टीप: खूप दिवसांनी ह्या ब्लॉगवर काहीतरी लिहिलं आहे कोणीतरी ..म्हणून आशेने, उत्साहाने किंवा उत्सुकतेने वाचायला जाणार असाल.. तर माफ करा.. इथे तुमचा फार कायच्या काय मोठा भ्रमनिरास होईल!
आयुष्यात काही काही गोष्टी फार उशिरा जाणवतात, लक्षात येतात.." श्या, आपण हे करायला हवं होतं" असं वाटतं ..पण तोवर फार उशीर झालेला असतो.. तर मला अचानक जाणवलेली गोष्ट म्हणजे मी जीवशास्त्रज्ञ बनायला हवे होते.. त्यातही entomologist व्हायला हवे होते.. परवा मलेरिया झाल्यावर काही करण्यासारखं नव्हतं म्हणून नुसती पंख्याकडे बघत पडून होते.. तेव्हा जाणवलं .. आपण चुकीच्या क्षेत्रात आलो राव.. किडूक-मिडूक काहीतरी करत बसण्यापेक्षा किड्यांचा अभ्यास करायला हवा होता.. ह्याला आता खूप कारणं आहेत..
१. मला किडे-माश्या-झुरळं-पाली कशाचीच भीती वाटत नाही.. आणि कधी तसं pretendही केलं नाही.. नाही म्हणायला एक-दोनदा झुरळ पाहून किंचाळून चांगल्या दिसणाऱ्या मुलाजवळ सरकायचा चान्स होता.. पण ते ध्यान झुरळ-पालीला घाबरतं बघून मग विचार बदलला...
आपण जोवर काही करत नाही तोवर आपल्या वाटेलाही न जाणाऱ्या बिचाऱ्या त्या मुक्या प्राण्यांना घाबरण्यासारखं काय आहे? काहींना किळस येते ते ठीक आहे .. पण मला तर अनेक माणसांचीही किळस येते मग बिचाऱ्या किड्यांच ते काय नवीन?
२. आणि दुसरं कारण म्हणजे मी रोज स्वच्छ अंघोळ करत असले .. व्यवस्थित कपडे घालत असले तरी का कोण जाणे कुठलेही किडे माझ्याकडे येतात.. कदाचित त्यांना सुरक्षित वगैरे वाटत असेल कारण मी डास सोडून कोणत्याही किड्याला कधी मारलं नाहीये.. लहान असताना मी कधी चतुराच्या शेपटीला दोरा बांधून हेलीकॉप्टर-हेलिकॉप्टर खेळले नाहीये.. कधीच काजव्यांना काडेपेटीत बंद करून ठेवलं नाही.. माझा भाऊ करायचा.. त्याला काजव्यांचा torch बनवायचा होता..
मी कधी सुया पकडल्या नाहीत.. म्हणजे पकडल्या.. पण सुयांचं कलेक्शन नाही केलं.. मी कधी फुलपाखरं नाही पकडली.. त्याना observe नक्की केलं.. त्याच्याचवरून तिसरं कारण..
३. पाचवीत असताना शाळेतल्या विज्ञान प्रदर्शनात मी रेशमाच्या किड्यांची lifecycle दाखवली होती.. अगदी अळ्या-कोश- पाखरं सगळ्या stages.. मी तुतीच्या पानांचा भडीमार केला होता त्यांवर.. तेव्हा मी ठरवलं होतं की फुलपाखरं बनवायची अशी खूप.. आणि मग ती पाळायची.. ती मेली की एका काचेच्या पेटीत बंद करायची.. म्हणजे खोट्या फुलावर बसलेली वगैरे.. आणि मग ती विकायची.. पण तेव्हा आई म्हणाली की रेशीम खूप महाग असतं so माझा plan बदलला आणि मी ठरवलं की रेशीम-उद्योग करायचा..पण तो plan ही काही अपरिहार्य कारणाने बदलला.. (कारण अपरिहार्य असलं की भारी वाटतं ना..) तर लहानपणापासून ते गुण होते माझ्यात कीटक-शास्त्रात नाव कमवायचे.. पण झेप घेण्याआधीच तो दिवा कोणीतरी बंद केला..
आता पुढचा एक paragraph नका वाचू.. म्हणजे वाचाल.. पण मग नका म्हणू की आधीच नव्हतं सांगितलं.. तसं तर ते ब्लॉगपोस्टच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे..
४. अर्चना नावाची एक मुलगी माझ्या बाजूच्या रांगेत बसायची शाळेत आठवीत .. तिचं नाव सांगायची खरं गरज नाहीये.. पण आता ह्या संदर्भात आहे म्हणून सांगायलाच हवं..मला मुळी म्हणजे मुळ्ळीच नाही आवडायची ती.. तिच्या केसात एक लाख प्राणी होते.. "उ" हे नाव नाही आवडत मला.. तर तिच्यामुळे आणि तिच्याबद्द्द्लच्या gossip मुळे मला ह्या प्राण्याबद्दल इतकी माहिती झाली होती.. म्हणजे तो प्राणी ७ अंडी घालतो ह्यावर तसा विश्वास नसता बसला.. पण तिला बघून बसायचा.. ७-४९- पुढे असं progression जाणवायचं तिच्याकडे बघितल्यावर.. आमच्या आयांनी सांगितलं होतं तिच्याजवळ बसू नका जास्त म्हणून.. तेव्हा एखाद-दोन आठवडे तिच्याबद्दल सहानभूती निर्माण झाली होती मला.. तेव्हा वाटायचं, काहीतरी औषध शोधायला हव.. किती मुलींची लहानपण एकटी पडत असतील.. पण मग लगेच विचार आला की मी होईन ही काहीतरी अशी.. मग मला पुढे कोणीतरी विचारेल "हाय.. काय करतेस तू हल्ली?.. "मी लायसील मध्ये काम करते" म्हणायला नाही चांगलं वाटणार ना.. म्हणजे अश्या सांगायला awkward ठिकाणी काम करणाऱ्या लोकांबद्दल मला आदर आहे.. पण कायम गम्मत वाटते.. उदाहरणार्थ.. २ मित्र खूप दिवसांनी भेटतात..
dude1: hey..
dude2: hi..
dude1: so wassap?
dude2: nothing much.. tell me about u man..
dude1: life rocks at Dell..
dude2: dell.. oh thats gr8!
dude1: hey whr r u working?
dude2: uhh.. stayfree..
dude1: oh.. thats..
dude2: i know!
5. मला किड्यांबद्दल बरेच जोक वगैरे पण माहित्येत.. आणि म्हणतातच ना "जेव्हा तुम्ही तुमच्या profession बद्दल जोक करू शकता तेव्हा तुम्ही खरे रुळलेले असता"
उदाहरणार्थ: एक मुलगा: सफरचंद खातानाची सर्वात घाण मोमेंट कोणती असते?
दुसरा मुलगा: कोणती?
पहिला मुलगा: जेव्हा तू सफरचंदाचा चावा घेतोस आणि हातातल्या सफरचंदात अर्धी अळी तडफडताना दिसते..
(पाचव्या कारणाला काही अर्थ नव्हता.. तिसऱ्या कारणात अळ्या लिहिल्यावरचं मला हा जोक आठवला होता आणि सांगायचा होता.. पण असा मधेच कसा घालणार म्हणून पाचवं कारण)
तर डास सोडून कोणत्याही किड्याचा मी द्वेष करत नाही.. डास मात्र डोक्यात जातो.. आणि तो पृथ्वीवरून नामशेष झाल्यास जीवनचक्र थांबून प्रलय येतील अश्यातलाही भाग नाहीये.. त्यामुळे तो पृथ्वीवरून नामशेष व्हावा असं मला मनापासून वाटतं.. मी करोडपती असते तर मी कासव-छाप आणि good knight ला वगैरे फंड पुरवले असते.. अरे चावतो काय. वरून गुणगुणतो काय ..निर्लज्ज प्राणी.. किड्यांच्या नावावर कलंक आहे.. त्या चट्टेरीपट्टेरी डाशीणीने मला मलेरीया द्यावा.. blood sucking b!
डासांनी मला त्रास दिला म्हणून मला राग आहे असं काही नाही पण.. मला बाकीही किड्यांनी दिलाय त्रास.. म्हणजे मला दोनदा मधमाशी चावल्ये.. एकदा एक unidentified हिरवी अळी मानेला फक्त लागली होती आणि माझा double हनुमान झाला होता.. एकदा मला काजवा चावला होता.. मुंग्या तर असंख्य वेळेला चावल्यात.. पण म्हणून मला त्यांच्याबद्द्ल राग नाहीये.. मीच दिला असेल त्रास बिचाऱ्यांना.. गावाला गेल्यावरही काहीतरी वेगळेच किडे माझ्या आजूबाजूला असतात म्हणून मला किडा-magnet म्हणते माझी बहिण..
मध्ये एकदा ह्याच अश्या काहीतरी विषयावर बोलताना मी अमोलला अर्धा तास गोष्ट बनवून सांगितली होती.. "तुलाच का इतके डास चावतात?" ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून!.. त्याचा काही भाग इथे देत आहे..
"अरे मी गेल्या जन्मात entomologist होते.. (entomologist हा शब्द मला GRE चा अभ्यास करताना कळला होता.. abase,abash,abate इतकाच तो लक्षात राहिला ..असतं एकेका शब्दाचं भाग्य) माझी फार मोठी प्रयोगशाळा होती.. आणि महत्वाचं म्हणजे मी मुलगी नव्हते.. मुलगा होते..( हे एक निश्चित आहे.. गोष्ट खोटी असली तरी मी मुलगाच होते.. दर जन्मात मुलीने मुलगीच असावं असं कुठे लिहिलं आहे?) तर मी अनेक निरनिराळे प्रयोग करत असे.. डासांचा वैद्यकशास्त्रात उपयोग करून घेण्याचा माझा फार मोठा शोध चालू होता.. I was Mr. Know-it-all-about-डास... एक दिवस एक big shot माझ्याकडे आला आणि म्हणाला मला तुझा formula हवाय.. मी तुला २५ कोटी देईन.. त्या काळात २५ कोटी म्हणजे लै होते.. पण मी माझ्या डासांच्या प्रेमापोटी स्पष्ट नकार दिला.. पण तो शेवटी व्हिलन .. तो कसला ऐकतोय.. त्याने डांबरटाने माझ्या नकळत एक सुंदर सेक्रेटरी पाठवली .. मी शेवटी पुरुषच! भाळलो तिच्यावर.. आणि ती सुंदर बाईच.. काढला माझ्याकडून फॉर्म्युला.. पण हाय रे दैवा.. बावळट ती.. चौथं आणि आठवं पान तिने नेलंच नाही.. आणि उरलेल्या मिश्रणातून डास मारायचं रसायन तयार झालं..मी खूप प्रयत्न केला डासांना वाचवायचा.. पण त्या big shot ने माझ्याविरुद्ध कट रचला.. दुनिया मेरी आवाज सुनती उसके पहले ही उसने मेरी आवाज हमेशा हमेशा के लिये बंद कर दी.. डासांना वाटलं मी त्यांना दगा दिला आणि आजतागायत ते माझ्यावर सूड घेतायत.. the end"
लिहिण्यासारखं अजून खूप आहे.. आणि आपण लिहूया एकदा.. तशी अजून वेळ गेली नाहीये.. काहीतरी करता येईल कीटकशास्त्रात.. (कीचकवध कोणी पाहिलं आहे कां? मला अचानक आठवलं कीटक म्हंटल्यावर) तर.. तशी अजून वेळ गेली नाहीये.. काहीतरी करता येईल कीटकशास्त्रात.. कारण तसे अंगात किडे पहिल्यापासूनच आहेत.. किडे करायची हौस ही आहेच!
22 comments:
aye awdala mala ha post khup.. Maja ali/ala tuze kide vachun :)
+1 : kaaipan
+khup : bhari
हाहाहाहा .... मस्त पोस्ट आहे!!
mastch lihilay....
हा हा हा .. आर यु किडिंग? केव्हढे ते किडे ;-)
खुप छान लिहिलंय, आवडलं :) :) :)
भन्नाट...
तुफान हसलो.... सकाळ सार्थक झाली !
लय भारी पोस्ट ..... :)
धमाल!
मस्त पोस्ट एकदम!:)
:D खूप छान लिहिलंय... :D
जबरी
हे हे हे !
सही रे !
अगदी धम्माल लिहिलीयं ! सही सही म्हणजे सहीच !!!
काय्च्या काय...मजा आली.......
फारच किडकिडीत झालीये पोस्ट... ;)
हेहेहे.. तुफ्फान हसलो.. सुस्साट लिहिली आहेस !!
Chan zhalie post..kuduks miduks .. khup hasale :)
हा हा हा ... जबरदस्त लेख !!
भारी लिहिते राव तू तर.....मस्तच....
hi jaswandi,
nice blogpost!
can you pls give me your email id?
thanks
-vaibhavi bhide
menaka prakashan
pune
मस्तच!
blogger.jaswandi at gmail.com
भन्नाट !!!
व्हेरी व्हेरी ’किडिंग’ एकदम!!
झोप यावी म्हणुन वाचतात ना.. पण आज काल झोप आली की तुझ्या Blog ची आठवण होते आणी Blog वाचुन झोप उडते.. खुप आवडली हि Post.. :-)
Post a Comment