Sunday, March 22, 2009

लेले... तेजस्विनी लेले!!

कित्तीतरी दिवसांपासुन बोटांना अडवुन ठेवलं होतं हे नाव टायपण्यापासुन ह्या ब्लॉगवर... पण आज राहवलचं नाही!
इतकं छान, मस्त, दणदणीत नाव असताना..जास्वंदी काय? म्हणजे मला जास्वंदाची फुलं आवडतात पण स्वत:च्या नावापेक्षा जास्त नाही. आज आत्ता मी स्वत:ला जेम्स बॉंन्ड्सारखं "लेले...तेजस्विनी लेले..." असं नाव सांगताना imagine केलं आणि माझी मला solliidd आवडले.. ( नेहेमीसारखीच :) ).

बरं पण मग "जास्वंदी हे नाव का घेतलं होतस?, anonymous का होतीस?, आता का नाहीस?, ह्या पोस्ट्नंतरही ब्लॉगवर जास्वंदीच नाव आहे..असं का?,..." वगैरे वगैरे अनेक प्रश्न सहाजिकच डोक्यात येतिल तुमच्या... (असे कसे नाही आले? यायलाच हवेत!) पण सध्या ह्यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायल्या माझा mood नाही आहे..खोटं का बोलु? मला ह्या प्रश्नांची उत्तरं ठाऊकच नाही आहेत! त्यामुळे हा भाग विसरुन जाऊयात... तर माझं नाव तेजस्विनी लेले आहे. म्हणुन बघा एकदा मोठ्याने..सही वाटतं (नाही सही वाटलं तर स्वत:चं नाव मोठयाने म्हणुन पहा..ते सही वाटेल).

तर एक कोणीतरी माणुस आणि त्याचं कुटुंब व्यापारासाठी जहाजातुन जात असताना जहाज बुडालं... ते कुटुंब वाचलं आणि विजयदुर्ग, मुटाटला (सिंधुदुर्गात) स्थायिक झालं. मग पिढ्या वाढत गेल्या..काही मंडळी खानूत आली..तिथुन चरवेली... त्यांच्यातला एक पोरगा अलिबागला आला... आणि मी त्याची मुलगी! तर त्या जहाजवाल्या व्यापारी माणसाला "लेले" आडनाव आवडलं असावं म्हणुन आज मी लेले आहे! आमच्या आडनावातुनच आमचा दानशुरपणा ओतप्रोत वाहातोय... कित्ती क्युट आडनाव आहे "लेले"..छोटुकलं छान!
आता तुमच्यातल्या ब-या़च जणांना स्टॅम्पचा जोक आठवला असेल... स्वतःला मोठे शिक्के पाडायला लागतात म्हणुन जळणारे लोक असले जोक बनवतात..तो "ले" च्या स्टॅम्पचा जोक नक्कीच कोणा "सहस्त्रबुद्धे" किंवा "इचलकरंजीकर" सारख्या आडनाववाल्यांनी बनवला असेल.

लेले आणि नेने वगैरे जोक पण खपतात कारण उच्चारायला सोप्पी आडनावं आणि सारखीच आहेत म्हणुन... दोन्ही आडनावांमध्ये साम्य आहे मान्य! पण म्हणुन मला तेजस्विनी नेने म्हणणा-यांचा मला दणकट राग येतो. माधुरी दि्क्षीतचं लग्न ठरलं तेव्हा कित्येकांनी "तुमची झाली आता माधुरी... तुमच्या नात्यात आहेत का श्रीराम लेले?... " असे प्रश्न विचारले होते. ’न’ आणि ’ल’ ह्या अक्षरांमधला साधा फरक का कळत नाही लोकांना?

तर मला माझं आडनाव खूप खूप आवडतं. सगोत्री लग्न चालत नाही म्हणुन नाहीतर मी "लेले" आडनाववाल्यांशीच लग्न केलं असतं. आत्ताही लग्न झाल्यावर आडनाव न बदल्याण्याचा विचार आहे माझा... पण जेव्हा मी माझ्या आईबद्दल विचार करते तेव्हा न बदल्याण्याचा विचार मनातुन काढते... म्हणजे बघा ना... आम्ही सगळे "लेले" आणि घरात आई एकटी रानडे असती तर किती विचीत्र वाटलं असतं आम्हाला... म्हणुन आडनाव बदलणं ठीक वाटतं मला ( ह्याबाबतीत अजुन arguments नको... माझं confusion वाढतं). काही झालं तरी मी माझं नाव मात्र बदलणार नाहीये हे नक्की!

’इन्स्पेक्टर तेजस्विनी’ वरुन तुझं नाव ठेवलं आहे का? असं मधे मला कोणीतरी विचारलं होतं.अश्शी चिडचिड झाली होती माझी... लोकं काहीही विचारु शकतात! एका काकुंनी हे नाव सुचवलं आई-बाबांना म्हणुन हे नाव ठेवलं त्यांनी...इतकं साधं आहे ते, पण त्याचवेळेस हे नाव आमच्या कुलस्वामिनीचं आहे म्हणुन मला दिलं घरच्यांनी! ( Thank god.. अंबाबाई नाही ठेवलं..अंबाबाई लेले..मज्जा नसती आली). जन्मदाखला, छोटा शिशू पासुन आत्ता सिनिअर मास्टर्सच्या सगळ्या वह्या-पुस्तकांवर, रेशनकार्डावर, सर्टिफिकेट्स, बक्षिसांवर, ओळखपत्रांवर, पारपत्रावर.... कित्ती ठिकाणी हे नाव लिहीलं, छापलं गेलं... तसं मला "तेजस्विनी" नावाने जास्त कोणी बोलावलं नाही... सगळे तेजुचं म्हणायचे/म्हणतात. माणुस जवळचा आहे लांबचा, मला आवडणारा की न आवडणारा ह्यावर त्याने मला काय हाक मारायची हे ठरतं.

"तेजस्विनी लेले" मी एकटी नाहीये ह्या जगात, एक भरतनाट्यम च्या मोठ्या नर्तिका आहेत तेजस्विनी लेले नावाच्या! मला त्याचा अभिमान आहे... माझं नाही पण माझ्या नावाच्या एकीचं नाव आहे ह्याचा!! [:)]. अजुन काही तेजस्विनी facts:
1) केरळात तेजस्विनी नावाची एक खुप सुंदर नदी आहे.
२) तेजस्विनी नावाची एक सिरिअल लागायची ज्यात रेणुका शहाणे होती.
३) अनेक स्त्री-पुरस्कारांची नावं तेजस्विनी असतात. ( मिस. SNDT ला "तेजस्विनी" म्हणतात. पोरी तेजस्विनी बनायला दिवस-रात्र मेहेनत करतात :) )


तर to conclude... तेजस्विनी लेले माझं नाव आहे (जे तुमच्यापैकी अनेकांना कधीपासुनच माहित्ये). जसं तुम्हाला तुमचं नाव आवडतं तसं मला माझं नाव भरपुर आवडतं. बास्स!!

- तेजस्विनी लेले

( मला ठाऊक आहे..ह्या पोस्टला काहीही साहित्यिक value वगैरे नाहीये (माझ्या कुठल्याच पोस्टांना तशी ती नसते) ... ह्यापेक्षा जास्त value "चहाची पाककृती" ला असेल. पण तरी मला माझ्या नावाविषयी असणारं प्रेम मला इथे लिहायचं होतं... आणि दुसरं म्हणजे "तेजस्विनी लेले" नाव अनेकांना माहिती होईल, प्रसिद्ध होईल इतकं माझं कर्तुत्व असेल ह्याची मला खात्री नाही त्यामुळे इथे नाव अनेकदा छापुन आल्याचा आनंद मिळवला)

35 comments:

Yawning Dog said...

FYI तेजस्विनी सरकार नावाची एक तेलुगु नटी आहे.
शिक्क्याच्या जोकचा मस्तच समाचार घेतला आहे :)

Anonymous said...

अगदी व्यवस्थित कोंकणी पध्दतिने समाचार घेतला आहे... सुंदर लिखाण..

नावात काय आहे? said...

लहान पणी पुष्कळ "दिवे" लावले म्हणून तर नाव नाही ना ठेवलं असं? अरे पण मी का असा लेल्या-नेन्या गत बोलतोय? [Just kidding ;)]
chaan ahe, sakalachya chaha barobar mast "nyahari" jhali :P

Innocent Warrior said...

tejaswini navaca ek movie pan ala hota, nice name.

दीपिका said...

.अंबाबाई लेले>>>

wow...tula nasti aali, amhala maja nakki ali asti :D :D


mast lihilays!

सखी said...

:) तेजस्विनी या नावातच जादू आहे. No wonder you are a good writer.
काहीतरी धडाकेबाज लिहिण्याचा विचार भविष्यात नक्की कर ;)
खालच्या disclaimer ची आवश्यकता नव्हती अगं! ते तेजस्विनी या नावाला contradict करतंय असं नाही वाटत?

सर्किट said...

too good..!!! :-)

shriramaprksha raam naamacha maahaatmya jaast aahe, asa mhanatat.. tasa ahe tuzya navachahi. :D

सर्किट said...

btw, ata barech "kok" bachelors ata tuzya blog la khup regularly comments dyayala lagatil he nakki.. ;-)

Deep said...

barech "kok" bachelors ata tuzya blog la khup regularly comments dyayala lagatil >>> are pan tila kok chaale paahijet na! ;) :D

Deep said...

मी गेस करत होतो की नाव काय असेल बर.. तेजू> असा उल्लेख मागं एका प्रतिसादात वाचला होता तेंव्हा वाटल होत की तेजल, तेजाली, तेजश्री, तेजस्विनी इ. इ. (ह्या सार्‍या माझ्या मैत्रिणी बर का!)

दणदणीत नाव >>अंबाबाई बर का. मज्जा आली असती खरच :) :D मग काय अंबाबाई ओह चुकल चुकल जास्वंदी अरे काय हे परत चुकल सवयीचा परिणाम दुसर काय ;) तो गाण्यांचा ब्लॉग बंद का? श्री गणेशायधीमही नंतर काही गाणीच नाहीत?

साहित्यिक value वगैरे >> शोधायला लोक येत नाहीत इथं! (म्हणजे नसावीत असा आपला माझा समज.)

बाकी तो लेलेंचा जोक खराच आहे बरका! माझ्या आजोबांचा एकाच अक्षराचा शिक्का होता! :) ;)
तर काय म्हणायच आता तुला?जास्वंदी, अंबाबाई, तेजस्विनी की तेजू?:)

सिनेमा पॅरेडेसो said...

मी तर तुझ्या त्या नावावरच फिदा आहे.(मी म्हणजे गणेश नव्हे बरं का)

ही बहुदा येथील पहिली कमेंट असावी.

मी तुझा ब्लॉग वाचायला घेतला त्याचं कारण माझ्याशी संबंधित हे नाव होतं .पण गेलं वर्षभर मात्र यातल्या लिखाणाने नावापेक्षा अधिक खेचून आणलं.

आणि तुझ्या आधी वापरलेल्या पिल्या वैगैरे शब्दांमधून तर तू फार जवळची वैगेरे वाटू लागली होतीस.


नेमक्या आमच्या वृत्तपत्रात आलेल्या विद्यापीठातल्या (तुझ्या वर्गातलं असावं बहुदा) कुणालातरी मी तुझ्या कळालेल्या आडनावावरूनही एकदा विचारलं होतं. तुझ्या ब्लॉगबद्दल न सांगता.

असं कुणी नाहीय हे समजल्यानंतर मात्र हिरमोड झाला होता.

आता तू नाव सांगून छान केलंस. कधी तरी दिसशीलच. तेव्हा मी तुझ्याशी बोलेनच असं नाही. पण मला कुणीतरी जवळचं दिसल्याचं समाधान नक्कीच वाटेल.


तेजस्विनी. हेही ग्रेट नाव आहे.

नावाला जागून लिखाण केलंस. याहीपुढे करशील.

शुभेच्छा.

- तू म्हणतेस तो. सिनेमा

Samved said...

छान. नावात काय असतं असं म्हणतं लय जणांनी हात धुवून घेतलेत. बरं केलंस नाव घेतलस :)

Saurabh said...

नावात काय आहे? असं कोणी विचारलं तर त्याला विचारायचं "बेगॉन" किंवा "टिक ट्वेंटी" असं लिहिलेल्या बाटलितुन पाणी पिशील का?

चला आज पासुन तुझी ३ नावे झाली १)जास्वंदी २)तेजस्वीनी आणि......... अंबाबाई.

येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स अंबाबाई.


छान झालाय लेख! मज्जा आली वाचताना.

Deep said...

येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स अंबाबाई.
hehehheeh

Bhagyashree said...

ए मलाही अंबाबाई लेले हे नाव भयंकरच आवडले ब्वॉ !! :)
नाव छान आहे तुझं! पण मला जास्वंदीचीच ओळख झाल्याने तेही नाव आवडते... :)

Jaswandi said...

@Yawning Dog (cha chitra asnara)... ho, ti aahe Tejaswini Kolhapure aahe. barya distat hya navachya muli :P

@kayvatelte, Thanks for ur comment

@ naavat kay aahe?, "लेल्या-नेन्या गत बोलतोय?" vichitra vattay thoda..nahi ka? btw thanks tumachaya comment sathi :)

@ Innocent Warrior, Ho toch to Inspector Tejaswini :)

Jaswandi said...

Thank you deepika... maza ambabai tar tuza kay tuljabaai thevaycha hota ka? hehe

@ sakhi... thanx, nakki prayatna karen dhadakebaj lihaycha... :)

@ सर्किट, hehe.. thanx, kiti diwas shodhatye ho changala lihinara ekhada kobra... sapdatch nahiye... ata baghuya sapadato ka? hehe

Jaswandi said...

@ Deep.. chalale pahijet mhanaje kay? fakt koknasthach chaltil..hehe
ani kahihi mhanalas tari chalel... jaswandi ani tejaswini paiki :)
audio blog kelay update!

@ सिनेमा पॅरेडेसो, sarvaat aadhi tumachi comment ithe pahun khup anand zala :)
aani tumachi comment vachunhi khup chhan vatala...please jar ka bhetlat tar bola ho nakki! konitari olakhicha bhetla ani bolala hyacha samadhan hoil :)

@samved... :)

Jaswandi said...

@ saurabh... aay saurya jast awaj nako haan... tuzya urjela sangen :P

Begon wala bhag sahich! hushar ahe tasa tu :)

@ Deep... as I said earlier, Tejaswini ani Jaswandi paiki kahihi navane hak marleli chalel :)

@ Bhagyashree...Thank you :)

Deep said...

fakt koknasthach chaltil..>>> hehe te maahitich aahe! :D

ambabai & tuljabaai doghee bahini kaay... ;)


mi kaay mhnto jas mhnnyaaevji TeJAS as mhnto :D mhnje kaay maajaa yeil! teju kaay jas kaay aani TeJas kaay hahaha ;)

नावात काय आहे? said...

Mhanaje amacha just kidding (ani wink) fukatach gela mhanayacha! Aso, raag nako lobh asava hi vinanti. :)

Tu chalel, navhe avadel!

Keep writing, mala(hi) lihanachyachi khup sfurti aaliye tujha(chalel na?) blog vachun, pan graduate student cha dharma-procrastination-adava yetoy. ;)

Veerendra said...

मला तु अनॊनिमस लिहित होतीस ते ही आवडायच आणि जे आधी उडान वर लिहीत होतीस ते ही .. मी तुला आधी एक्दा म्हणालो होतो .. तुझ नाव तुझ अस्तित्व नाहीये .. तुझ लिहीणं आणि विचार तुझी ओळख आहे .. :) त्यामुळे अनेक जणांनी तुला ओळखल असेल .. पण इथे तु जास्वंदीच रहाव अस वाटत ! तेवढीच मजा ..

अंबाबाईची नवी रूपे ..
जास्वंदी वा तेजू लेले ..


:)
शुभेच्छा !

Jaswandi said...

@Deep, idea agadich kahi vaaitt nahiye

@navat kay ahe?, do keep writing :)

@veerendra, Thank you :)

नावात काय आहे? said...

Hey Jaswandi,
Thanks a lot for the protsahan, effect utaraychya aat ek post takali ;)!
Likhan vagere nahi, kahi tari kharadave yevdhaach uddesh.
Kiman, Akhandit vachit rahave he pure hoil ashi asha ahe. :)

Sneha said...

teju bai mastach.. :)
pan jaswandich raha ya blogsathi... :)

Anonymous said...

"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी होणार आहे. अधिक माहिती
http://marathi-e-sabha.blogspot.com/
या ब्लॉगवरील नवीनतम पत्रात वाचा.
सहभागी होण्याची इच्छा असल्यास shabdabandha@gmail.com येथे ईमेलद्वारे संपर्क करा, जेणेकरून गुगलग्रुपमध्ये तुमच्या ईमेलची नोंद करता येईल.
धन्यवाद.

Maithili said...

Sahich aahe post. bhari aahe naav TEJSWINI LELE. pan mala maze naav mulich aavadat naahi. Maithili pradhan kitti yaaaaks vaatat naa? aai babana nehmi kosat raahate mi yasathi. Maithili ase vichitr naav asanyapeksha shruti, pooja, saayali,shreya, namrata ase kaahitari naav asate tari chaalale asate. I just ht my name. ektar barechase(Amarathi) lok par vaat lavatat mazya naavachi.kaash mazehi naav ase chhanase abhimaan balaganyasarakhe asat.
BTW VISHESH TIPPANI sagotra lagn chalate. jar aadhichya saat pidhynat koni lele-lele marriage zale nasel tar nakki chalel. mazi aai suddha pradhan-pradhanch aahe.

shardul said...

sahi ahe...

antaryaam said...

इतके दिवस जास्वंदी हीच तेजस्विनी लेले आहे हे कुणाला माहिती नव्हतं असं म्हणायचंय की काय तुला?????

Jaswandi said...

@Navat kay ahe... :)

@ Sneha... Thanx..blogvar jaswandich ahe..nav badalat nahiye :)

Thanks Marathi-e-sabha for ur invitation

Jaswandi said...

@ Maithili...tuza naav pan mast ahe ki ga! aga ani amarathi loka saglyach navanchi vaat lavtat...

ani tuzya sagotri tip baddal thanx ;)


@ shardul..Thank you :)


@ Antaryaam... तेजस्विनी लेले माझं नाव आहे (जे तुमच्यापैकी अनेकांना कधीपासुनच माहित्ये). asa lihilay postmadhe... :)

Prashant said...

अरे वा,
अंबाबाई कृपया थोडीफार माहिती येथल्या लिंक्सवर वाचा http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=90016191&tid=5337676323429277727&start=1

छान लिहिताच, सुंदर लिपीतही लिहा.

Abhishek said...

nice one!

भानस said...

अंबाबाई लेले एकदम भारी. पण ते आपलं गमतीत एरवी तेजस्विनी छान. नावात काय आहे असं म्हटलं तरी ते लागतचं...मग ते टोपण असो वा खरे.:)
बाकी नावाचा पायरीपायरीने समाचार सही घेतलास.

Sachin said...

mihi ek Lele tuza navach kay sarech Lele chhanach astat
bara pan mala Lelyanbaddal detail mahiti havi hoti Pl sangu shakshil?