Thursday, March 25, 2010

लपाछपी..

दादर प्लॅटफॉर्मवर, कल्याण लोकलसाठी.. संध्याकाळी ७:३०-८:०० ची वेळ.. मरणाची गर्दी. मला ती म्हणाली CST end ladies ला ये.. मी कल्याण endला.. त्या गर्दीतुन चालत्ये चालत्ये.. ट्रेन येणार म्हणुन सगळे सरसावल्येत. लोकांचे घोळके उभे.. मधेच सामानाचे ढिग.. बाई माईकवर बोलत्ये.. "प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणारी लोकल बारा डब्यांची कल्याणला जाणारी धिमी लोकल आहे." समोरुन येणारी ट्रेन मला दिसत्ये.. मी अजुन middle ladies ला.. मी आता जीव खाऊन धावायला लागते.. ट्रेन आलीये.. गर्दीची हालचाल सुरु झाल्ये.. आता तिथे पोहोचणं अशक्य आहे. ट्रेन सुरु होते. मी धपापत शेवटच्या डब्यापर्यंत पोचल्ये आता.. पण बायका चढु देत नाहीत.. "मरायचं आहे का? पुढची ट्रेन आहे".. मी निराश होऊन जाणा-या ट्रेन कडे बघत बसते.. दारातुन एक जाडंस धातुचं कडं घातलेला हात "बाय" करतो.. तीच! मला असं चिडवायला काय मज्जा येते? तिचा एसमएस येतो.. " Darling.. ya missed me again" .. मी माझा राग शांत करायचा प्रयत्न करत तिला रीप्लाय करते "Tomaar maa" आणि मग स्वत:शीच हसते. बाजुची बाई माझ्याकडे बघत असते पण आत्ता खरंच मला त्या बाईला काय वाटेल ह्याची काळजी नाहीये..


ठाणे-पुणे Volvo मधे आयपॉडवर गाणी ऐकत मी शेजारच्या सीटवर कोणी नसल्याने मस्त मांडी घालुन ऐसपैस झोपले असताना अचानक मोबाईल दणदणीत वायब्रेट होतो.. "me punyaat ahe"! मी कुठे आहे हे कळायला मला काही क्षण जातात. पलीकडच्या सीटवरचा माणुस उतरलासुद्धा.. म्हणजे नक्कीच वाकडच्या पुढे आल्ये. बाहेर बघुन अंदाज घेण्यात अजुन काही क्षण.. चांदणी चौकातुन बस खाली उतरते. मी मेसेज करते.. "mee pan punyaat ahe". इतके दिवस ती मुंबईत असताना भेट नाही झाली. पुण्यात काय डोंबलाची भेट होणार म्हणुन मी उगाच काळ-वेळ-स्थळ ठरवण्यात माझी शक्ती वाया घालवत नाही आणि माझ्या कामाला लागते. पण तरीही तिच्या मेसेजची जाम आतुरतेने वाट बघते! ती काहीच रीप्लाय करत नाही. असं कसं चालेल? खडुस कुठली.. एक रिप्लाय करायला काय जातं? दर थोड्यावेळानी मोबाईलकडे बघत मी माझं काम आटोपते. आणि तिला sms करते..
"listening to The Corrs..
To sweet beginings
and bitter endings
In coffee city
we borrowed heaven"
बराच वेळ तसाच जातो. "५ मिनीटात तिचा sms आला नाही तर आपण निघायचं" असं ठरवत तासभर मी कॉलेजमधे पाय-यांवर बसुन राहते. मोबाईल वायब्रेट होतो.. समोर एक ज्युनिअर मुलगी रडवेली होऊन "कॉलेजमधे कशी मारतात" हे सांगत असुन मी तिच्यासमोर निर्लज्जासारखा sms वाचुन हसते. "LOL.. teju, koi bhi irrelevantsi lines ko kahipehi relevant kar marti ho.. OK! Coffee at Nal stop CCD.. catch ya in 15 mins"

अवेळी पडणारा पुण्यातला पिरपिरा पाऊस, गुलाबी संध्याकाळ ह्याहुन मस्त वेळ कोणती असु शकेल तिला भेटायला.. पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटायला? मी पावसाची पर्वा न करता पळत पळत नळस्टॉपवर पोचले. नेहमीपेक्षा heartbeats नक्कीच जास्त होत्या.. तिथल्या मिनी-कबुतरखान्याला पार करत मी शौकीनपर्यंत आले. अजुन २५ पाउलं आणि मग मी तिला बघणार.. एवढ्यात परत एक मेसेज आला तिचाच.. "
tomake jeno dekhechhi" म्हणजे काय? तिनी मला बघितलं का? मला काही कळलंच नाही.. मी काही रीप्लाय करणार त्या आधीच तिचा अजुन एक मेसेज.. "client has some problem with my design.. i have to go.. sorry.. I was waiting for you at CCD..dont bliv me? I hv left my scarf there..pink floral. njoy" मी खुप गोंधळुन ते परत दोनदा वाचलं.. काय? ती बाई तिचा स्कार्फ तिथे ठेवुन गेली? फिल्मी आहे किती येडी.. दुस-या दिवशी तिच्या ब्लॉगवर तिने आमच्या न झालेल्या भेटीबद्दल लिहीलं.. तिला आधीच माहित होतं तिची मिटींग आहे, उगाच मज्जा म्हणुन तिने हे सगळं केलं होतं. मला आधी राग आला थोडा पण मग ह्या मुलीची गंमत वाटायला लागली.. तिने तळतीप लिहीली होती.. "Now please बंगाली शिवी नको घालु.. तुला बंगाली शिवी देता येत नाही.. तु बंगालीलाच शिवी देतेस बंगाली बोलुन!"

हिची आणि माझी ओळख झाली तिच्या ब्लॉगवर. आधी मला ती typical emo वाटली ब्लॉगकडे बघुन.. पण वाचायला लागल्यावर आवडायला लागली. भारी सुंदर काहीतरी लिहुन जायची एखादंच वाक्य, पण ते वाक्य आख्खी पोस्ट खाऊन जायचं.. आणि मुळात नेहमी लिहीणारी. इतर बन्गाली मुलींसारखी स्वतःच्या डोळ्यांच्या प्रेमात असणारी, पुण्यात वाढलेली त्यामुळे बन्गाली मराठी बोलणारी.. ते तिच्या english blog मधुन पण जाणवायचं! मी एकदा कमेंट केली तिच्या ब्लॉगवर. त्यावर ती काहीतरी बोलली..मग मी.. मग परत ती. असं खूप वेळ झाल्यावर मग आम्ही मेला-मेली सुरु केली. तेव्हा जाणवलं "च्यायला ही पोरगी भन्नाट आहे.".. मला जे वाटायचं, मी जशी जगते त्याच्या सगळं विरुद्ध हिला वाटतं, ती तशी जगते. तिच्या एका एका फंड्यांच्या प्रेमात मी पडायला लागले.

मग आम्ही चॅट करायला लागलो. "mon diye shunun" म्हणुन ती किस्से सांगायला सुरुवात करायची.. मधेच बंगाली गुगल्या टाकायची.. आणि टाटा-बायबायचे प्रकार झाल्यावर "bishwe shanti biraj koruk" (let there be peace on earth) वगैरे म्हणायची काही वेळेस.. काहीही आहे तो प्रकार..मी मनापासुन काही सांगायला लागले तर मधेच मला अडवत "eta baje katha..i have better things to tell" म्हणत तिची गोष्ट अर्धवट सांगायची.. मग अर्ध्यावर आल्यावर म्हणायची " I am talking agdam bagdam.. your story was better.. go ahead".. आम्ही असं तासंतास बोलायचो.. दोघींकडे एकमेकींचे नंबर होते..पण आधी कोण फोन करणार म्हणुन कोणीही फोन केला नव्हता.. sms-sms चालायचे फक्त कायम.. तिच्यामुळे मी बंगाली शिकायला लागले. आमचे फिल्म्स वरुन वाद होयला लागले.. मला आवडणा-या फिल्म्स तिला नाही आवडत.. KKR आणि MI वर आम्ही एकमेकींमधे पैजा लावायचो.. आणि असं बरंच काही..खुप मज्जा केली आम्ही, अर्थात ऑनलाईन! आणि फोनवर.. भेटायचं आहे यार एकदा असं ठरवुन ठरवुनही भेट होत नव्हती.. कायम लपाछपी खेळल्यासारखं होत होतं..आणि कायम त्या भेटीला filmy effect देत ती असं काहीतरी करत होती.. कडं काय, स्कार्फ़ काय.. एकदा म्हणाली "मी sndtमधे येते आहे. मोरपिसचे कानातले घातले आहेत.. बघ येतं का ओळखता" मी लक्षच नाही दिलं तेव्हा.. नंतर officeमधे एक Graphics Designer आली होती.. माझ्याविषयी विचारत होती असं माझ्या वर्गातल्या मुलीनी सांगितलं.. मी तिला विचारलं "तिनी कानात काय घातलं होतं?.. "अरे इतना Awesome था..".. श्या.. ती खरंच आली होती, तिचं कार्ड ठेवुन गेली होती!


"तेजु, हिरो खुद नही बनता उसे बाकी लोग हिरो बनाते है" असं मधेच एखादं random वाक्य टाकायची.. किंवा मधेच sms करुन "saajan film ka woh chai ke baagonme kaunsaa gana hain sanjay dutt n madhuri ka?" ..किंवा मग काही वेळेस अगदीच त्यांच्या लॉ कॉलेजच्या गेटवर बसुन रिकामी असल्यागत मला updates देत बसायची..
"abhi woh banda aya.. he is interested in crime ya...sahi na?"...
"usake eyes blue hain! n hes wearing white shirt"...
"m thinking of taking up crime now"

मुलीसारखी मुलगी.. पण तरीही हुशार आणि emo नाही! हे असुनही सुंदर.. हे असुनही practically relationship मधे.. आणि तरीही कुठेही बिघडलेली नाही.. आणि तरिही कुठेही काकुबाईपण नाही! जुन्या एखाद्या जन्मीची ओळख असल्यागत आमची मैत्री झाली होती.. वाढत होती.. एक दिवस तिनी पिंग केलं .. म्हणाली..
ti: now lets make it real
mi: aan?
ti: milate hain re abhi realmein..
tomar katha amar mone pore
mi: aan?
ti: yaar.. natak mat kar! kal eternity mall, Thane.. mi ani Ori yetoy tithe.. tu ye 7 vajta..
mi: tum donome aake main kya karu? bf-gf khush raho!
ti: tu ye.. bbye

आणि गायबच झाली. मी दुस-या दिवशी ५ वाजल्यापासुन तयार होऊन बसले. परत एकदा वाढलेले heartbeats, वेगळीच काहीतरी feeling.. teen-agerish BFF असल्यागत काहीतरी वाटत होतं मला..तिचा मेसेज आला " we are here.. m wearing green, he is wearing white.. box office" मी घरातुन निघाले. तिच्या वाचलेल्या पहिल्या ब्लॉगपासुनची ती आठवायला लागली. ती कसली perfect होती.. मॉल जसजसा जवळ आला मी अजुन अस्वस्थ होत गेले. रिक्षाला दिड मिनीटांचा सिग्नल लागल्यावर मला कायम चिडचीड होते पण आज बरं वाटलं.. आजवरची सर्वात छान मैत्रिण.. एकदम मनमोकळी आणि जिच्याशी आपल्यालाही मन मोकळं करता येईल अशी.. आजवरची सर्वात विचीत्र मैत्रिण.. जेवढी लहान मुलासारखी वागणारी तितकीच मोठ्यांसारखं सांभाळणारी.. थोडक्यात too good to be real! मला एकदम धस्स झालं.. मी असं का म्हणाले? too good to be real??

मी रिक्षातुन उतरुन चालत होते. गेटमधुन आत गेले.. नेहमीप्रमाणे आजही लपाछपी व्हावी असं वाटायला लागलं आणि तितक्यात एक पांढरा शर्ट घातलेला मुलगा आणि त्याच्या समोर एक हिरवा स्कर्ट घातलेली मुलगी दिसली.. ती पाठमोरी होती.. मी पुढे चालत होते पण माझा वेग आता मंदावला होता.. ती मागे वळत होती.. हातात कडं, कानात मोरपिसं.. त्या क्षणाला पुढे टाकण्यासाठी उचललेलं पाउल मी थांबवलं.. क्षणभर तसंच अधांतरी ठेवुन परत मागे आणलं.. त्या दोघांकडे हसुन पाहिलं आणि मागे वळले.. परत वेगाने चालत येत रिक्षात बसले. तिचा कॉल आला.. पहिल्यांदाच ती कॉल करत होती.. "तेजु.. wait.. what was that?"
"तू मला तिनदा असं चुकवुन गेलीस.. माझं राज्य होतं.. आता राज्य तुझ्यावर आलं आहे..you missed me.. "
"चोले जावो.. कालके आबार ऑनलाईन देखा होबे" ती म्हणाली आणि आम्ही दोघीही हसायला लागलो...

dont know about this लपाछपी.. the only thing I know is बास्तब कल्पकाहिनीर ठेक्यो बिष्मयकार..
कल्पनेत आणि वास्तवात खूप अंतर असतं राव.. ती मला माझ्या कल्पनेमधलीच आवडते .. तिच्या त्या imageला मला धक्का द्यायचा नाहीये.. आणि तिलाही माझ्या बाबतीत हेच वाटतं.. आज नजरानजर झाली.. उद्या कदाचित भेटही होईल.. पण तोवर आम्ही आमच्या आमच्या मनातल्या if unreal is the word त्या unreal प्रतिमांना जपुन ठेवु!

based on a true story and The real friend ;)27 comments:

हेरंब said...

झक्कासच. नेहमीप्रमाणेच मस्त पोस्ट. मस्त चाललीये लपाछपी.

"कल्पनेत आणि वास्तवात खूप अंतर असतं राव.. ती मला माझ्या कल्पनेमधलीच आवडते .. तिच्या त्या imageला मला धक्का द्यायचा नाहीये.. आणि तिलाही माझ्या बाबतीत हेच वाटतं."

हे तर एकदम पटलं.

Gouri said...

मस्त!!

हेरंबची प्रतिक्रिया Ctrl+C, Ctrl+V

:D

Mugdha said...

khup Chaan!

Ashish Sarode said...

After loong time.
Superb blog!

Monsieur K said...

ekdam mast :)
hopefully, u gals will meet in real, for sure!

Vibha said...

khup ch chhan.

Bhagyashree said...

kay sahi dhamal!! awesome ch ahe he!!

Sneha said...

kasa bhari aahe ga he... :)

yvk said...

छान! खूप दिवसांनी लिखाण केलत. जमल्यास लेखांची frequency वाढवा.

Chinmay said...

:)

Samved said...

wow! very true. I would prefer something of this sort :)

a Sane man said...

:O wow wala :O

marathisuchi said...

छान! just added this to http://www.marathisuchi.com/upcoming.php

Deep said...

:D:D:D kuthya hi mulgee pudhcya veles bhetaal tenvha maaze olkh karun de :P

likha karo aap ko bahut miss karte hai :))))))))

Nikhil Purwant said...

भारी ..
पार्ट २ लिहिनारेस का एव्ह्ड्यात ?
गुडच पण खरं, लिहित रहा.

Jaswandi said...

हेरंब, गौरी, मुग्धा, आशिष..Thank you :)

केतन, lets hope so... पण तू नको भेटु पुण्यात आल्यावर :P

विभा, भाग्यश्री, स्नेहा.. thanks a lot!

yvk, लेखांची frequency वाढवायचे प्रयत्न चालू आहेत.. बघु जमतं का!

चिन्मय, संवेद, sane man.. :)

मराठीसुची, thank you.. मराठीसुची काय आहे नक्की?

दीपक, हेहे.. नक्की! done..

निखील.. पुढचा पार्ट? संपलं की राव हे इथेच!

Vinit said...

hmmm .. mi tula bhetanya adhi sangnaar nahi konta shirt ghatla aahe te :P :P

Jokes apart, you should meet her, I am sure there will be many such posts after that :)

post baddal tar kaay bolnaar, zakkkas :)

rayshma said...

loved the post!
friendship has so many facets... each one is so beautiful!

निशा............ said...

ek number......

avadesh..........

Jaswandi said...

@ Vinit.. lol, Thank you


@ Rayshma, Nisha
Thank you..Thank you :)

Am@r said...

aga bhetnya adhi evdha chan post lihilas. mag bhetlyvar....
pan mast lihleys.

UMAKANT said...

zhakaas!!!
lapachapi.... cool one...

मराठीसुची said...

मराठीसुची.कॉम हे संकेतस्थळ इंटरनेटवरच्या मराठी ब्लॉग पोस्ट्स आणि मराठी वेबसाईट यांना एकत्र एका जागी आणून मराठी वाचकांपर्यंत पोचवते, अधिक माहितीसाठी
http://www.marathisuchi.com - free marathi link sharing and list of marathi blogs linksला भेट द्या.

Sakhi said...

वा! काय छान मैत्री आणि ती लपाछपी!! काहीतरी वेगळंच आणि छान वाचायला मिळालं आज!!! त्याबद्दल माझी अशीच एक खास मैत्रिण स्नेहाची मी आभारी आहे...तिनेच ह्या ब्लॉग ची लिन्क दिली मला.

Jaswandi said...

Thanks Amar ani Umakant... :)


Thanks a lot Sakhi ani snehalahi thanks sang :)

sagar said...

हे खरंच घडलंय ? नाही राव. कशाला लोकांच्या fantasy जगतेस ? किती जास्ती लकी आहेस तू आणि ती पण...

आणि बरं केलंस नाही भेटलीस ते.
"डोळे बंद कर आणि guess कर माझ्या मुठीत काय आहे ते " असं कोणी म्हणालं कि - त्या व्यक्तीच्या, आपल्या, त्या दिवसाच्या, त्या ठिकाणच्या आणि आजूबाजूच्या कित्येक प्रतिमांची नक्षी दोनेक क्षण तयार होते. हा अनुभव तुला आहे का कि ती नक्षी बऱ्याचदा मुठीतल्या surprise पेक्षा सुंदर असते ? असो.
.....किंवा भेटली असतीस तर ?
तर तिच्या अजून पन्नास-साठ प्रतिमा वाढल्या असत्या. kaleidoscope मध्ये अजून काही रंगांच्या काचा अजून वेगवेगळ्या नक्ष्या.

पण बरंच केलंस नाही भेटलीस :D रंगू दे ना अजून डाव .......

एक पिल्लू सोडतो..असं असेल का कि ती नाहीचे actually अस्तित्वात ? ती केवळ तुझा 'अक्स' आहे.
हा तुझ्याच प्रतिमांचा खेळ आहे. आणि तूच तुला जगावेसे वाटणारे पण न जगता आलेले जीवन तिच्या मार्फत जगत आहेस. आणि हा केवळ प्रतिमांचा लपंडाव आहे म्हणून ती तुला प्रत्यक्ष भेटत नाहीये कधीच. तू मात्र अशी कारण देऊन तिचे वेगळे अस्तित्व अबाधित ठेवते आहेस.
Just a food for thought :D :D :D

कितीही लहान comment टाकू म्हटलं तरी control च नाही होत.
चला "U've got mail" चे आवडते scenes बघतो आता :)

viku said...

chaan jamliye.....