Sunday, June 15, 2008

सध्या...

आज बोटं शिवशिवायलाच लागली...
ब्लॉग लिहि... बाळा... ब्लॉग लिहि आता..सांगत होती.
पण डोकं आणि त्याहुन जास्त मन तयार नव्हतं...
बेक्कार गोष्टी आहेत ज्यावर लिहायचं आहे, पण आत्ता नाही!
म्हंटलं एखादी छोटु पोस्ट तरी लिहावी..नंतरचं नंतर लिहुया...

तर माझ्या "जीवनात" (हा शब्द मला नाही आवडत!) सध्या खुप काही चालु आहे!
GRE ठीकठाक झाली...GR8 मार्क नाहीयेत पण पुरेसे आहेत. आता भिस्त TOEFL वर!
अलिबागला जाउन आले... कणकेश्वरला जाउन आले, खरं तर माझ्या कणकेश्वरावरती एक वेगळी पोस्ट टाकायच्ये, ती नंतर!
२ दिवस मस्त धमाल केली तिथे... पण ५ तारखेला त्याचा वाढदिवस म्हणुन पुण्यात परत आले.. आणि आमच्या इथल्या दुष्ट BSNL च्या lineला तेव्हाच तुटायचं होतं! त्याच्या वाढदिवासाला त्याला बघताच नाही आलं :(

माझं ह्यावर्षी बजेट कमी होतं म्हणुन त्याला एक कुर्ता Indian postal services नी पाठवला आहे... आणि त्याला तो अजुन मिळाला नाहीये! IPS वाल्यांनॊ अजुन २ दिवस वाट बघत्ये नंतर तुमची खैर नाहीये!!

बाकी सध्या Radio mirchi मधे internship करत्ये. मज्जा येत्ये!
खुप काही शिकायला मिळतय ह्यातला भाग नाही पण अनुभव छान आहे. मला माझ्या आवडीचं काम आहे... जाहिराती बनवणं.. enjoy करत्ये! इतके दिवस ज्या RJ ना ऐकायचे त्यांना आता मी पाहिलं आहे... सगळे RJ खुप normal आहेत :)
अम्रुततुल्यमधे काल पहिल्यांदा मी चहा प्यायले आणि भजी खाल्ली. अमृत ह्याच्या जवळपासच्या चवीचं असेल असं वाटत नाही!
पहिल्यांदा पहिलेल्या गोष्टिंपैकी अजुन एक म्हणजे, धोबी घाट... कोंढव्याला जाताना मला तो दिसला.. मग २ मिनिटं थांबुन पाहिला..सही वाटलं... पहिल्यांदाच पाहिला प्रत्यक्षात!

सध्या तेलुगु शिकत्ये. "देशभाषलंदु तेलुगु लेस्स" असं म्हणतात! म्हणजे भारतीय भाषांमध्ये तेलुगु श्रेष्ठ आहे म्हणे... बघुया.. माझ्यासमोर तिचा टिकाव लागतो का ते! :D

dieting करायचं ठरवुन ह्यावर्षी हि भरपुर आमरस-पोळी चापल्ये! सध्या परत dieting कधी सुरु करायचं हे ठरवत्ये!

अजुन सध्या रिसर्च च्या तयारीसाठी काम चालू आहे!

बाकी डाव्या पायाचं मधलं बोट मोडुन घेतलं आहे... पण बाकी मजेत आहे "तेजु लंगाडी क्यु हसती है?" असं विचारावं इतकी हसत्ये!

सध्या जगत्ये! :)

7 comments:

Anand Sarolkar said...

Sahi ahe yaar! Mast happening life ahe tujha.

IPS peksha courier better option! (swanubhav) ;)

Bhagyashree said...

wow u r back! sahi.. ekdam dhavta ani happening post ahe!!

btw r u planning to disclose ur identity? coz i dont knw ur real name.. i know u by name jaswandi.. and u've disclosed ur name here in this blog i suppose ! [:)]

neways.. happy to see u again !

saurabh V said...

मुली आपण पायाच बोट तोडणं/मोडणं ज्या पध्दतीने "मॅनेज" केलाय ना!!!!! वा!वा! त्याला तोड नाहि! [:p] [:D] असो, लिहित रहा. उगिच miss me वगैरे सांगु नकोस. सध्या तुझ्यासकट कोणाला miss वगैरे करायला फुरसत नाहिये(आणि तसहि miss करायला अजुन माझ्या आयुष्यात कोणी MISS अजुन तरी आली नाहिये!! आणि असती तरी तिलाही हेच सांगितलं असतं. उगिच काय लाड करुन घ्यायचे???[>:(])[:p] आता म्हणशील - "काय आगाऊ आणि ’टिपिकल’ मुलगा आहे म्हणुन."

HAREKRISHNAJI said...

कणाकेश्वरी दातारांकडे जेवलात की नाही ?

Sneha said...

aga gadhav kuthe dadpadalis?
aani tujha ph panyat bhijala aahe ka lagat ka nahi to?

aso post vachun bar vaatal

...sneha

ऍडी जोशी said...

सध्या जगत्ये! :)
??????

khapalat aapan pan madam :-)

Jaswandi said...

@ anand, ho na IPS S****, baki thanx

@ bhagyashree
thanx! aga muddamhun anonymous rahayacha vichar 3rd post madhech sodala! mala nahi jamat te! :|

@ saurabh.. tyasathi "mi" asava lagata.. payacha boat modun ghena soppa kam nahi balaka!

@ harekrishnaji
aadhi jevaycho tyanchyakade
agadi jevalo nahi tari pohe asayache, halli te var nastat...khali paythyashi shift zalyet

@sneha, karen tula phone nivantapane :)

@ adi... :D
je jagata tech khapata :D :D :D
(tukarest line ahe na?!)