असंख्य विचारांसारखे..
छान लिहलेस...
आमचं पुणं आठवतं >>>hehehe sahiyee mand naahi taree pan santh vaate pune pan majjaa aahe hyaat hi mumbai chya fast life chee savy aahe ajun pan ha halu halu janara vel hi sahi vaatto kadhi kadhi.
"व्यवस्थित घारी-गोरी असुन हसली" hahahahaha
"जोरात फुंकर घातलीत तर भर्रकन अनेक लहान फुगे उडतील. हळुवार नाजुकपणे फुंकर मारलीत तर मोट्ठा छान जास्त वेळ टिकणारा एखादा फुगा तयार होईल. Time, patience, commitment आणि relationship ची गणितं एका क्षणात समजावुन सांगणारे फुगे." WOW tuze pan shevtchee vaaky quote karaveeashi hotaayt :)))))))))))))))))))))
bhari lihilay...
arr tu kokanast fuge try keles?
kokanast fuge >>> te kase kaay try karayche? ;)
@ Yawning Dog.. Thank you, shall take care :)
अर्धवट publish करायला मज्जा येते राव
@ devdatta..आम्ही आधीपासुनच पापु म्हणतो :) जसं कच्छी दाबेलीला कदा म्हणतात.. SPDP असते..बहुतेक पापु पण असेल पुणेरी.. कल्पना नाही
@ sahajach.. :D.. thanks for ur comment, छान वाटली वाचुन :)
@kayvatelte.. :) बहुतेक नाही यायचा दुसरा भाग :)
@ Ashish Sarode.. Thank you :)
@ vinit.. :), thanks
@ tulip, thanks a lot :) tujhi comment pahili na ki khup chhan vatata :)
@ sneha, kay rao.. jaat kadhate kay? hehe.. kelyet na try.. Yogeshchi post na ti koknasthi fuge vali? hehe.. sollidd hota te :)
Rajesh, Murkhanand,.. thank you :)
@ rajesh.. ala kay jaswandi touch?
@ Deep.. thank you :)
Yogesh Damlecha blog vach.. tyavar tyane koknasthi fugyanvar ek post takalye.. bharee ahe :)
mastach!!!
Arrre kitti sahi post aahe.
I knw its too late to give comment.............but still
Jatrche varnan ekdam bharri...
Mukhyatve evdha ushir houn suddha mi comment lihityey yache kaaran mhanaje mala zalela ANAND
Mi kaahi divasanpoorvi eka exhibition madhun naa sabanaache fugge udavanyaache khelane ghetale(hattane) Battary war chalanaare.
Aani kitti tikelaa tond dyave laagale mala sagalyanchya ....... shyaa...
Pan he vaachoon prachand aanand zala ki mazya sarakhe konitari aahe hya jagaat.
श्या राव मला तुझी पोस्ट enjoy करताच नाही येत...
कुठेतरी आडवाटेला/आडवाक्याला आदळतोच (असाच एक मोठ्ठा फुगा ....)...
बाकी त्यांची analogy मस्त दाखवलीयेस ..
माजिदीच्या साबणाच्या फुग्यांचा scene शोधला पण नाही मिळाला :(
Post a Comment