"आमच्या संस्थेला फार अभिमान वाटतो आहे की गेली २ वर्ष आम्ही अविरत तुमच्या हरवलेल्या प्रेमाला second chance देण्यासाठी झटत आहोत.."
कुर्ता-पायजम्यातला तो माणूस स्टेजवरून बोलत होता. त्याच्यासमोर अनेक भावी (?) जोडपी उभी होती.. काही "आता एवढं उभं राहावत नाही" म्हणून मागच्या खुर्च्यांवर बसली होती.. ६०+ वयोगटातल्या आता एकट्या असणार्या "मुला-मुलींचा" जोडीदार-मेळावा..आयोजक मुद्दामच "वधू-वर" म्हणणं टाळत असावेत. त्यातही एक गम्मत होती, लग्नाआधीचा आपला एखादा crush, ex वगैरे असेल तर सांगायचं होतं आता देवाच्या (अव)कृपेने तो किंवा ती एकटी असेल तर त्यांना भेटवायचं कामही ही संस्था करत होती..
"एकदमच युनिक कन्सेप्ट बघा" श्रोत्री आजोबा पटवर्धन काकांना सांगत होते .. "आमच्या कॉलेजातल्या अपर्णा फडणीसचं नाव दिलं होतं मी , पण आहे नवरा अजून तिचा .. आणि अगदी ठणठणीत.. म्हणजे मला दुख्ख नाही त्याचं , उलट त्यामुळे अपर्णालाही सौंदर्यात मागे टाकील अशी वेदिका शृंगारपुरे मला suggest केली .. आलीये आज .. ती बघ तिथे .. तिथे रे बुफेच्या लायनीत.. कशी वाटत्ये?"
"Awkward.." सुहास पटवर्धन वेदिका शृंगारपुरेच्या समोर उभं राहून म्हणाला.. " मला नव्हतं वाटलं तू इथे .. म्हणजे .. कशी काय? तू दुसरं लग्न केलंस ना? कोणा अमेरिकन माणसाशी.."
"सुहास.. एकुलता एकच नवरा होता मला.. तू! .. तुझ्यानंतर का लग्न करेन मी? मला डिंगीचि कस्टडी मिळाल्यावर काही संबंधच नव्हता ना लग्न करायचा.."
"वेदा.. तू त्याला अजूनही डिंगी म्हणतेस? मोठा झाला असेल ना आता तो .. तरीही डिंगी म्हणजे "
" आता तो पटवर्धन नाहीये.. त्यामुळे त्याला मी काहीही हाक मारू शकते कोणत्याही वयात.. त्याचं लग्न ठरलं आहे .. त्याची बायको मात्र अमेरिकन आहे आणि तिलाही आवडतं त्याला डिंगी म्हणायला.. तुझा टकलाचा अन् वजनाचा वारसा घेतलाय बाकी त्याने, लग्नाला बोलवेन तुला.."
जाड , टकल्या तिशीतल्या गोर्या मुलाला त्याची आई डिंगी म्हणून हाक मारते आणि तो धावत तिला येऊन मिठी मारतो हे दृश्य सुहासच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि तो मनात म्हणाला "फक्त वजन आणि टक्कल नाही.. आपल्या दोघांच्या awkwardचाही वारसा असावा"
वेदिकाला इसवी सन १९७९ मध्ये औरंगाबादची सर्वात सुंदर तरुणी असल्याचा पुरस्कार एका जाहिरातदाराने दिला होता आणि मग फुकटात तिच्याकडून त्यांच्या मलमांची जाहिरात करून घेतली होती..
एकात तिचा close up आणि खाली लिहिलं होतं "खरुज? वापरा सातीलाल फार्माचे "खरुजानो"..
एकात परत तिचा closeup आणि खाली लिहिलं होतं "तारुण्यपिटीका? वापरा सातीलाल फार्माचे "नपीटीका" ..
पुढे साधारण वर्षभर मिस औरंगाबाद म्हणून तिला कोणी ओळखत नसलं तरी खरुज आणि तारुण्यपिटीका नावाने नक्कीच ओळखायचे ... कोणीतरी म्हणाल्यामुळे तिच्या आईला अचानक वाटायला लागलं की औरंगाबादकरांना गुळाची चव नाही.. मुंबईतच मुलीला भविष्य आहे..ती आता बातम्याच देणार.. स्मिता पाटील, चारुशीला पटवर्धन, स्मिता तळवलकर, भक्ती बर्वे, ज्योत्स्ना किरपेकरच्या यादीत वेदिका शृंगारपुरे हे नावही लागेल अशी तिच्या आईला १००% खात्री होती आणि म्हणून वेदिकाची पाठवणी जोगेश्वरीच्या सरू मावशीकडे करण्यात आली..
सरू मावशीच्या चाळीत समोरच्या घरात पटवर्धन राहायचे.. सुहास हा त्यांचा सर्वात धाकटा मुलगा..वेदिकापेक्षा ३ वर्षांनी लहान.. वेदिका तिथे राहायला आली तेव्हा त्याला नुकतीच मिसरुड फुटायला लागली होती..स्वतःला अमिताभ बच्चन समजणारा अमोल पालेकर होता तो..त्याच्यापेक्षा मोठ्या दोन्ही बहिणी आता लग्न करून सासरी गेल्यामुळे आता त्याला खूप सुटसुटीत वाटत असायचं.. जाड आणि तुळतुळीत गोटा असणारे अप्पा पटवर्धन कामावर निघाले की सुहास लगेच गच्चीत पळायचा.. हातातलं पाकीट उघडून त्यातून सिगरेट काढायचा आणि कोणीतरी चिकटवलेल्या शबाना आझमीच्या पोस्टरसमोर तोंडातून धूर काढत तासंतास बसायचा.. असाच एक दिवस बसलेला असताना दाम्या धावत वर आला.. "सुहास.. शबाना.. शबाना आल्ये चाळीत .. गुप्तेंकडे राहणारे.. उतरत्ये बघ.. धाव.." दोघंही धावले.. समोर वेदिका सामान उचलून सरू मावशीसोबत चालत येत होती..
"वेदिका शृंगारपुरे... गुप्ते काकूंची भाची आहे... वरळीला जात असते काकांसोबत... खारे दाणे आवडतात.. " दाम्या सांगत होता.. "खारे दाणे? ही माहिती काढलीस तू? भेंडी... काही कामाचा नाहीस तू" सुहास कॅरमच्या बोर्डावर बोरीक पावडर पसरत म्हणाला... "साल्या, उद्या नेलीस फिरवायला आणि दाण्यानैवजी चणे घेऊन दिलेस.. तर?"
"गुप्ते म्हणजे? ... "
"आपले नाही... अप्पा तुला घराबाहेर काढतील घरी विषय जरी काढलास तरी.."
"हं.."
"हं.. आता तू मला भेंडी, काही कामाचा नाहीस म्हणालास म्हणून... नाहीतर मी तुला पुढे सांगणार होतो, गुप्ते काका काकू १५ दिवस पुण्याला जाणारेत मुलीकडे.. वेदिकाच्या सोबतीला आमची वनिता जाणारे रात्री झोपायला..आणि मला विचारत होते काका , सोडशील का बसस्टोपपर्यंत रोज तिला.. "
"च्यायला.. मग? मग? मग काय सांगितलस तू त्यांना?..."
"आपण मित्र आहे तुझा... हो सांगून टाकलं.. आता रोज नेईन तिला माझ्या स्कुटरवरून.. आणि खारे दाणे खात आम्ही बोलू तुझ्याबद्दल..."
पुढचे दोन आठवडे सुहाससाठी खूप कठीण गेले. तो रोज अप्पांना नवीन स्कूटरसाठी पटवत होता, दाम्या आल्यावर रात्री त्याच्या स्कूटरवर सराव करत होता.. आणि रोज दाम्या आणि वेदिकानी आज काय "गंमत" केली ते ऐकून घेत होता.
पहिल्या दिवशी दाम्यापासून दोन वित अंतर ठेवून बसलेली वेदिका आठवड्याच्या शेवटी त्याच्या खांद्यावर हात ठेवते बघून जळफळत होता.
Friday, June 13, 2014
Sunday, June 8, 2014
अर्धवट -२
---------------------------
पुराने बरामदे ... नयी धूप...
सक्काळी सक्काळी एका हातात चहाचा कप आणि एका हातात पाण्याची बाटली घेऊन बाल्कनीत आले. आणि उन्हाची एक तिरीप बघून प्रचंड आनंदी झाले.. इथे नवीन घरात राहायला आल्यापासून बाल्कनी/ गैलरी/patio मध्ये आलेलं पहिलं उन!
हल्ली रोज सकाळी येत असते मी थोडावेळ बाल्कनीत .. एक छोटी चटई वजा बसकण टाकून झाडांसमोर बसते ... तुळस, चेरी, लीची, कोथिंबीर, सफरचंद आणि चिंट्या जांभळ्या फुलांची चौकशी करत.. त्यांना काय हवं-नको ते बघत.. त्यांना अंघोळ घालत.. आदल्या रात्री खारीनं येऊन काही किडे केले असतील तर ते निस्तरत... खालच्या छोट्या रस्त्यावरून लहान मुलांना आया शाळेत सोडायला चाललेल्या असतात... पोरांची संतत बडबड... आयाचं "जल्दी चलो.." "hurry up" "kuuai diaan" "date prissa" असं काहीसं त्यांच्या त्यांच्या भाषेत चालू असतं... तिसर्या मजल्यावरच्या एका मराठी मुलाला त्याचे बाबा नर्सरीत सोडायला जातात आणि रोज तो खाली आल्यावर आईला "टाटा" करताना .." आई मला पट्कन घ्यायला ये... पट्कन" असं सांगत असतो. पाहिलं 'पटकन' आर्त असतं आणि नंतरचं दरडावून... ह्या सगळ्यात अर्धा-पाउण तास कसा जातो कळतच नाही.. चहाही संपलेला असतो.. मग कपड्यांच्या Stand वर वाळत टाकलेला टॉवेल उचलते आणि आत येते...
आज उन आलेलं पाहिलं आणि आपण इतके दिवस उन्हाला मिस करत असल्याच जाणवलं... माझ्याच इतकी माझी झाडंही आनंदी झाली असणारेत... अश्यावेळी जास्त डुलताना दिसतात झाडं... (मनाचे खेळ.. पण तेवढे चालायचेच)
Asian paintsची जाहिरात होती ना "हर घर चुपचापसे ये केहता है.. अंदर इसमे कौन रेहता है" तसं बाल्कन्या सांगतात बरचं आतल्या लोकांबद्दल...
इथे खालच्या बाल्कनीत अनेक दोर्या लावल्यात... आणि त्यावर लहान बाळांच्या कपड्यांच्या पताका...
दीपिका लहान असताना बरेच दिवस थळच्या, आजोळच्या घरातली पडवी भरलेली असायची अश्या पताकांनी... लहान बाळ असणाऱ्या घरातला वास आवडतो मला... शेक-धूप, जॉन्सनची पावडर आणि पुन्हा पुन्हा धुतलेल्या लंगोट-दुपट्याचा... थळच्या अंगणानी आणि पडवीनी आम्हांला मोठं होताना पाहिलं आहे.. अंगणात बसून माती खाण्यापासून ते झोपाळ्यावर पाढे म्हणण्यापर्यंत... पकडापकडी खेळण्यापासून Candy Crush Saga खेळण्यापर्यंत... पाउस पडायला सुरुवात झाल्यावर पडवीतून बाहेर अंगणात भिजायला धावण्यापासून... भिजू नये म्हणून ओढणी गुंडाळत अंगणातून पडवीत पळत येण्यापर्यंत... आम्ही मोठ्या झालो, पडवी तशीच राहिली... नेहमीप्रमाणे आमची वाट बघत आणि आम्ही परत यायला निघताना आमची पावलं जड करत...
वरच्या बाल्कनीत सतत इथे तिथे धावण्याचे आवाज येत असतात.. आठवड्यातून एकदातरी वरून एखादं खेळणं आमच्या घरात पडलेलं असतं... दुपारी ती आई तिच्या मुलाला बाल्कनीतच ठेवते बहुतेक... दुपारभर खाद-खुड चालू असते त्या पिल्लाची..
आमची अलिबागच्या कॉलनीतली गॅलरी अशी होती बरीच वर्षं... आई दुपारी झोपली कि ती आवाजाने उठू नये म्हणून आम्ही गॅलरीत बसून खेळायचो... एका कोपर्यात आमची भातुकली कायमची मांडलेली होती. दुसऱ्या बाजूला अनेक कुंड्या होत्या.. अधूनमधून आम्ही पाणी घालत असू, पण तेव्हा ते department बाबांचं होतं. कधीतरी काहीतरी प्रयोग करायचो त्या झाडांवर..
आमच्या शेजारच्या बाल्कनीत इतकी धूळ असते.. इतका पाला-पाचोळा साचलेला असतो... आणि त्यात खितपत पडलेला vacuum cleanerचा खोका.. तिथे २-३ मुलं-मुलं राहतात... सकाळी लवकर कामावर जातात ते थेट रात्री परततात...
त्यांच्या बाल्कनीसारखीच आमची ठाण्याची बाल्कनी होती.. rather दोन्ही बाल्कन्या... हॉलच्या बाल्कनीत कबुतरांची शाळा भरायची... धुळीची रांगोळी पसरलेली असायची... बाल्कनीत गेलं कि पावलं उठायची धुळीत... आम्ही कधी जायचोच नाही तिथे.. दार कायम बंद असायचं. कधी वेळच नाही मिळायचा ती आवरायला-स्वच्छ करायला.. नाही म्हणायला एक-दोनदा केला होता प्रयत्न पण पुढे ३-४ दिवस सर्दी-खोक्ल्यानी जखडलं होतं... बेडरूमची गॅलरी मात्र त्यातल्या त्यात बरी होती... तिथूनच खाली एका आमदारच घर दिसायचं.. सतत कार्यकर्त्यांची धावपळ असायची... आमची फोनवर बोलायची जागा होती ती.. फोनवर पलीकडच्या माणसाला खालच्या कुत्र्यांचा आवाजही ऐकू जायचा... (कुत्रे म्हणजे कार्यकर्ते नाही)
-----------------------------------------
फोटोग्राफ

" If I lay here, If I just lay here.. would you lie with me and just forget the world?" - Chasing Cars, Snow Patrol
ती दोघं पडलेली जमिनीवर...आणि आजूबाजूला गठ्ठे ठेवलेले अनेक... उकडत असून पंखा लावू देत नव्हती ती कारण मग उडले असते ना तिचे सगळे फोटोग्राफ्स... तो नुसता पडून बघत होता एकटक तिला...तिने त्याच्याकडे पाहिलं.. हलकेच हसली... हात लांब केला, हाताला लागलेला तिचा फोटो घेतला जवळ तिने आणि त्याला दाखवत विचारलं...
"ह्यात कशी दिसत्ये मी?"
तो निरखून बघत होता... ती हसली मग
"मला माहित होतं नाही सापडणार मी तुला ह्यात... मी स्वतःलाही सापडत नाही ह्या फोटोत.. इय्यत्ता दुसरी किंवा तिसरी, कोळीगीत बसवलं होतं आमचं, आमच्या बैन्नी.. "मी डोलकर" वर.. अंजिरी साडी शोधत आईनी तुळशीबाग पिंजारलं होतं तेव्हा.. खूप कष्टांनी नटवलं होतं तिने मला आणि मी तिसर्या रांगेत मागून दुसरी उभी नाचाच्यावेळी.. तिला दिसलेही नसेन मी. पण तरी तिने घरी आल्यावर रव्याची खीर आणि पुरी केली होती "मी सर्वात सुंदर नाचल्याचं बक्षीस"
(सो बेसिकली ते सगळे रिकामे कागद असतात, त्यावर फोटो नसतातच! असा concept होता... पण नंतर उगाच alzheimer किंवा तत्सम चक्रात अडकले, आणि cliche होईल पोस्ट म्हणून पुढे लिहिलीच नाही )
-------------------------------------------

Tuesday, June 3, 2014
अर्धवट... १
चांगली कि वाईट माहित नाही... पण मला सवय होती कि एकदा पोस्ट लिहायला बसलं कि संपेपर्यंत उठायचं नाही ... एका बैठकीत लिहून काढायचं जे आहे नाही ते!
पण गेल्यावर्षीपासून ती सवय मोडली... दुसरी कामं दिसत असताना ब्लॉगकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. पोस्ट लिहायला उत्साहाने बसायचे आणि मग काहीतरी काम यायचं आणि ती तशीच drafts मध्ये पडून राहायची... आणि एकदा सोडल्यावर पुन्हा लिहायचा मूड कधी यायचाच नाही (ह्या पोस्ट्स बाबतीत अजूनही आलाच नाहीये) आता drafts मध्ये इतक्या अर्धवट पोस्ट साचून आहेत कि नवीन लिहायला आल्यावर त्या दिसतात आणि मग नवीन लिहायचा उत्साह जातो आणि जुन्या लिहून होत नाहीत...
मग म्हंटल अर्धवट तर अर्धवट... करून टाकूयात पोस्ट! म्हणजे मग पुढे नवीन लिहायच्यावेळी एक कारण कमी... खूप काही potential असणाऱ्या वगैरे नाहीयेत ह्या गोष्टी, कदाचित म्हणून पूर्णही झाल्या नाहीत... पण अर्थात potential लिहीणार्यात असावं लागतं हेही तितकचं खरं.. सो जर कोणाला ह्यातून काही उचलून नेऊन त्याचं त्याचं काही लिहायचं असेल तर बिनधास्त... Yard sale सारखं...
---- ब्लॉग सेल----
--- F R E E--- F R E E--- F R E E---
---------------------
१. मिठाचा खडा or tatsam title...
"...तुमच्या प्रतिक्रिया पत्राद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका... आता मी, ज्योती , तुमचा निरोप घेते.. पुन्हा भेटूया उद्या दुपारी ३ वाजता वाघ-बकरी स्पेशल चहाबरोबरच्या गप्पांमध्ये .. कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत पंडित कुमार गंधर्व ह्यांनी गायलेल्या "प्रभू अजी गमला" ह्या रचनेने.."
ज्योतीने ड्युटी चार्टवर सही केली. केस बांधत , सामान आवरून ती स्टूडियोबाहेर पडली.. चप्पल घालताना तिने समोर उभ्या असलेल्या रमाला विचारलं.. "गेली होतीस का काल सिनेमाला?"
रमा फाइलमधून डोकं वर न काढत म्हणाली "नाही.. आमच्या ह्यांना वेळ नव्हता"
ज्योतीने खूप मोठा आळस दिला आणि मेघाला A.C. कमी करायला सांगितला.. "मेघा.. एक खुसखुशीत चहापण प्लीज.."
रमाने आता मात्र दचकून ज्योतीकडे पाहिलं.. "खुसखुशीत चहा?"
" or whatever the adjective is.. आत्ता शिकवायला लागू नको प्लीज.. आधीच तू काय काय डेंजर मराठी बोलायला लावतेस मला.. आज काय तर 'आध्यारूढ' आणि अजून काय होतं ते..?"
"काहीही असलं तरी बोलतेस ना? येतात ना शेकडो पत्रं?" रमानी परत फायलीत डोकं घातलं..
"रमे.. अमन म्हणत होता, ह्या आठवड्यात कायच्या काय पत्रं आल्येत? थांब.. मीच जाऊन बघते.. तू काय सांगणार नाहीस..पण आधी चहा पिऊन जाते.. चहा येईपर्यंत एक झोप काढते.. ३ ते ५ झोपेचा स्लॉट आहे यार.. काकवा आणि आज्या ऐकतात फक्त मला.. पण का बोलत्ये मी? तू ऐकतपण नाहीयेस.. कुचकट.."
"मिठाचा खडा, तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. मी आमच्या घरच्यांच्या आनंदात कायम मिठाचा खडा बनूनच असते. मुलाला मित्रांबरोबर लांब फिरायला जायचं आहे पण आई जाऊ देत नाही. कारण माझ्यातल्या आईला १४ वर्षाचा असला तरी मुलगा लहानाच वाटतो.. मुलीला स्लीपोव्हर पार्टीला पाठवत नाही, तोकडे कपडे घातल्यावर बोलते. कारण बाहेरचं जग कसं आहे ते तिच्यापेक्षा २५ वर्ष जास्त पाहिलं आहे मी.. ह्यांना मसालेदार काही जास्त खाऊ देत नाही कारण मग रात्रभर त्यांनाचं त्रास होतो.. पण हो, तरीही मी मिठाचा खडाच असते"
"
----------------
२.
गोऱ्या पायातलं तिचं चांदीचं नाजूकसं पैंजण...
गेल्या शो नंतरचा अजून न गेलेला पुसटसा आल्ता...
मरून रंगाचं भडक नेलपेंट.. आल्त्यासोबत छान दिसतं म्हणून...
उजव्या पायाच्या अंगठ्यावर एक तीळ.. मावशी म्हणायची ज्याच्या पायावर तीळ असतो तो खूप प्रवास करतो..

--------------------------
Subscribe to:
Posts (Atom)