Monday, December 22, 2008

Schizophrenia beats dining alone! - Oscar Levant

मी कधीपासुन हेच आठवत्ये की आपण शेवटचं एकटं कधी जेवलो होतो...

schizophrenia... माहित नाही का, पण माझ्या आवडीचा विषय आहे. कॉलेजमध्ये एकदा psychology च्या project साठी हा विषय घेतला होता आणि त्यानंतर ह्यातला interest वाढत गेला. आई तर मला schizophrenic म्हणायला लागली होती मी इतक्या प्रेमाने ह्याचा अभ्यास केला होता, कधी नव्हे ते जाड-जुड पुस्तकं आणुन वाचली. project च्या नावावर देवराई, Beautiful mind, 15th park avenue, vanilla sky, woh lamhe ते अगदी बिपाशा बासुच्या मदहो्शी पर्यंत चे काही सिनेमे पा्हुन घेतले.

अगं माहित्ये का शंभरात एक माणुस schizophrenic...परवीन बाबी...तो सि्रीअल किलर...तिला वाटायचं की टॉम क्रुझ तिचा नवरा...split personalitychi case होती ती...पॅटर्न असतो एक त्याला...discrimination against patients...आनंद नाडकर्णी... शुभंकर... ailments हेच सगळे विषय डोक्यात घोळत असायचे. मग त्यातच अजुन खोलवर जाऊन
"सत्य असत्यामधे नक्की फरक तो काय?",
"वास्तवात नसणारी गोष्ट आहे असं समजुन वागणं म्हणजे disorder ह्यात वाद नाही... पण मग नक्की वास्तव काय असतं? मला भास होत असले तरी ते इतरांना ठाउक आहे पण माझ्यासाठी ते realच आहे ना...त्या reality बाहेर येउन unreal जगणं म्हणजे normal असणं का?"
" उद्या मी एकटी असताना माझ्या मनाने निर्माण केली एखादी मै्त्रिण मलाच माझा एकटेपणा घालवायला...जरी मी खुष असले तिच्यावर तरी फक्त ती "इतरांसाठी" real नाही म्हणुन मी वेडी का?"
सारखे अनेक प्रश्न पडले, सोडवायच्या भानगडीत मी पडले नाही कारण माझं मलाच कळत होतं मी खोल जात असल्याचं...हे मात्र नक्की डोक्यात यायचं "की उद्या मला schizophrenia झालाच तर मला लगेच कळेल" ...


December 2007

सकाळी उठल्यावर मला ट्रेनचे आवाज यायला लागले. स्टेशन घरापासुन साधारण २० मिनीटं चालत, आधी ६ महिने कधी आवाज ऐकु आले नाहीत...आणि आता कसे काय? auditory hallucinations, most common type of paranoid schizophrenia! दोन आठवडे मी सकाळी उठुन आवाज ऐकत होते, शेवटी न राहा्वुन माझ्या बहिणीला विचारलं,
"बाई गं, तुला सकाळी ट्रेनचा आवाज ऐकु येतो का ५:३०-६:०० ला वगैरे?"
ती म्हणाली,"हो अगं.."
आणि पुढे थंडी आणि आवाजाचं काहीतरी नातं सांगितलं, ते मी नाही ऐकलं कारण मी "नॉर्मल" आहे ह्याच्या आनंदात होते.


February 2008

त्याच्याबरो्बरच्या माझ्या गप्पा वाढायला लागल्या होत्या. तो एकदम hero material होता. रात्रभर net किंवा phoneवर गप्पा, त्याचं flirting... I was toh full sure,"he loves me!" मी तर आकाशातच होते त्यावेळी, चक्क चक्क्क ह्याला मी आवडते... पण तो तसं कधीच म्हणाला नव्हता...
Erotomanic delusional disorder...where one believes that another person, often famous or important, is in love with him or her.
मी तर त्याच्याशी बोलणंच सोडुन दिलं होतं... पण एक दिवस अचानक त्याचा फोन आला..."अरे, कुठे गायब झाल्येस? तुझ्याशी ३-४ दिवस बोललो नाही आणि मला realize झालं, how madly I love you!"

husshh!!


June 2008

बासच! आता काय, मी graduate झाले होते. २ ठिकाणहुन कामासाठी ऑफर होत्या... २-३ ठिकाणी written exam पास झाले होते आणि interview साठी select झाले होते, मास्टर्ससाठी! भरपुर काही येत होतं, भरपुर जास्त confidence भरलेला होता... बस्स आता थेट मिडीयाजगतातल्या कुठल्याश्या award function मध्ये award स्वीकारताना मी स्वतःला imagine करत होते...
Grandiose... A person with this delusional disorder has an over-inflated sense of worth, power, knowledge, or identity.

interviews मधे लागोपाठ ३दा जेव्हा सिलेक्ट नाही झाले तेव्हा परत जमिनीवर आदळले...आणि सगळा माज उतरला, तेव्हा लक्षात आलं हा Schizophrenia नाही ह्याला ’ग’ ची बाधा म्हणतात!


December 2008

काहीही झालं तरीही मनात schizophrenia ची शंका का येत्ये? उगाचचं काल बाजुला मांजर असुनही ते फक्त hallucination आहे म्हणुन मी त्याला हातही लावला नाही? ह्याला काय अर्थ आहे?
दरवे्ळी मी माझी Martha Mitchell करत्ये. काहीतरी problem नक्की आहे.
Somatic delusional disorder...person believes that he or she has a medical problem.

मी आनंदी होते....
कारण आता मला भास होत नाहीये, मला खरचं schizophrenia आहे म्हणजे ही delusional disorder नाही!
एक मिनीट... ही delusional disorder नाही..म्हणजे मला schizophrenia नाही..म्हणजे ही disorder आहे...पण मग नक्की काय? मला schizophrenia आहे....तर somatic delusions होत नाहिय़ेत..पण मग schizophrenia नाही? पण मग काय आहे? आणि मग नक्की काय नाहीये? मी normal आहे?
म्हणजे मी वेडी नाहीये? पण वेडी माणसं कायम असचं म्हणतात की ती वेडी नाहियेत! बरोबर त्यांना कसं कळणार ती वेडी आहेत ते! पण मला कळतय मला schizophrenia आहे ते... अगं तेच तर ना..आपल्याला काही नाहीये , त्यामुळे आहेआसं वाटतं आहे पण त्यामुळे ते नाहीये... थांब थांब तू बोल्लेला ऐकु येत नाहीये ट्रेन जात्ये ना मागुन.. तो बघ शाहरुख उतरला Train मधुन... he really loves me yaa...माझ्यासाठी इतकं केलं त्याने! तुझ्यासाठी करेलच तो असं तु पंतप्रधान आहेस बाई गं! हो बरोबर आहे... पण एक बरं झालं आपल्याला schizophrenia नाही ते कळलं!




* mi jaswandi... normal aahe..mala schizophrenia zalela naahi! (aslyas mahit nahi)

Friday, December 12, 2008

Coming soon...

बास्स म्हणजे बास्स झालं आता...
शेवटची पोस्ट ३० सप्टेंबरला टाकली होती आणि त्यानंतर काही लिहीलंच नाही इथे!
मलाच माझा राग येतोय, अनेक उत्साही ब्लॉगर्स असा ब्लॉग लिहीतात आणि काही दिवसांनी विसरुन जातात तसं झाल्यासारखं वाटतंय मला... मला ह्या ब्लॉगला मारायचं नाही आहे...

कदाचित हेच कारण असु शकतं मी काही न लिहायचं, सध्या काही सुचत नव्हतं, जे सुचत होतं ते ब्लॉगवर टाकण्यालायकीचं नव्हतं... पण आज मात्र राहावलंच नाही.... आत्ताही लिहण्यासारखं काही नाही आहे... बस, ह्या ब्लॉगला कळवण्यापुरतं की बाबा, संपव आता विश्रांती... आपण परत लिहायचं आहे...

पुढच्या आठवड्यात लिहायचंच्च्च आहे आता...

Tuesday, September 30, 2008

The end...the beginning...

काही गोष्टी संपवाव्या लागतात, किंवा अर्ध्यावर सोडुन द्याव्या लागतात. कारण जेव्हा १ गोष्ट संपते तेव्हाच दुस-या गोष्टीला सुरुवात होते. cliche मारायचाच तर "प्रत्येक शेवट, एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात असते".

इथे आधी नवीन कहाण्या सुरु झाल्या आणि म्हणुन मग जुन्या गोष्टी... "hutt, I was so childish" म्हणत संपवल्या, संपवल्या म्हणण्यापेक्षा डोक्यातल्या कुठल्यातरी अडगळीच्या खोलीतल्या एका कोप-यातल्या जाड्जुड ट्रंकेत कुलुपबंद केल्या!

तिने तिच्या स्वतःची गोष्ट कधीच बदलली होती, त्याच्याविषयी काहीच माहित नव्हतं, काही दिवसांपुर्वी अचानक दोघे एकमेकांसमोर आले... :) तिने विचार केला होता तसं काहीच नाही झालं, तो प्लॅन अजुन १० वर्षांनंतरचा होता, आत्ताशी कुठे १-२ वर्षच झाली होती.

मुंबई भरपुर मोठी आहे... पण तरीही त्याच्याच उपनगरातल्या एका मॉलच्या बाहेर दुस-याच कोणाचीतरी वाट पाहत असताना तिला तो दिसला... त्याच्याबरोबर रेवा,

"huh, I knew this... हे तर होणारचं होतं, माझ्यानंतर तिच तर "best friend" होती"
best friend म्हणुन ती स्वतःशीच हसली... आपण इतके immature ही होतो कधीतरी!

ती: hey, hi! (मला ओळखतोस का?)

तो: Hellllooo.... तू इथे? कशी काय? कित्ती दिवसांनी... haah..m soo Happy to see u after so many days...

तिला ह्या आधी तो काय बोलतोय आणि त्याच्या मनात काय आहे हे दोन्ही कळायचं. पण आता त्या ultrasonic आवाजाचे बदलेले receivers त्याच्यासोबत होते.

ती: hi रेवा! :) u r looking cute...

तो: as usual

ती: yupp... (च्या मारी, काहीतरी लाज ठेव)... aahhaa.. somebody is blushing n all huh!

रेवा: अगं आत्ता काही दिवसांपुर्वीच आम्ही तुझी आठवण काढली होती...

ती: u want me to believe you babes? काय चालु आहे सध्या?

तो: यार मला वाटलं तू smart आहे, तू guess करू शकली असशील...

ती: हा हा ह... (हा प्रश्न मलाच विचारायचा होता का लेका?)

.......

रेवा: (त्याला) चल ना रे, m hungry! (तिच्याकडे बघुन) हिला पण घेउन चलु, चल ना आमच्यासोबत..

ती: नाही, माझी एक मैत्रिण येत्ये भेटायला, येईलच थोड्या वेळात आणि मला ’कबाब मधे हड्डी’ सारखं काही बनायची इच्छा नाहीये... ( यार निघा की आता... अजुन थोडावेळ तुम्हाला एकत्र नाही बघु शकत...)

तो: चल बे चुपचाप... पता नही नंतर कधी भेटु की नाही... तू तो जा रही है ना कही परदेस....

ती: ठीक आहे, चलो

त्या दोघांच्या पाठीमागे ती चालत होती
(परत कधीच भेटणार नाही? हो आता खरचं परत कधी भेटणार? पण भेटायचं तरी का आहे? २ वर्षांपुर्वी एकही दिवस असा जायचा नाही जेव्हा हा आपल्याशी बोलला नसेल. तेव्हा कोणी सांगितलं असतं की असाही एक दिवस येईल तर आपण त्यावर इतके हसलो असतो. इतक्या पटापट सगळं बदलतं आहे ह्यावर विश्वास नाही बसत...)

तो: hello, कहा खो गई? काय घेणार?

ती: १ कोक.. small ( as usual...)

तो: बास? इतकच? रेवा तुला?

रेवा: मला ना... आधी mcveggie, coke large नंतर बाकी सांगेन

तो: as usual!!

......

ती बसलेली, ती दोघं काहीतरी बोलत होती... १ कोक शेअर करत होती...
(thank god..दोन स्ट्रॉ नाही घालत्येत त्यात... घ्या की २ वेगवेगळे ग्लास, आख्खं जात नाही तर small घ्या की राव)

आता तिने आपला mobile काढला, ISD परवडत नाही पण आता तिने ठरवलचं होतं... (बास झालं, खुप पाहिलं आता.. मी पण काही "तेरे जुदाई मधे आसु वाहावत" नाहीये!)

ती: excuse me huh!

बोलायला सुरुवात केली मोबाईलवर, खरं तरं love u, miss u वगैरे कधी बोलत नाही ती कोणासमोर पण आज बोलली. संपुर्ण वेळात एकदाही त्याचा उल्लेख केला नाही. मग call cut केला आणि रेवाकडे बघुन हसली... मग पुढची १०-१५ मिनीटं रेवाकडे बघुन "अगं माझा हा ना असा आहे, तसा आहे" types काहीतरी बोलली.

ती: खुप पकवलं का मी? (नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त नाही) मला निघायला हवं आता.. मैत्रिण वाट पाहत असेल माझी! चल मी निघते .. आणि तुम्हाला दोघांना congrats n futureसाठी all the best! :)
.....

ती उठुन चालायला लागली, आधी तिने ठरवलं की मगे वळुन बघायचंच नाही.. पण मग अचानक आठवलं अरे आपण आता ह्यापुढे त्याला आणि तिला कधीच भेटणार नाही. म्हणुन तिने एकदा मागे वळुन पाहिलं दोघांनाही हात केला... त्यांच्यासाठी आत्ता ही सुरुवात होती... त्यांच्या ह्या सुरुवातीने हिच्या डोक्यातली एक ट्रंक कायमची बंद झाली होती...

मुंबईहुन परत येताना बसमध्ये अनेक आठवणी तिने play केल्या. संपलेल्या आठवणी recycle bin मधे टाकल्या!
....

रद्दी टाकायच्या आधी सगळे पेपर पुन्हा एकदा चाळायची माझी सवय नाही जायची कधीच बहुतेक!

Friday, September 12, 2008

सहस्त्रावर्तन

श्री गणेशाय नम:
हरि ओम नमस्ते...

सुरु झालं... मी बाहेरच्या खोलीत बसले होते.
मी agnostic नाही अगदी, पण confused नक्की असते ह्या सगळ्या "देव-देवता-पुजाअर्चा" बाबतीत!

गणपती सण म्हणुन मला भारी आवडतो, दिवाळीपेक्षाही जास्त... पण "आज सहस्त्रावर्तन आहे हं संध्याकाळी" असं काकूनी सांगितल्यापासुन माझा mood गेला होता. म्हणा.. गणपतीत गावाला २च दिवसांसाठी गेले होते, त्यातही एक दिवस सहस्त्रावर्तन खाणार ह्याचा राग जास्त होता. आणि काकू बिचारी "पोरं २ दिवसांसाठीच आल्येत त्यातच सहस्त्रावर्तन करुन घेउ म्हणुन राबत होती". मस्तपैकी वड्या-घारग्यांचा बेत होता...हेच त्यातल्या त्यात बरं होतं!

आत माजघरातल्या देवघरासमोर सगळे बसले होते, आणि मी बाहेर पडवीतल्या झोपाळ्यावर झोके घेत होते. बाबांनी माजघरात लावलेल्या धुपाचा वास पडवीतही छान घमघमत होता... झोपळ्याचा ’किर्रर्र...खट्टक...किर्रर्र..." चा आवाज आतल्या आवर्तनाच्या सुरात होता... पण माझ्या मनात मात्र रामरक्षा सुरु झाली होती.

ह्या कोकणातल्या घरी वर्षातुन १५-२० दिवसच येणं होतं, पण लहान असल्यापासुन पडवीतल्या झोपाळ्यावर संध्याकाळी बाबांबरोबर बसुन परवचा म्हणायची सवयच लागली आहे. पुर्वी अनेकदा लाईट गेलेले असायचे गावात संध्याकाळी तेंव्हा बाबा झोपाळ्यावर येउन बसले रे बसले की मी पण त्याच्यासोबत बसायचे, बसायचे काय? त्यांच्या मांडीवर डोकं ठेवुन पडायचे, मग मला थोपटत थोपटत बाबा रामरक्षा सुरु करायचे. त्यांच्या आवाजात, त्यांच्या शब्दोच्चारात, त्या वातावरणात एक वेगळंच भारलेपण यायचं. रामरक्षा म्हणावी तर ती बाबांनीच आणि पडवीतल्या झोपाळ्यावर बसुनच... कंदीलाच्या प्रकाशात...झोपाळ्याच्या झोक्यांच्या सुरात!

रामरक्षा झाली की बाबा पाढे म्हणायला सुरुवात करायचे..."हं म्हण आता माझ्याबरोबर, एक मी म्हणेन, एक तू म्हण". इतका वेळ रामरक्षा ऐकताना समोरच्या भिंतीवर मोठया भावाचे सावलीचे खेळ बघत हसणारी मी एक्दम झोपेचं सोंग करायचे...पण बाबा उठवायचेच... मग मला नेमके १३,१७ सारखे वाईट पाढे यायचे. तेराचा पाढा म्हणताना मी "तेरा त्रिक एकु..." म्हणुन थांबायचे... तो आकडा ४९,५९,६९ जो काही आहे तो बाबांनी समजुन घ्यावा अशी अपेक्षा असायची... पण कायम ह्या दुष्ट "एक्कु" मुळे मला १३चा पाढा ५ वेळा म्हणायला लागायचा... तरी एकदाका १६चा पाढा झाला की खरी गंमत यायची, माझी लहान बहीण तर ओटीच्या पाय-यावर बसुन टाळ्या वाजवत म्हणायची... "आता ताई रडणार"... सतरा सत्ता काय असतं हे मला आजही आठवत नाही...

आत्ताही बाहेर अंगणातल्या काळोखात बघत मी सतरा सत्ता काय आहे आठवत होते...इतक्यात बाबांची आतुन हाक आली, मला ते आत बसायला बोलावत होते. मी शांतपणे त्यांच्यामागे जाऊन बसले, माझ्या मागेच एका सतरंजीच्या घडीवर आमची मांजर येऊन झोपली होती. मग काय, मला मज्जाच होती... माझे तिच्याबरोबरचे खेळ सुरु झाले. पण मी काय करत्ये हे बाबांना दिसत नसलं तरी स्वयंपाकघरातुन काकुने पाहिलं होतं... तिने मला डोळ्यांनीच दटावलं! त्यामुळे आता वेगळं करण्यासारखं काहीच उरलं नव्हतं, गणपती आणि माझ्यामधेच सगळे बसले होते, गणपतीही दिसत नव्हता...

मग मी डोळे मिटुन घेतले, बघणा-याला वाटावं, काय अगदी ध्यान लावलं आहे...
आधी तो आला डोळ्यांसमोर, पण त्याला FF [fast forward] केलं, दुस-या दिवशी निघायचं आहे, त्याची तयारी..FF, काकुनी गौरीची काढलेली पाउलं..FF, काही वर्षांपुर्वी माझं आणि बहिणीचं गौरी आणण्यावरुन झालेलं भांडण...FF, मोटरसायकलवर बाबांच्या पुढे बसायला म्हणुन आम्ही केलेली नाटकं...FF, फक्त मी आणि बाबा कुठेतरी जात होतो, मी खणाच्या कापडाचा cute फ्रॉक घातलेला... मी ह्या scene पाशी थांबले...
मी पहिली-दुसरीतली असेन... दोन बो घातलेले, फ्रॉकला आईने रुमाल पिनने लावुन दिलेला. बाबांचं बोट धरुन मी कोणत्यातरी घरात गेले... आत्ता बसल्येत तसे १०-१२ लोक तिथे बसले होते, सहस्त्रावर्तनच चालु होतं... अलिबागला दर संकष्टीला कोणा ना कोणाकडे होणारं सहस्त्रावर्तन!
मी बाबांना चिकटुन बसलेले, एक आवर्तन झाल्यावर एकदम बाबांनी ’हरि ओम नमस्ते गणपतये...’ ला सुरुवात केली... आपले बाबा सगळ्यांपेक्षा जोरात म्हणताय्त ह्याचा मला कित्ती आनंद झाला होता, आणि अचानक एक गोष्ट लक्षात आली, अरे हे तर लाईनीने सगळे एक-एक काका अथर्वशीर्ष म्हणतायत की... आता बाबांनंतर कोणीच उरलं नव्हतं. म्हणजे बाबांनंतर मी म्हणायचं की काय? आधी मला थोडी भीती वाटली पण मग मी ताठ बसले... बाबांचं "श्री वरदमुर्तये नमो नमः" म्हणुन झालं, आणि मग मी लगेच माझ्या अथर्वशीर्षाला सुरुवात केली. सगळे काका कौतुकाने माझ्याकडे बघत होते. मी चुकेन की काय अशी भीती असल्याने मी पण माझी "चुक होण्याआधी संपवुया" ची सुपरफास्ट ट्रेन सोडली...माझं म्हणुन झालं, सगळ्यांनी एकदम "अरे व्वा.." "शाब्बास" वगैरे दाद दिली. कित्ती छान वाटत होतं... ज्या काकुंच्या घरी आवर्तन होतं त्यांनी बक्षीस म्हणुन मला एक छोटी कापडी पर्स दिली होती... घरी आल्यावर बाबांनी आईला माझं कौतुक सांगितलं होतं...


एकदम डोळे उघडले, बाबांचा आवाज आला... का माहित नाही पण माझे डोळे भरुन आले होते. फलश्रुती सुरु झाली होती. ’ओम सहनाववतु सहनौभुनक्तु’ सुरु झालं, ह्या श्लोकात माझं नाव येतं म्हणुन हा माझा आवडता आहे. आजही हे कुठेही ऐकलं तरी माझ्या चेहे-यावर हसु उमटतं!

काकुनी आतुनच मला खुणेने "आता पानं घ्यायला ये" म्हणुन बोलावलं. मी अनिच्छेनेच उठले... पण माझ्यातली छोटी मुलगी अजुनही बाबांना चिकटुन बसली होती. rather ती तिकडुन कधी उठलीच नाही...
झोपाळ्यावर असतानाही नाही आणि आत्ताही नाही. आणि पुढे कधीही त्या छोट्या मला, मी तिथुन उठवणार नाहीये... मोठी वाईईट्ट मी त्यांच्यापासुन कितीही दुर गेले तरी!

Thursday, August 28, 2008

सावरी

कॉलेजच्या संपुर्ण आवारात मिळुन साधारण ५-६ सावरीची झाडं आहेत. आत्ता सगळ्यांच्या शेंगा फुटायल्या लागल्या आहेत, त्यामुळे सगळीकडे सावरीचा कापूस उडत असतो. सावरीला शेवरी म्हणतात बहुतेक, मला नक्की माहित नाही, तर सगळीकडे हा कापूस हवेवर तरंगत असतो.

आज मी लायब्ररीमधुन परत आमच्या डिपार्टमेन्टमध्ये यायला निघाले, आणि अचानक ह्या झाडांवर नजर गेली. त्या झाडाच्या सावलीतच एक जास्वंदाचं झाड आहे आणि बाजुला चाफ्याचं... अचानक वाटलं, ह्या झाडाला वाटत नसेल का की आपल्यालाही चाफा किंवा जास्वंदासारखी फुलं हवी. आपल्याला कशी फुलं येतात ह्याकडेही कोणाचं लक्ष नसेल... त्याच्या हिरव्या आणि मग फुटक्या वाळलेल्या शेंगा आणि आता त्यातुन बाहेर डोकावणारा कापूस. त्या झाडाला वाईट वाटत असेल ना त्याच्या रुपाबद्दल? झाडाला माणसासारखं नट्टाफट्टा करणं जमत नाही ना... नाहीतर सावरीच्या झाडाने नक्कीच काहीतरी makeup केला असता!

अरे.. असं का? झाडाला वाईट का वाटेल? ते सुंदर नाही असं मला वाटतं पण कदाचित ते झाड त्याच्या कापसात आणि शेंगांमध्ये आनंदी असेल. त्याला नक्कीच वाटत असेल की आपण छान दिसतो, आपल्यासारखा कापुस जास्वंदाला आणि चाफ्याला येत नाही ह्याचा त्याला अभिमान वाटत असावा...

कॉलेजच्या माळ्याने semiotics चा अभ्यास केला होता का? अचानक माझ्या डोक्यात काहीतरी "टिडींग" वाजलं...
समोरुन येणारा मुलींचा तो घोळका... सुंदर ची definition मला माहित नाही... cliche बोलायचं झालं तर "बघणा-याच्या नजरेत सौंदर्य आहे." आणि मानणा-याच्या मनात! ह्या सगळ्या मुली अतिनॉर्मल दिसणा-या होत्या, पण माझ्यासाठी! त्यातल्या प्रत्येकीनेच घरुन निघताना दहावेळा आरसा बघितला असेल, कोणी आपल्याला बघत नाही न हे बघुन स्वत:ला फ्लाईंग किसही दिलं असेल, कानातले बदलुन पाहिले असतील, ओढणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेउन पाहिली असेल, अनेकदा केस नीट केले असतील... आपण सुंदर आहोत आणि हे आपल्याला सांगणारा, आपलं सौंदर्य ओळखणारा कोणीतरी आपल्याला नक्की भेटेल ह्याचा त्यांना विश्वास असेल. मी कोण आहे हे म्हणणारी की ह्या मुली सुंदर नाहीत? सावरीचा कापुस छान दिसत नाही हे मी कोण म्हणणार?

हा विचार करताना मी कॅन्टीनपर्यंत आले होते, जगावेगळी गाणी लावण्यात अण्णा expert आहे. तो अनेक मुलींशी flirt करतो आणि ह्या बावळट मुली लाजतात... आज "लुटेला... जलवा तोरा, नखरा तोरा गोरी हमका लुटेला" लावलं होतं! पण मग लाजु देत ना त्या मुली, लाजताना छान हसतात त्या पोरी, काळ्या-मिळ्या असल्या तरी हसताना कोणीही मुली चांगल्याच दिसतात. कोणी flirt केल्यावर आपल्याला आता लाज वाटत नाही म्हणुन ज्यांना लाज वाटते त्या मुलींना बावळट म्हणणारी मी कोण? सावरीच्या झाडाने पाऊस पडल्यावर मोहरू नये असं मी का म्हणावं?

कॅन्टीनच्यावर कॉमन रुम आहे, सध्या कसल्यातरी फेस्टची तयारी चालू आहे. आवाज चोरुन गायल्यावर त्यांना आपण छान गातोय ह्याचं समाधान वाटत असेल तर काय हरकत आहे? "देस रंगीला रंगीला" वरच्या सगळ्या स्टेप्स त्यांना पाठ आहेत, आणि त्या आणि तत्सम गाण्यांवर त्या आत्मविश्वासाने नाचु शकतात.. चांगलंच आहे ना? काजोल आणि राणी मुखर्जीच्या त्या भक्त आहेत आणि त्यांच्यासारखे पंजाबी ड्रेस घालतात... कारण त्यामुळे त्या स्वत:ला काजोल आणि राणी समजतात... मग वाईट काय आहे? माझी मैत्रीण म्हणते "इन लोगोंको फॅशन समझताही नही है।"
ओह प्लीजच...कदाचित त्यांना तुझी फॅशन कळत नसेल, त्यांच्यासाठी तुळशीबागेत displayला असलेले कपडे "in vogue" असतात. सावरीचं झाड स्वत:पाशी कापसाचा सडा पाडतं, शेंगा सजवतं... चाफ्याची सर कदाचित ह्याला येणार नाही आणि चाफाही कधी सावरीला समजु शकणार नाही!

होम सायन्सच्या मुली आहेत ह्या... इतरांनी कायम हिणवलेल्या, "पुढे जाउन काय मोठे दिवे लावणारेत? घरंच तर सांभाळणार ना किंवा काहीतरी छोटी-मोठी कामं, काय मिळवणारेत भविष्यात? लग्नं करुन आया होतील आणि मग संपलं त्याचं अस्तित्व..." त्यांच्या डोळ्यातली स्वप्नं कोणाला दिसल्येत पण? आकाशात उडायची स्वप्नं... उंच उंच जायची स्वप्नं... स्वत: सुंदर होऊन, जग सुंदर करायची स्वप्नं... सावरीच्या कापसाने वा-याबरोबर घेतलेली आकाशझेप कोणी पहिल्ये का?

मी आता माझ्या डिपार्टमेन्ट पर्यन्त आले होते. आमच्या डिपार्टमेन्टजवळ सावरीचं झाड नाहीये, पण तिथपर्यंत सावरी उडुन आली होती. तेवढ्यात सुष्मा बाहेर आली, अमरावतीची सुष्मा... माझी सिनीअर, तिला एका मोठ्या NGOमधे जॉब लागला त्याचे पेढे द्यायला! पेढा खात खात माझी मैत्रीण म्हणाली "यार, कही और नही मिला क्या जॉब? किसी प्रोडक्शन कंपनीमे try किया होता..." सावरी उडावी अश्या नाजुकतेने सुष्मा हसली...गेल्या वर्षभरात तिच्या गालावरची खळी मला दिसलीच नव्हती! ती सुंदर आहे. गेल्यावर्षी welcome partyमधे ती ’ताल से ताल’ मिला वर नाचली होती, तो नाच फालतु नव्हता!

NGO बद्दल सुष्मा सांगत असताना माझी मैत्रिण cellवर gossip करण्यात busy होती. जास्वंदी, चाफा, गुलाब आणि बाकी सगळी फुलं सुंदर आहेत. कायमच सगळ्यांना आवडतात! पण आकाशाची स्वप्नं प्रत्यक्षात जगते ती सावरी... उंच भरारी घेते ती सावरीच!

खुप वेळ मनात चाललेली ही सगळी विचार चक्र एकदम थांबली... आता मन शांत झालं होतं, कधी नव्हे ते आमच्या कॉलेजात आज इतक्या सुंदर मुली दिसत होत्या... हातावरची सावरी मी हळुच फुंकरली, आता ती तिची वाट शोधत होती... वा-याबरोबर उंचच उंच जायच्या बेतात होती!

Thursday, August 21, 2008

इयत्ता पहिली, पहिल्यांदाच लांब कुठेतरी आई-बाबांशिवाय जाणार होते. आमच्या शाळेची ट्रीप होती शहाड-टिटवाळ्याला, जरी सकाळी जाउन संध्याकाळी परत यायचं होतं तरी खुप वेगळं वाटत होतं. आजही आई-बाबा बसपाशी सोडायला आलेले आठवताय्त. पहाटे पाच वाजता, अंधुकश्या प्रकाशात आई-बाबांचे चेहरे...त्यांच्या चेहेर-यावरचं कौतुक आणि काळजी... नाही, शब्दात नाहीच बसवता येणार तो प्रसंग... आपण जिथे जाणार आहोत तिथे खुप मज्जा येणारे, काहीतरी नवीन असणारे ह्याचा आनंद आणि त्याच वेळेला आई-बाबांपासुन लांब जाणार म्हणुन डोळे भरुन आलेले, गळा जड झालेला...

त्यानंतर हा प्रसंग खुपदा आला, संदर्भ बदलत गेले. मोठी झाल्यावर अनेकदा मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळल्यावर आई-बाबांकडे बघायला सवडही नाही मिळाली. परवा अलिबागहुन परत आले तेव्हा आई-बाबा सोडायला आले होते स्टॅंडवर, खूप दिवसांनी आज गळा दाटुन आला, रडायचं नव्हतं म्हणुन बस लवकर सुटायची प्रार्थना करत होते. अचानक लक्ष गेलं, असं होणारी मी एकटी नव्हते. अलिबागहुन पुण्याला शिकायला आलेली भरपुर मुलं आहेत आणि परवा आख्खी बस अश्या students नीच भरलेली होती. बाहेर अनेक आई-बाबा उभे होते, काळजी आणि कौतुक डोळ्यांत... अनेक सुचना!

१२वी, CET, results, प्रवेश प्रक्रिया आणि अशी अनेक दिव्यं पार केल्यावर, तावुन-सुलाखुन झाल्यावर एक नवं पर्व सुरु होतं. अनेकांना आपलं घर, आपलं गावं सोडावं लागतं... आमच्या अलिबागेत तर जवळ जवळ सगळेच शिकायला बाहेर पडतात. जुन महिना उजाडला की अनेक नवीन प्रश्न उभे असतात. कुठे ऍडमिशन मिळेल? नवीन कॉलेज कसं असेल? नवीन शहर कसं असेल? तिथली मुलं आपल्याशी चांगलं वागतील ना? आपण अलिबागहुन आलो आहोत हे सांगितल्यावर आपल्याला हसतील का? इथल्या सारखे तिथेही नवीन मित्र-मैत्रिणी मिळतील ना? घरची, अलिबागची जास्त आठवण तर येणार नाही ना? आपण एकटं राहु शकू ना? अनेक अनेक प्रश्न सारखे डोक्यात येत असतात... आणि मग एक दिवस शिकायला घराबाहेर पडायची वेळ येतेच! नव्या जगात जातोय याचा आनंद आणि आपल्या जगातून बाहेर येतोय याचं थोडं दुखः... बसपाशी सोडायला आलेले आई-बाबा... अगदी तसेच दिसत असतात जसे ते टिटवाळ्याच्या ट्रीप साठी सोडायला आलेले तेव्हा दिसत होते.

आईच्या डोळ्यांत पाणी येतं असतं आणि ती ते लपवायच्या प्रयत्नात असते. आपलं बोटं धरुन चालणारं आपलं बाळ इतकं मोठं कधी झालं हे तिला समजलंच नसतं. आपल्या बाळाबद्दलचा विश्वास तिला असतो पण शेवटी काळजी डिपार्टमेंटही तिलाच सांभाळायचं असतं ना. मग २७व्यांदा ती लोणचं कुठे ठेवलं आहे, चिवडा लवकर संपव, वड्या काळ्या बॅगेत आहेत. चादरी, स्वेटर्स, कपडे सगळयाविषयीच्या काहीतरी सुचना असतात. बाबांनी पैसे दिलेले असले, ATM card दिलेलं असलं तरी आईनेही वरखर्चाला हळुच दिलेले पैसे असतात, अजुन हव्येत का म्हणुन विचारत असते! बाबांना तोवर त्यांच्या ओळखीचं कोणितरी भेटलेलं असतं ते जास्त emotional न होता दुस-या काकांशी गप्पा मारण्यात बिझी होतात!

हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे,ते दुर दुर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यांतील आडवुन पाणी,हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता...अन तुम्हास नियती हसते


संदीप खरेच्या या ओळी आत्तापर्यंत जितक्यांदा ऐकल्यात हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर आलयं आणि समोरचं सगळं धुसर होत गेलयं!

इतके दिवस हे निरोप घेणं सोप्पं होतं हे आता वाटायला लागलं आहे, जेव्हा मी पुढच्यावर्षीचा विचार करत्ये!
बसच्या खिडकीमधुन आईशी बोलता यायचं, बाबा दिसायचे... नजरे आड होईपर्यंत टाटा करता यायचा... आता ते विमानाच्या खिडकीतुन कसं जमणार?
शाळेची सहल रात्री परत यायची... एका दिवसभराच्या गमती जमती पुढे आठवडाभर सांगायचे!
मुंबईला शिकायला आल्यावर दर शनिवार-रविवार घरी जायचे तेव्हा आठवड्याभरच्या गोष्टी २ दिवसात सांगुन संपवायला लागायच्या!
पण आता पुढे...?


(संवादिनीने आजच थोड्याफार अश्याच आशयाचं लिहीलं आहे. माझंही हे पोस्ट अनेक दिवस अर्ध ड्राफ्ट्मधे पडुन होतं, आज तिचा ब्लॉग वाचल्यावर पब्लि्श केलं)

Friday, August 8, 2008

बंडु, पिंगी आणि आई!

"पांढरा... तिचा आवडता रंग! आणि म्हणुनच तिची आख्खी खोली पांढरीशुभ्र फक्त फ्लॉवरपॉटमधलं ते पिवळं सूर्यफुलचं काय ते वेगळ्या रंगाचं. छोटुश्या पिंगीच्या हातात असतं तर तिने सूर्यफुलही पांढरं रंगवलं असतं. खाली अंथरलेल्या फरच्या पांढ-याशुभ्र गालिच्यावर बसुन पिंगी पुस्तक वाचत होती. तिच्या शेजारी तिचा बंडु बसला होता, बंडु म्हणजे किनई तिचा "white stuffed toy" आहे. पण शूsss त्याला असं म्हंटलेलं तिला आवडत नाही बरं का... तिच्या साठी तो तिचा मित्र आहे, बंडु ससुला!

पिंगी पुस्तकातलं एक एक चित्र बंड्याला दाखवत होती. काय लिहीलं आहे ते वाचता कोणाला येत होतं? म्हणजे खरं तरं बंड्याला वाचता यायचं पण तो काही बोलायचा नाही, शांतच असायचा! पिंगी आणि बंडु आज हे पुस्तक ९८व्यांदा बघत होते. Childcraft part 2! सगळी काय ती झाडं-झाडं आणि झाडं... तीच तीच चित्रं बघुन बंड्याला आता झोप यायला लागली होती. त्याने एकदा जांभई देण्याचा प्रयत्नही केला पण त्याला माहित्ये, अभ्यास करत असताना जांभई द्यायची नसते. नाहीतर पिंगीची आई जसं पिंगीला मारते तसं पिंगी त्याला मारेल. म्हणुन तो ती चित्रं परत पाहायला लागला. त्यातल्या एका चित्रात same 2 same बंड्याच्या जुन्या घरासारखी एक जागा होती, एक भलं मोठ्ठं झाड आणि त्याच्या मुळाशी एक छोटुकलं बीळ! बंड्याला घरची आठवण यायला लागली... त्याला घरी जायचं होतं, त्याला रडु येत होतं पण शहाणी मुलं रडत नाहीत म्हणुन तो नाही रडला.... त्याने पिंगीकडे पाहिलं. पिंगी पुस्तक तसचं उघडं ठेवुन कधीच झोपी गेली होती.. वेड्डी मुलगी, पुस्तक कधी असं उघडं ठेवतात का?

पिंगीचे डोळे अचानक काहीतरी आवाज झाला आणि उघडले. "अरे माझ्या खोलीची वरची भिंत निळी कशी झाली? आणि हे कानात काय टोचतयं?" ती लगेच उठुन बसली. आणि बघते तर काय? ती तिच्या पांढ-याशुभ्र खोलीत नव्हतीच मुळी, ती होती गवतात पडलेली, तिचा पांढराशुभ्र फ्रिल फ्रिलचा फ्रॉक मळला ना त्या गवतामुळे! आणि हे काय ससुला कुठे, दिसतच नाहीये की! ओह, ते भलं मोठ्ठं झाडं...अगदी पुस्तकात आहे तसं... हं, बंड्या नक्की त्या बिळात गेला असणार...त्याचं घर आहे ना ते..तसं म्हणाला होता तो पिंगीला एकदा... पिंगी दबकत दबकत बंड्याच्या घरापाशी गेली, पिंगीला गंमतच वाटली... बंड्याच्या घराला किनई दारचं नव्हतं... तिने बाहेरुनच हाक मारली "बंड्या ए बंड्या... ये ना रे बाहेर.. तू आत काय करतोयस रे?" बंडु त्याचे लांब कान सांभाळत बाहेर आला आणि पिंगीला म्हणाला "पिंगू चल ना माझ्या घरी... मी इतके दिवस तुझ्या घरी राहिलो ना.. आता तूही काही दिवस माझ्याकडे राहा... मला दोन भाऊ पण झाल्येत छोटे छोटे. आपण सगळे मज्जा करु" पिंगी मग खाली वाकली आणि बंड्याच्या घरात गेली.

तिला खुपचं गंमत वाटत होती. सगळं कसं छोटं छोटं होतं बंड्याच्या घरात! घरातल्या छोट्या टी.व्ही.वर ससा-कासवाची शर्यत चालली होती, आणि ससा ह्यावेळी जिंकला होता. बंड्या म्हणाला "पिंगी जो जिंकला ना तो माझा ससे काका आहे. हो किनई रे बाबा?" बंड्याने त्याच्या टी.व्ही बघत असणा-या बाबांच्या मांडीवर चढून विचारलं. "पिंगी माहित्ये का? माझा बाबा ना मला ह्या रविवारी पोहायला शिकवणारे". पिंगीला एकदम तिच्या बाबाची आठवण झाली, तिला रडुचं येणार होतं पण तितक्यात बंड्याची आई आली "चला जेवण तयार आहे". पिंगीलाही खुप भुक लागली होती म्हणुन ती पळत पळत येउन बसली आणि बघते तर काय गवताची पोळी आणि गाजराची कोशिंबीर? पिंगीने गवताची पोळी कधीच खाल्ली नव्हती आणि गाजराची कोशिंबीर तिला मुळ्ळी म्हणजे मुळ्ळीच आवडायची नाही. मग मला भुक नाहीये, मला नको म्हणुन ती नुस्ती बसुन राहिली. आणि तेवढ्यात बंड्याच्या आईने गाजराचा हलवा आणला. पिंगीला तो हवा होता पण मगाशी भुक नाही असं सांगितल्यामुळे कोणी तिला विचारलंच नाही. बिच्चारी पिंगी!

रात्री झोपायची वेळ झाली. आज सोमवार होता, सा रे ग म प बघायचं म्हणुन ती टी.व्ही समोर येउन बसली पण ते सगळे सश्यांचं स रे ग म प बघत होते. पिंगीला परत रडु यायला लागलं, तिच्या आजुबाजुला सगळे ससेच होते. आई-बाबाची आठवण यायला लागली आता. रात्री झोपताना तिला वाटलं बंड्या तिच्या जवळ झोपेल, पण तो झोपला त्याच्या आई-बाबांबरोबर आणि पिंगीला एकटीला बाहेरच्या खोलीत ठेवुन दिलं. ती खुप खुप रडली. तिला अंधाराची खुप खुप भीती वाटत होती. आई-बाबांची पण खुप आठवण येत होती. पण आता काय करणार? तिला झोप येत नव्हती, मग अचानक विचार करताना तिच्या लक्षात आलं, अरेच्या, आपण असं एक दिवस राहिलो तर आपल्याला इतका त्रास होतोय... बंड्या तर रोज असं राहतो. आपण त्याला काहीही खायला देत नाही. आपण आई बरोबर झोपतो तेव्हा तो कपाटात एकटाच झोपतो. त्याला कुठे सश्यांचा टी.व्ही पाहायला मिळतो? आपण खुपचं हाल करतो ना बंड्याचे! तिला परत रडु यायला लागलं आणि रडता रडताच तिला झोप लागली.

सकाळी जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा ती चक्क तिच्या खोलीत होती.पण बंड्या कुठेच दिसत नव्हता! हं बहुतेक तो त्याच्याच घरी राहिला वाटतं! पण आपली पिंगी शहाणी झाली होती, बंड्या नाही म्हणुन ती मुळ्ळीच रडली नाही. कारण तिला माहित होतं बंड्या त्याच्या घरी, त्याच्या आई-बाबांबरोबर आनंदात असणारे. तर ही होती गोष्ट शहाण्या पिंगु आणि बंड्याची!"

आईने गोष्ट सांगुन संपवली. पिंगुला अजुन हिंदी कळतं नव्हतं म्हणुन तिच्या आईने बाबाला डोळा मारत म्हंट्लं "एक पुराना toy फेकने के लिये you have to make sucha long story! next time its ur turn re baabaa! उसका वो प्लॅस्टिक elephant stinks now!"

पिंगु आणि बंड्या एकमेकांची आठवण काढत झोपी गेले!

Friday, August 1, 2008

आणि प्रथम क्रमांक....

हातांची घट्ट मुठ! नाव ऐकायला प्राण कानात गोळा झालेले...
ओठांमध्ये एक हल्की थरथर, पोटात आणि छातीत काहीतरी विचित्र हालचाल...
डोळे त्या बक्षिस जाहीर करणा-या बाईकडे...
बक्षिस घ्यायला कुठून जायचं तेही ठरवलेलं...
देवा हे बक्षिस मलाच मिळायला हवं, बाजुची मुलगी माझ्याकडे बघते..मी तिच्याकडे बघुन एक स्माईल देते! मला काहीही tension नाहीये हे दाखवायचा एक असफल प्रयत्न... आणि माझं नाव ऐकु येतं...
yes! i knew this!! मलाच मिळणार होतं हे बक्षिस!
इतका वेळ रोखुन धरलेला श्वास आता मोकळा होतो, मी आता चेह-यावरचा जास्तीचा आनंद लपवत पुढे जाते, एकदम आत्मविश्वासाने! सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे, मी हसुन सगळ्यांकडे बघत्ये... चला अजुन एक स्पर्धा माझी झाली!!

हा अनुभव कितीदा घेतलाय... आणि आता खुप मिस करत्ये!... वक्तृत्व स्पर्धा
पहिल्यांदा कधी भाग घेतल होता आठवत नाही... कदाचित पहिलीत असताना..हो, पहिलीत होते तेव्हा!
कथाकथन स्पर्धा होती... मी शि्रीषकुमारची गोष्ट सांगितली होती.लहान गटात माझा पहिला नंबर आला, मी खुश, आता ती मोठ्ठी ट्रॉफी मिळणार, शाळेत फळ्यावर नाव लिहीणार म्हणुन! पण माझं नाव जाहीर केल्यावर वेगळंच काहीतरी घडलं, आख्ख्या भरलेल्या मोठ्ठ्य़ा हॉलसमोर मला ती गोष्ट परत सांगायची होती. सगळ्या गटातल्या पहिल्या क्रमांकांची सर्वोत्तम पुरस्कारासाठी स्पर्धा... आई-बाबा तर घाबरलेच होते, मी पहिल्यांदाच माईकवर बोलणार होते... आता खास काही आठवत नाही, पण तो टाळ्यांचा कडकडाट आठवतोय....
त्या आवाजासाठी तेव्हापासुनच वेडी झाले, मला तो आवाज सारखा सारखा ऐकायचा होता... माझ्यासाठी वाजणा-या टाळ्या मला हव्या होत्या, लोकांच्या कौतुकाच्या नजरा...आई-बाबांच्या चेह-यावरचं समाधान...आह्ह... त्यानंतरच्या सगळ्या स्पर्धा मला जिंकायच्या होत्या, हे क्षण वारंवार जगायचे होते! (म्हणा तेव्हा हे कळत नव्हतं, पण तेव्हा जे वाटत होतं ते असचं होतं, आज त्याला शब्दरुप मिळतयं इतकचं!)

नंतर कित्ती स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, किती भाषणं केली... सुरुवातीला २ वर्ष सुदैवाने असेल किंवा नाही पण मी ज्यात भाग घेतला त्यात जिंकले. मग ४थीत मात्र जे व्हायलाच हवं होतं ते झालं.... आमचा फुगा फुटला... उत्तेजनार्थ बक्षिसही मिळु नये म्हणजे काय? त्यादिवशी रात्रभर रडले होते...आता ह्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा नाही हे ठरवुन टाकलं होतं.
पुढच्याच महिन्यात शाळेत एका स्पर्धेची नोटिस आली, मला न विचारता माझं नाव शाळेने देउन टाकलं, कारण शाळेला बक्षिसं मिळवुन द्यायला मी हक्काची मेंबर होते! मग परत एकदा सगळं सुरु झालं...

’मला भावलेला ईश्वर’ असो किंवा ’मराठीला पर्याय IT'...’माझे आदर्श व्यक्तिमत्’ असो किंवा ’नको असलेले पाहुणे’
कित्ती वेग-वेगळे विषय, वेगवेगळे स्पर्धक, कधी ३ मिनीटं, कधी ५, कधी ७... वेळ संपायच्या आधी अर्धा मिनीट वाजणारी ती बेल! भाषणाच्या आधीची तयारी, उत्सुकता, निराशा, आनंद, समाधान, भीती, आत्मविश्वास, कोणाचं खोटं खोटं हसणं, कोणाचं रडणं, परीक्षकांनी केलेलं कौतुक, कधी एकदा घरी जाउन आईला सांगत्येची घाई.... सगळं सगळं वातावरण काय सही असायचं!

आधीचा स्पर्धक बोलत असताना, माझ्या भाषणाच्या मुद्द्यांकडे टाकलेली एक नजर... देवाकडे भाषण चांगलं होऊ दे, म्हणुन केलेली प्रार्थना...त्याचं भाषण संपल्यावर माझं नाव...खोटं का बोलु, पाय पहिली काही सेकंद थरथरायचे,मग हात मी घट्ट पकडायचे, सगळीकडे एक नजर फिरवायचे...बेल वाजली की बोलायला सुरुवात... सगळी लोकं माझ्याकडे बघताय्त आणि फक्त मी बोलत्ये , सगळे माझंच ऐकताय्त चा आनंद अपार असायचा....

काही बाबतीत मी स्वतःला खुप आवडते... म्हणजे मी माझ्या प्रेमातच आहे आणि त्यातली ही एक गोष्ट! आपल्याला बोलता येतं ही खुप सही गोष्ट आहे!

आज हे लिहायला कारण म्हणजे आज १ तारीख.. (लिहायला सुरु केलं तेव्हा १ तारीख होती :P) टिळक पुण्यतिथी, दरवर्षी शाळेत स्पर्धा असायची...आता काहीही नस्तं :(, आता स्पर्धा नाहीत, आता ती मजा नाही! दर आठवड्याला प्रेझेन्टेशन्स होतचं असतात...पण त्यात तो उत्साह नाही!

मला मोठं व्हायचंच नव्हतं!
मी छान भाषण देते म्हणुन मी चांगली पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकते ह्याच विश्वासात जगायचं होतं मला!
एक स्पर्धा जिंकल्यावर आख्खं जग जिंकल्याच्या आनंदातचं राहायचं होतं मला!!
पुन्हा एकदा आणि प्रथम क्रमांक.... च्या पुढे मला माझं नाव ऐकायचं आहे, थोडा वेळ का होईना जग्गजेता बनायचं आहे!
ते माझं, छोटंस जग असलं म्हणुन काय झालं?!

Wednesday, July 16, 2008

कपाट-पुराण! १ (कपड्यांचं कपाट)

आज अचानक "दार उघड्ल्यावर उतु जाणारं" माझं कपाट आवरायला घेतलं. कित्ती दिवसांपासुन त्यात कपडे कोंबलेले होते. घरात इतके हॅंगर पडलेले आहेत, पण आजपात्तुर त्यांचा आणि माझ्या कपड्यांचा कधी संबंध नाही आलेला. म्हणजे असेल जर मुड तर मी कपड्यांच्या घड्या घालते कधी-तरी..खोटं का बोला? पण माझ्या अंदाजाने मी कपाटाचं दार बंद केल्यावर कपडे एक्मेकांशी खेळत असावेत किंवा मारामारी करत असावेत कारण मी कपाटाचं दार उघडलं रे उघडलं की एकतरी कपडा कपाटातुन खाली उडी मारतोच!

लोकांची छान आवरलेली, सगळ्या कपड्यांच्या मस्त घड्या घातलेली, कपाट उघडल्यावर डांबराच्या गोळ्य़ांचा वास येणारी, लॉक करुन ठेवलेले ड्रॉवर असणारी कपाटं पाहिली की मला उगाच गुदमरल्यासारखं होतं, लाजही वाटते, हेवाही वाटतो, रागही येतो! राव..कसं काय जमतं हो असं? स्वच्छ आणि व्यवस्थित..आवरलेलं! माझं कपाटही असतं बरं असं.. पण मी आवरण्याचा प्रयत्न केल्यावर पुढचे २ दिवस फक्त! "आम्ही कोणाचे कपडे आहोत हे आमच्याकडे बघुन कळायला नको का? म्हणुन तर आम्ही असा गोंधळ घालतॊ" इति आमचे कपाटातले कपडे! म्हणतात ना गुण नाही पण वाण.... असो! :)

तर आज असं कपडे आवरायची सु/दुर्बुद्धी झाल्याचं कारण म्हणजे, काल कॉलेजला निघायला उशिर झाला होता (duh...बाळ काहीतरी वेगळं सांग) मी कपाट उघडलं आणि घालण्यालायक एकही संपुर्ण ड्रेस नाही मिळाला. एकाचा "वरचा" टॉप मिळाला तर सलवार नाही; एकाची चुणीदार तर टॉप नाही... दोन्ही मिळालं तर ओढणी नाही, ज्याची ओढणी आहे त्याचं बाकी काही नाही... जिन्स मिळाली पण सगळे कुर्ते आणि शर्ट एकतर मळलेले नाहीतर चुरगळलेले... काही मिळालेले पुर्ण कपडे हे सध्या थोडं बारीक झाल्यावर घालायला ठेवुन दिलेले... मग लक्षात आलं अरे आपल्याकडे तर अर्ध्याहुन अधिक कपाट हे "बारीक झाल्यावर घालयचे" किंवा "घरात घालायचे" ह्या लेबलचेच आहेत! आणि तिथेच बसकण मारली... कपाट आवरायचंच हे ठरवुन!!

हे जेव्हा माझ्या मैत्रिणीला सांगितलं तेव्हा म्हणाली.." तू मुलीचा जन्म वाया घालवलास, फॅशन कशाची खायची हे तुला माहित नाहीये, ते आख्खं कपाट रिकामं कर आणि माझासोबत शॉपिंगला चल". का राव? फॅशन-बिशन काय? लोकं फॅशन का बघतात? मॅचिंग काय असतं? हे त्याला सुट होतं.. ते त्याच्याबरोबर छान दिसत नाही.. ते कपडे तिला शोभत नाही.. व्वॉव कुठुन घेतली कुर्ती? कित्ती cute!? ..,ए तिचा टॉप बघ काय गोंडस आहे.. काय styleमारु कपडे आहेत तिचे... तिच्या टॉपचं कापड कमी पडलंय.. पोतेरं घालते ती.. हे तंबुच कापडं का घातलंय? तुला ना फॅशनचा सेन्सच नाही! out of fashion आहे हा प्रकार आता...ई तिने बघ जीन्स घातल्ये आणि कपाळावर टिकली लावल्ये! रंग, मटेरिअल, प्रकार, कट, texture इत्यादी इत्यादी सगळ्या बाबतीत ह्या मुली कितीही वेळ बोलू शकतात! सोनेरी हरिणाच्या फॅशनेबल कपड्यांसाठी जिथे खुद्द सीता हट्ट धरुन बसली तिथे तिच्या नाती-पणतींविषयी काय बोलावं?

पण मला नाही कळत राव हे काही! आजतागायत "फ़ॅबईंडिया मधुन घेतलेल्या ६०० रुपयांच्या कुर्त्याचा माज करावा की तसाच पण थोडा हल्का कुर्ता तुळशीबागेतुन कसा घासाघीस करुन स्वस्तात मिळवला ह्याची फुशारकी गाजवावी" हे मला न सुटलेलं कोडं आहे! मला मुलीपेक्षा मुलगा होणं जास्त आवडलं असतं ह्याचं हे एक कारण आहे!

so back to my कपाट! असे कितीतरी कपडे आहेत जे घालायच्या पलीकडे गेले आहेत, पण टाकवतच नाहीत! ठाण्याला न्यु ईंग्लिश मधल्या प्रदर्शनातुन घेतलेला कॉटनचा निळ्या माशाचं डिझाईन असणारा कुर्ता, हिमालयात ट्रेकला सलग ८ दिवस घातलेला बारीक फुलांची नक्षी असणारा हिरवा पंजाबी ड्रेस, माझी पहिली..अगदी पहिली blue faded jeans, कधीतरी आपण खूप बारीक होऊ आणि मग घालू म्हणुन ठेवलेला गुलाबी झगा (त्या प्रकाराला काय म्हणतात मला ठाऊक नाही), दादरला रस्ता क्रॉस करत असताना BEST आणि टॅक्सीच्या मध्ये येउन, टॅक्सीच्या कुठल्याश्या टोकदार भागात अडकुन फाटलेला नवा-कोरा बांधणीचा ड्रेस जो कधीच घालता येणार नाहीये! ही आणि अशी अजुन काही मंडळी कपाटात जागा अडवुन बसल्यावर नव्या कपड्यांना जागा होणार कशी? मग ते बाहेर पसरले तर बिचा-या कपड्यांचं काय चुकलं?

तर आज हे सगळं आवरुन ठेवलं आहे, अत्यंत जड मनाने दोन जुने ड्रेस बाहेर काढले, माझ्यासोबत खुप दिवस होते! एक तर माझा लकी ड्रेस होता... तो घालुन कित्ती स्पर्धा जिंकले होते! पण काय करणार...कपाट आवरायचं होतं ना! आज कपाट आवरताना थोडं स्वतःचं मन आवरायचाही प्रयत्न केला... मी कशी दिसत्ये त्यापेक्षा मला काय comfortable वाटतं आहे, हे मला जास्त महत्वाचं वाटतं...मला काय आवडतं हे मला किंमत आणि स्टेटस किंवा फॅशनपेक्षा जास्त महत्वाचं आहे! मला माझा एक मित्र दहा जणांमध्ये "फॅशनची औरंगजेब" म्हणाला होता, तेव्हापासुन बरीच मॅगझिन्स चाळली, पेपेरमधल्या पुरवण्या आणि फॅशन टिप्स वाचल्या, नेटवर अनेक साईट्स धुंडाळल्या... पण नाही काही जमत स्वतःला बदलायला, rather नाही पटत... हवं तर माझा आळशीपणा असेल हा, कंटाळा असेल न बदलायचा किंवा कदाचित काहीवेळा "मी वेगळी आहे" हे दाखवायचा अट्टाहास?!

माहित नाही!
मी आहे तशी सुखात आणि आवरलेली आहे... आत्ता माझं कपाट दिसतयं तशी!
छान आणि शहाणी!

Friday, June 27, 2008

विचीत्र!

आदल्या दिवशी कविता (कामवाली) आली, थकलेली दिसत होती.
काम संपल्यावर म्हणाली "सासु खुपच आजारी पडल्ये, चमच्यानेच पाणी पाजतोय आता तिला..खुप वाईट हालत आहे"
दुस-या दिवशी सकाळी आलीच नाही कामावर... जे कळायचं ते कळलं..आता १३ दिवस बघायला नको!
रात्री कविता आली, छान शांत दिसत होती " मी आले नाही..."
मी तिला अर्धवट तोडत म्हणाले.. "हो.. आलं लक्षात, अजुन किती दिवस?"
कविता "१५ दिवस नाही येणार, गेली म्हातारी एकदाची" आणि चेहर्यावर एक sollidd smile!!
मी क्षणभर चमकले, पण मग मी सुद्धा तिच्याकडे कसंनुसं हसत बघितलं!

तिची सासू आजारी होती, तिला वेडाचे झटके यायचे त्यामुळे तिचं सगळं करताना कविता थकुन द्यायची! तिची दोन्ही मुलं आज्जीला घाबरायची... सासुमुळे कुठे बाहेरही जाता येत नव्हतं, कसली हौस-मौज नाही! गेले काही दिवस तर म्हातारी कधी मरत्ये ह्याचीच वाट बघत होते सगळे...

कोणीतरी आपल्या मरणाची वाट बघत आहे, ही नुस्ती कल्पना सुद्धा अंगावर काटा आणते माझ्या...
शेवटचे काही दिवस म्हातारी अंथरुणात असेल, सगळ्या गरजा भागवायला दुस-यांवर अवलंबुन, आणि बाकीच्यांच्या सुचक नजरा "मर की आता"

---------------------------------------------------------------------------------

हॉस्पिटल मधे गेले होते परवा, डॉक्टर काका एका माणसाला तपासत होते. लेंगा आणि वर टिप मारलेला टी-शर्ट घातलेला ५५-६०च्या मधला माणुस... घरची बेताची परिस्थिती त्याच्याकडे बघुन कळत होती. किडलेले लाल दात, दाढीचे वाढलेले खुंट व्यसनांविषयी सांगत होते! मागुन त्याचा मुलगा आला हातात पिशवीभर औषधं घेउन... खरंतरं मी बाहेर उभं राहायला हवं होतं पण आतच घुटमळत थांबले. काका त्या मुलाला सांगत होते " पैश्यांच काय करणार आहात? मी पत्र देतो काही संस्थांचे पत्ते देतो. २-अडीच लाख खर्च येईल, पण आता गत्यंतर नाही, ही औषधं वेगळी..." मग त्यांनी सकाळ पासुन रात्री पर्यन्त काय काय आणि किती औषधं घ्यायची हे सांगितलं, रोजच्या २०-२५ गोळ्या? लक्षात तरी कश्या राहाव्या? पण आता त्यांना जगायचं असेल तर...

काका तितक्यात त्या माणसाकडे वळले " खुप हौशी केल्यात जन्मभर ना... आता भोगा! शरीराला झेपत नाही इतकी व्यसनं का करायची? VRSचं बघा आता... विश्रांती घ्या... दोन नळ्या बंद झाल्यात जवळ्जवळ, आता ऐकलं नाहीत तर मी काहीच करु शकणार नाही! व्यसनं धरली नसतीत तर नातवंडांना खेळवलं असतं आत्ता तुम्ही... जे काही कमवलं असेल आत्तापर्यन्त गेलं ना सगळं औषधावर?"

तो माणुस नुस्ता बसुन ऐकत होता. त्याची सुन आणि मुलगा परत परत औषधं तपासत होते आणि हिशोब करत होते. आपण व्यसन केलं, आता ऑपरेशन नाही केलं तर आपलं काही खरं नाही, सगळी कमाई ह्या आजारपणात जाणार, मुलगा-सुन आत्ताच लग्न झालेले आपल्यामुळे त्रासात राहणार... आपल्यामुळे सगळे त्रासात, मरण परवडेल ना? पण असा निर्णय घ्यायला कोणी धजेल?

----------------------------------------------------------------------------------

My girl पाहिला काही दिवसांपुर्वी, खुप अस्वस्थ करणारी फिल्म आहे. फ़्युनरल पार्लर चालवणारे बाबा, लहानपणीच आई वारलेली अश्या लहान मुलीची गोष्ट! तिला वेगळंच ओब्सेशन आहे, दरवेळी बाबांकडे एखादी बॉडी आली की त्याना झालेला आजार हिला झालाय असं तिला वाटायला लागतं, मृत्यु नक्कि काय असतं हे तिला माहित नाहीये (कोणाला माहित्ये?) तिचा एकुलता एक जवळचा मित्र जेव्हा देवाघरी जातो, तेव्हाही तिला काहीच कळत नसतं. मित्राच्या आईला ही समजावून सांगते "थॉमस जे. वर खुशाल असेल, माझी आई आहे त्याची काळजी घ्यायला"

मरणाचं एक विचीत्र रुप ह्या फिल्ममध्ये पाहिलं!

---------------------------------------------------------------------------------

२ आठवड्यांपुर्वी आम्हाला overtake करुन गेलेली स्कुटर बस खाली आलेली आठवली! मला उगाच वाटत राहिलं आहे की आम्हाला overtake करुन तिने आमची जागा घेतली!

मला मरणाची भिती वाटायची भरपुर... आता भीती कमी झाल्यासारखी का वाटत्ये?
काहीतरी विचीत्र आहे!

Sunday, June 15, 2008

सध्या...

आज बोटं शिवशिवायलाच लागली...
ब्लॉग लिहि... बाळा... ब्लॉग लिहि आता..सांगत होती.
पण डोकं आणि त्याहुन जास्त मन तयार नव्हतं...
बेक्कार गोष्टी आहेत ज्यावर लिहायचं आहे, पण आत्ता नाही!
म्हंटलं एखादी छोटु पोस्ट तरी लिहावी..नंतरचं नंतर लिहुया...

तर माझ्या "जीवनात" (हा शब्द मला नाही आवडत!) सध्या खुप काही चालु आहे!
GRE ठीकठाक झाली...GR8 मार्क नाहीयेत पण पुरेसे आहेत. आता भिस्त TOEFL वर!
अलिबागला जाउन आले... कणकेश्वरला जाउन आले, खरं तर माझ्या कणकेश्वरावरती एक वेगळी पोस्ट टाकायच्ये, ती नंतर!
२ दिवस मस्त धमाल केली तिथे... पण ५ तारखेला त्याचा वाढदिवस म्हणुन पुण्यात परत आले.. आणि आमच्या इथल्या दुष्ट BSNL च्या lineला तेव्हाच तुटायचं होतं! त्याच्या वाढदिवासाला त्याला बघताच नाही आलं :(

माझं ह्यावर्षी बजेट कमी होतं म्हणुन त्याला एक कुर्ता Indian postal services नी पाठवला आहे... आणि त्याला तो अजुन मिळाला नाहीये! IPS वाल्यांनॊ अजुन २ दिवस वाट बघत्ये नंतर तुमची खैर नाहीये!!

बाकी सध्या Radio mirchi मधे internship करत्ये. मज्जा येत्ये!
खुप काही शिकायला मिळतय ह्यातला भाग नाही पण अनुभव छान आहे. मला माझ्या आवडीचं काम आहे... जाहिराती बनवणं.. enjoy करत्ये! इतके दिवस ज्या RJ ना ऐकायचे त्यांना आता मी पाहिलं आहे... सगळे RJ खुप normal आहेत :)
अम्रुततुल्यमधे काल पहिल्यांदा मी चहा प्यायले आणि भजी खाल्ली. अमृत ह्याच्या जवळपासच्या चवीचं असेल असं वाटत नाही!
पहिल्यांदा पहिलेल्या गोष्टिंपैकी अजुन एक म्हणजे, धोबी घाट... कोंढव्याला जाताना मला तो दिसला.. मग २ मिनिटं थांबुन पाहिला..सही वाटलं... पहिल्यांदाच पाहिला प्रत्यक्षात!

सध्या तेलुगु शिकत्ये. "देशभाषलंदु तेलुगु लेस्स" असं म्हणतात! म्हणजे भारतीय भाषांमध्ये तेलुगु श्रेष्ठ आहे म्हणे... बघुया.. माझ्यासमोर तिचा टिकाव लागतो का ते! :D

dieting करायचं ठरवुन ह्यावर्षी हि भरपुर आमरस-पोळी चापल्ये! सध्या परत dieting कधी सुरु करायचं हे ठरवत्ये!

अजुन सध्या रिसर्च च्या तयारीसाठी काम चालू आहे!

बाकी डाव्या पायाचं मधलं बोट मोडुन घेतलं आहे... पण बाकी मजेत आहे "तेजु लंगाडी क्यु हसती है?" असं विचारावं इतकी हसत्ये!

सध्या जगत्ये! :)

Thursday, May 8, 2008

miss me :)

कित्ती वेळ ह्या पोस्टला काय नाव द्यायचं हा विचार करत बसले होते.

मिलते है ब्रेक के बाद, क्षणभर विश्रांती, मधली सुट्टी, "," , अर्धविराम... सारखी पकाऊ, वापरुन जुनी झालेली, ईईईई म्हणावं अशी बरीच नावं विचार केली... पण एकही इथे देण्यासारखं नव्हतं... आत्ता नाव लिहीलयं ते मनापासुन आलयं [:)] तेसुद्धा कमी वाईट नाहीये, पण त्यातल्या त्यात... म्हणतात ना देशस्थांत क-हाडे शहाणे (अशी म्हण आहे )

म्हणजे एकंदर तुमच्या लक्षात आलं असेल की हा प्रकार काय आहे ते...
बास्स.. नाही लिहिणारे काही दिवस ब्लॉग!

खरं तर शांतपणे न लिहीता काही दिवस राहता येतं , हे असं जाहीर नाही केलं तरी चाललं असतं, पण म्हंट्लं लिहुन टाकुया ना... म्हणजे "आता लिही गं", "टगे लिही आता", "मेलीस का?" वगैरे म्हणायचे तुमचे कष्ट वाचतील! (जसं काही तुम्ही म्हणणारच आहात... m too optimistic na? )

न लिहिण्याची कारणं...
१) परीक्षा देत्ये जुनमध्ये, ज्याचा अभ्यास करायचा आहे!

२) मला लक्षात आलयं, की हल्ली खुप म्हणजे खुप जास्त degrade झालंय माझं लिहिणं.. तुम्ही कोणी सांगायच्या आधी ब्रेक घेतलेला बरा.. नंतर नव्याने सुरु करेनच (म्हणजे आत्ता लिहीते तसचं लिहिन पण मोठ्या ब्रेकनंतर ते degrade झालंय हे तुम्हाला कमी जाणवेल! )

३) बघायचं आहे खरचं कोणी मी नाही लिहिलं तर miss करेल का ? :) :)

४) mood नाहीये

बाकी अजुन कारणं आठवत नाहीयेत!

जाहिरातशास्त्रात पदवी घेतल्याने ब्रेकचं महत्त्व मला कळलं आहे! माझ्या ह्या ब्रेकमध्ये काय कमाई करत्ये मी बघुया!!

n yeah "miss me" :)
नाही केलंत तरी असं म्हणा निदान की मिस केलं म्हणुन!

:)

Wednesday, April 30, 2008

गिचडी

अलिबागच्या घराबाहेरच्या झोपाळ्यावर बसुन आम्ही चौघं गप्पा मारत होतो. आई,बाबा,दिपु आणि मी असं एकत्र बसुन गप्पा मारायची वेळ हल्ली जास्त कधी येतचं नाही! कोल्हापुरला घेतलेल्या नवीन घराबद्दल बाबा सांगत होते. रत्नागिरी, अलिबाग, पुणे आणि आता अजुन एक घर कोल्हापुरात! दिपीका म्हणते तसं बाबांना नवीन घरं घ्यायचा छंदच आहे! घर घ्यायचं म्हणजे सोप्पं का काम आहे? बाबानी नवीन घर घेतल्यावर मलाच टेन्शन येतं...ते हफ्ते, व्याजदर, कर्ज ह्या सगळ्या शब्दांची मला भीती वाटते! का कोण जाणे पण एकदम आम्ही आता गरीब झालोय असं वाटायला लागतं!

देवाच्या दयेने, बाबांच्या मेहेनतीमुळे आम्ही खात्या-पित्या घरात आहोत. महिन्याची टोकं जुळवायला आम्हाला कष्ट करावे लागत नाहीत की आमची स्वप्नं झाकुन ठेवावी लागत नाहीत... rather लहानपणापासुन कशी आणि कोणती स्वप्नं बघावी ह्याचं व्यवस्थित ज्ञान मिळालं आहे आम्हाला. तरीही त्यादिवशी गप्पा मारताना अचानक आई म्हणाली, "काय गरज आहे नवीन घराची तेही कोल्हापुरात? मुलींच्या admissions, त्यांची शिक्षणं, ह्या जुन्या घराचं काही काम... हे सगळं सोडुन नवीन घर का? एका घराचं कर्ज फिटल्यावर लगेच डोक्यावर नवीन कर्ज असायलाच हवं का?"
ह्यावर बाबांचं ठरलेलं उत्तर "कोल्हापुर- रत्नागिरी आणि पुण्याच्या मध्ये, अंबाबाईचं गाव,नियोजित IT-park....घर म्हणजे investment.. कर्ज आणि टॅक्स-बेनेफिट...बाकी मुलींच्या शिक्षणासाठी इतके-इतके सेविंग्स.... वगैरे वगैरे" आजपर्यंन्त बाबांकडुन हे सगळं अनेकदा ऐकलयं पण डोक्यात कधीच काही गेलं नाही! कळत नाही अश्यातल्या भाग नाही आहे, पण पैसे-भविष्य-शिक्षण-खर्च हे असं काही ऐकलं की डोक्यात वेगळीचं चक्र सुरु होतात...आणि मग आजुबाजुला काय चालु आहे त्याच्याशी जास्त संबंध राहात नाही मग माझा!

त्याचदिवशी बाबांनी ही सुद्धा आठवण करुन दिली की येणारा ऑक्टोबरमधला वाढदिवस हा त्यांचा ५०वा वाढदिवस आहे, आणि त्यानंतर ते नोकरी सोडणारेत, त्यांना आता नोकरीत गुरफटुन राहायचं नाहीये. वर्षांपुर्वी त्यांनी पाहिलेली स्वप्नं आता त्यांना जगायच्येत. आईचं पुन्हा "मुलींची शिक्षणं, त्यांची लग्नं" वगैरे बोलुन झालचं! मी मात्र तेव्हापासुन आत्तापर्यंत शांतच आहे.

एकीकडे डोळ्यासमोर त्या कुठल्यातरी पॉलिसीची जाहिरात येत्ये...छोटा मुलगा, तलावात उडी मारायच्ये त्याला पण आई-बाबा नकॊ म्हणताय्त! तोच मोठा झालाय.. बॉसची बोलणी खातोय, संताप अनावर झालाय, ह्या क्षणी नोकरी सोडावीशी वाटत्ये पण डोळ्यासमोर त्याची प्रेग्नंट बायको येते, तिच्यासाठी आणि होणा-या मुलासाठी राग गिळुन हा गप्प होतो. नंतर काही वर्षांनंतरचा हा नवी गाडी घ्यायला आलाय, त्याला हवी तशी नवीन मस्त गाडी... पण त्यात चढायच्या आधी त्याला दिसताय्त त्याची शाळेत जाणारी मुलं, आत्ता त्यांच्यासाठी आपण आपली हौस मारायलाच हवी...इतकी वर्ष दुस-यांसाठी जगल्यावर आता स्वत:साठी काही जग असं सांगणारी ती जाहिरात परत एकदा म्हातार्या त्याला लहानपणीच्या तलावापाशी आणुन सोडते त्याने न घेतलेल्या गाडीतुन.. आज त्याला स्वत:साठी जगायचं आहे कोणाची पर्वा न करता... आणि तो आनंदाने तलावात उडी घेतोय.

बाबाही असंच सतत आमच्यासाठी जगुन म्हातारपणी का त्यांची उरलीसुरली स्वप्नं जगणारेत? आमच्यासाठी त्यांनी त्यांच्या हौसेवर पाणी फिरवणं म्हणजेच त्यांनी त्यांचं कर्तव्य निभावणं का? मुलं झाली की आई-बाबांनी मुलांसाठी जगायचं मग स्वतःच्या अश्या वेगळ्या आवडी-निवडी राहत नाहीत का? ज्या इच्छा होत्या त्या मुलांकडुन पुर्ण करुन घेतल्याने खरचं समाधान मिळतं का? आई-बाबानी आमच्यासाठी काही त्याग केला तर ते त्यांचं कर्तव्यच असतं आणि मुलांना त्याग करावा लागला तर तो त्यांचा कमीपणा... असं का राव?

कोल्हापुरच्या घराची आज आम्हाला गरज नसेल वाटत.. पण मग आम्ही बाबांकडॆ हट्ट करुन मागितलेल्या अश्या कित्येक गोष्टी विनाकारण होत्या... फक्त एक हौस म्हणुन घेतलेल्या...

डोक्यात प्रचंड गिचडी होत्ये प्रश्नांची, विचारांची! बरोब्बर एका वर्षापुर्वी होते तिथे परत गेले आज... पुढचं शिक्षण की काम?
बाबांनी आमच्यासाठी-त्यांच्या आईबाबांसाठी नोकरी केली पण आम्ही नोकरी करायची नाही ही त्यांची इच्छा आहे. त्यामुळे नोकरी नाही पण काहीतरी काम करावं असं मला गेल्यावर्षी वाटत होतं. मास्टर्स केलं काय नाही केलं काय...अश्या विचारांची होते मी! बाबांना मास्टर्स करता आलं नाही निदान आम्ही तरी करावं ही त्यांची इच्छा मी पुर्ण करत्ये! आता तर परदेशात उडायची तयारी सुरु झाली आहे... पण बाळा आता तू मोठी झालीयेस गं, येता पावसाळा २२वा पावसाळा असणार आणि अजुनही मी कोणासाठीही काहीचं करत नाही आहे.मी घरातली मोठी मुलगी आहे..आता बाबांबरोबर मीसुद्धा जवाबदारी शेअर करायला हवी पण मला माझ्या उडण्याच्या स्वप्नांमधुन वेळ कुठे आहे? मी पुढे शिकल्याने त्यांना अभिमानचं वाटणारे... आपल्या मुलींनी खूप शिकावं हेही त्यांचं स्वप्न आहेच ना? पण परत एकदा हा प्रश्न समोर येतोच आहे.. पुढे शिकायचं की काम करायचं?

त्यादिवशी एका मैत्रिणीची आई म्हणाली "मध्यमवर्गात हे उच्चशिक्षण वगैरे मुलींना जमणारे नखरे आहेत... मुलांना घराची जबाबदारी असते" तसं त्यांच्या सगळ्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही पण हे खटकलं.. का बुवा असं का? माझ्या आईबाबांना दोन्ही मुलीच आहेत त्यामुळे त्यांना मदत करण्यात, घर चालवण्यात माझाही वाटा असणारचं ना? मी मुलगी म्हणुन मला काही कर्तव्यचं नाही का? असं का? ह्याला काय अर्थ आहे? फक्त चांगला मुलगा "गटवुन" त्याच्याशी लग्न केलं म्हणजे झालं का माझं काम? माझे आईबाबा आनंदी का?

माझ्या त्याला हे सगळं सांगितलं.. तर किती हसत हसत त्याने उडवुन लावलं "तुम बहोत पागल हो.. कुछ भी सोचती हो! ये सब बातें बादमें सोचेंगे..पहेले US आ जाओ!" त्याच्या आई-बाबांचं स्वप्नं मुलाने US मधे राहावं.. तो ते करतोय, माझ्या आई-बाबांना काय वाटतयं ते इथे consider होणारे का?

परवा call-center मधे काम करणारी एक मैत्रिण म्हणाली "अजुन किती दिवस आपण कोणावर depend राहाणार? स्वतःपुरतं स्वतः कमवायला हवं" फक्त स्वतःपुरतं? आईबाबांना आपल्याला वाढवायला खरचं इतका त्रास होतोय का? ती घरखर्चात हातभार लावत नाही हे मला माहित्ये...पण मग २-३ KT लावुन घेवुन, एक ना धड करत, स्वतःपुरतं जगण्यासाठी हा असा अट्टाहास करावा का?

परवा बाबा म्हणाले आता तू आणि आम्ही काय काही दिवसांसाठी एकत्र, मग तू जाणार त्याच्याकडे, कुठे येणारे मग इतका संबंध? अरे.. म्हणजे काय? झालं तुटणारे का आता नातं जमिनीशी आणि माणसांशीही? असं कसं होऊ शकतं? मग मी काय फक्त माहेरवाशिण म्हणुन यायचं का घरी? मुलींना इतक्या easily परकं धन वगैरे मानता येतं का?

हे प्रश्न जितका विचार करु तितके वाढत जाताय्त! उत्तरं कशाचीच नाहीत...
माझी स्वप्नं, त्यांच्या इच्छा... माझ्या इच्छा, त्यांची हौस... मुलगी-मुलगा... नोकरी-काम-शिक्षण...अमेरिका-भारत... तो की बाबा... त्याचे आईबाबा आणि माझे आईबाबा... माझ्या capabilities आणि माझ्याकडुनची expectations... गिचडी सगळी गिचडी!
मी मधोमध उभी राहायचा प्रयत्न करत्ये आणि माझ्याभोवती ही वेटोळी वाढत जातायेत...
पाटीवरची गिरमीट वाढत जात्ये..जोपर्यंत ही पाटी पुसली जात नाही मनाला शांती मिळणार नाही...

Friday, April 4, 2008

जे जे उत्तम!

केतनने खो दिला खरा, पण इतक्यात तो घ्यायचा विचार नव्हता...
सध्या ब्लॉग आणि अभ्यासाची पुस्तकं सोडता काहीच वाचन चालू नाहीये! :(
त्यातलचं एक पुस्तक (वाचत होते रेफ़रन्स म्हणुन, पण अभ्यासाचं पुस्तक नाही), त्यातलाच एक आवडलेला उतारा....

.............

सर्वसाधारणपणे आवडणारी कामेही काही जण पाट्या टाकल्यासारखी करतात, तर अगदी कंटाळवाण्या कामातही काही जण लय कशी उत्पन्न करतात याचे रहस्य, ’आता-इथे-या क्षणी’ मधे आहे.

एका मोठ्या फॅक्टरीच्या परिसरामध्ये मी उभा होतो.माझ्या शेजारीच लाल दगडांचा लांबसडक फूटपाथ होता. एक सफाई कामगार तो फूट्पाथ साफ करत होता. दिवस पावसाळ्याचे होते. ब्रश, पावडरचा डबा, बादली, पाण्याचा पाईप अशा आयुधांनिशी तो कामाला भिडला होता, त्याच्या हालचालींमध्ये लय होती.मग्न होता कामामध्ये. त्याचा चेहरा तल्लीन होता... मला तो कबीरासारखा भासला, थोडा बहिणाबाईसारखा. मी त्याच्या जवळ गेलो. त्याच्याकडे पाहुन हसलो. त्याने प्रतिसाद दिला. मी म्हणालो, " किती रंगुन काम करताय तुम्ही...छान वाटतंय तुम्हाला पाहतानाच."

तो चकित झाला. त्याला कदाचित अशी दाद या आधी कुणी दिली नसावी. "आता हे काम करताना तुमच्या डोक्यात काय विचार चालले होते, सांगू शकाल?" मी विचारले.

"कुठले विचार, साहेब... काही नाही..., नुस्तं काम करत होतो... दुसरं काही नाही" तो बावचळला.मीही ताणून धरले नाही. तो त्याच्या कामाला लागला. मी मला न्यायला येणार्या वाहनाची वाट पाहायला लागलो. काही मिनिटे तशीच गेली.

"साहेब... गावला... सापडला... विचार" तो मला म्हणाला. मी पुन्हा त्याच्याजवळ गेलो. "ऐका... या समद्या लाद्या साफ करत करत मी त्या टोकाला पोचन ना... तवा पाठी वळून बघनं...अन म्हनेन...चकाचक.. हा फूट्पाथ मी साफ क्येलाय." तो म्हणाला..मी मान डोलावली. " आणि हे मला तिथं ताठ मानेनं म्हणायचं तर मला आता हा दगड पयला चकाचक नको करायला... शेवटी हा रस्ता आख्खा बनला कसा... दगडांनीच का न्हाय!" मला त्याच्या कबीरपणाचा पुरावा ’त्या-क्षणी’ देत तो म्हणाला.

अशी गंमत आणणारे पानवाले असतात, भेळवाले असतात, शहाळी सोलणारे मलबारी असतात, भजी तळणारे असतात, चहा करणारे असतात, केबल खेचणारे असतात, पॉलिश करणारे असतात, केस कापणारे असतात... तिकिटे फाडणारे कंडक्टरही असतात... प्रत्येक क्षणाला ते जिवंत करतात.

अनुभवांशी समरस होणारी ही मंडळी, ते करत असलेल्या प्रत्येक कृतीला ’चव’ आणतात. आपण त्यांचे कौतुक केले तर ते आनंदतात जरुर, पण आपण कौतुक करावे म्हणून ते काहीही करत नसतात.


स्वभाव-विभाव
डॉ. आनंद नाडकर्णी

Friday, March 28, 2008

खो-खो, चिमणी, मंत्रा!!

Get this widget | Track details | eSnips Social DNA

अगं पकड... पळ पळ.. हट, खो दे.. इथे खो दे..."


"डावीकडे जा.. धर तिला... मुर्खा हात पसरता येत नाहीत का?... खो दे पटकन"


"लगेच वळायचं नाही... आधी सरळ रेषेत पळायचं मग भिडु कोणत्या दिशेला जातोय बघायचं मग आपली दिशा ठरावायची"


पीटी सर सांगत होते, आम्ही बघत होतो... खो-खो... सोप्पा नाहीये राव!! माझ्यापेक्षा सगळे मोठे, माझ्यापेक्षा जास्त अनुभवी, काही मुली इंटरनॅशनल लेवलवर खेळतील इतक्या भारी.... मग आम्ही ५-६वीतल्या चिल्ल्या-पिल्ल्या तिथे काय करत होतो? त्या सगळ्या तायांमधें आम्ही लिंबु-टिंबु... आम्हाला त्यांच्यासारखं पळता कुठं येणारे? त्याच्या ट्रिक्स कुठे माहित्येत?

सर म्हणाले.. "भिडु नाही पकडला गेला तरी चालेल.. पण खेळा, धडपडा, पळा...त्यातुनचं शिकाल!"

मेघना, संवेद, ट्युलिप, राज, निमिष, केतन, विद्या.... पटापट भिडु पकडणारी लोकं, त्यांचा खेळ बघत बसावा इतका सुंदर... खो द्यायची पद्धत अप्रतिम! आपल्याला ह्याची ट्रिक कळली बुवा म्हणुन आपण त्यांना पकडायला जाउ.. पण हि लोक कधीच नाही सापडायची!! मग मी लिंबु-टिंबु काय करत्ये इथे?मी इथे का आहे...का लिहित्ये?

नाही लिहायला जमलं, नाही सापडली उत्तरं-नाही पकडता येत हो नेहेमी भिडु...

पण लिहित्ये.. लिहायचा प्रयत्न करत्ये... चुकत्ये...आणि त्यातुनचं शिकत्ये!!!

yeah i guess इतक्या सिंपली मी हे म्हणु शकत्ये... मी इथे हा खेळ, ही कला म्हणा शिकायला आहे... अनेक फालतु.. अनेक फिलॊसोफिकल, अनेक emotional प्रश्नांची उत्तरं सापडवत्ये... लिहिल्यामुळे जराशी organize होतायंत उत्तरं इतकचं!! so म्हणुन लिहित्ये...

..........................................................................................

काही दिवसांपुर्वी लहान मुलं आणि लिहिणं ह्याबाबतीत काहीतरी वाचत होते. एका बाईनी तिचा एक अनुभव लिहिला होता... ती तिच्या कामात होती, अचानक तिची मुलगी तिथे आली , घराबाहेर एक लहान चिमणी पडल्ये आणि तिला मुंग्या त्रास देताय्त हे आईला सांगायला लागली... आईला मुळ्ळीच वेळ नव्हता.. आईनी तरी एकदा बाहेर येउन चिमणी पाहिली.. मुलीला सांगितलं... "बाळ, ती चिमणी आता देवाघरी गेल्ये... तु आत येउन खेळ" आई परत आपल्या कामात बुडाली... मुलीने तिच्या एका मैत्रिणीला बोलावुन आणलं आणि दोघींची काहीतरी खुडबुड सुरु झाली.. घरातुन बाहेर.. बाहेरुन आत सतत काहीतरी चालू होतं... आईनी खिडकीतुन बाहेर ह्या मुलींकडे पाहिल्यावर त्या झाडाखाली काहीतरी करताना दिसल्या, आई तिथे गेली... तिथे एक खड्डा खणुन तो परत बुजवल्याच्या खुणा होत्या, त्याच्या आजुबाजुला पांढरे दगड ठेवले होते... काड्यांचा एक क्रॉस त्या खड्यावर लावला होता आणि त्यावर एक कागद लावला होता ज्यावर लिहिलं होतं "we had to let everyone know, how we felt"

एक छोटासा पक्षी.. कधीतरी जिवन्त असणारा, आता या जगात नाही... कदाचित आपल्या मोठ्यांसाठी इतकी महत्वाची गोष्ट नसेल ही.. पण त्या पिल्लांसाठी नक्कीच होती... आणि त्यांनी ती लिहुन व्यक्त केली... लिहायचं मन मोकळं करण्यासाठी... स्वतःला express करण्यासाठी!!

.......................................

काल रात्री ह्याबाबतीत भरपुर विचार करत होते... नेहेमी सारखी उत्तरं तर सापडत नव्हतीच... अचानक आयपॉड वर युफोरियाचं हे गाणं सुरु झालं.... यार हेच तर उत्तर आहे!! का लिहित्ये ह्याचं... हे सगळे प्रश्न मलाही तर रोज पडताय्त! blogging is just an attempt of ascertaining My Mantra....

माझा ’खो’ संवादिनीला

Thursday, March 20, 2008

ये तारा, वोह तारा...

आज तुळशीबागेत फिरत असताना, अचानक एक मुलगा हातात काही पाकिटं घेउन समोर आला... त्यावर ता-यांची चित्रं होती. मी त्या गर्दीत थांबुन त्याकडे पाहिलं... "तारांगण"... घरात वरच्या सिलिंगवर चिकटवायचे तारे, जे काळोखात चमकतात... छोटे तारे, मोठे तारे,चंद्रकोर, शनी, रॉकेट, धुमकेतु असे काही स्टिकर्स होते त्यात...

ते बघुन मला मी ३री-४थीत असतानाचे आमचे रेडियम-स्टार आठवले... आमची सगळी ट्रान्सॅक्शन्स त्या ता-यांनी व्हायची..."ए माझं नाव बाईंना नको सांगु, मी तुला एक रेडियम देईन"
"मला खोडरबर दिलास तरचं मी तुला स्टार देइन"
"त्याच्या नावाच्या बॅचमधे त्यानी ४ स्टार लावल्येत... त्याच्याशी नकॊ बोलुया.. तो कोणाला ते देत नाही"
आता रेडियम असण्याचा आणि लंगडी येण्याचा काय संबंध? पण मला आठवतं, ज्या मुलाकडे जास्त स्टार होते त्याला आपल्या गटात घ्यायला भांडणं व्हायची!
पुढे शाळेतुनच ज्या मुलांनी प्रत्येक महिन्यात सगळा गृहपाठ पुर्ण केलाय त्यांना हे रेडियम स्टार नावाच्या बॅचमधे लावायला मिळायचे... मला ह्या चांदण्या कधीच मिळाल्या नाहीत! तसा माझा आणि गृहपाठाचा काही संबंधच नसायचा म्हणा!

नंतर एकदा सुट्टीत पुण्याला आले असताना तुळशीबागेतुनच बाबांकडे भरपुर हट्ट करुन भरपुर रेडियम विकत घेतले होते! मी आणि दिपिका मग रोज खोलीचा दिवा बंद करुन काळोख करुन पांघरुणाखाली हे रेडियम स्टार बघायचो! काय मज्जा होती राव... त्या इवल्याश्या रेडियमच्या हिरवट चांदण्या कित्ती कित्ती आनंद देउन जात होत्या! मग जस जशी मोठी झाले..त्या चांदण्या कुठे गेल्या कळलंच नाही! आकाशातल्या ख-याखु-या चांदण्या आवडायल्या लागल्या
अलिबागचं आकाश सुंदरचं होतं... संपुर्ण ता-यांनी भरलेलं.. पुण्या-मुंबईच्या लोकांना ती मज्जा नाही कळायची! आमच्या इथल्या हौशी आकाश-निरिक्षकांबरोबर मी सुद्धा आमच्या मोठ्ठ्या मैदानात जाउन ग्रह-तारे बघायला लागले...
"तो बघ तो ..., पृथ्वीपासुन ....कोटी लांब आहे... आणि त्यांच्या बाजुचा तो पिवळसर तारा ...हजार प्रकाशवर्ष दुर आहे" ..."ह्याचा आकार एवढा आहे", "हे नक्षत्र, तो तारकासमुह", "हा धुमकेतु...साली दिसला", "ह्याच्या वरचा डाग, त्याचावरची खळगी", "ह्याचं आयुष्य... त्याचा स्फोट", "नवा तारा.. आपली आकाशगंगा..." "ता-यांचा मार्ग", "दिशा..एक वीत खाली ध्रुव तारा, वर तिथे सप्तर्षी... तो मृग, तो व्याध", "पिधानयुती, ग्रहण","उल्कापात".... रोज नवीन नवीन गोष्टी तिथले काका सांगत होते...

आणि मी वरती आकाशाकडे बघत त्यांना विचारत होते... "काका, माणुस मेल्यावर त्यांचं काय होतं हो?" कारण आता ’माणुस मेल्यावर त्यांचा आकाशात तारा होतो,’ ह्यावरचा विश्वास त्यांनीच मोडीत काढला होता!
"ध्रुव तारा काही हजार वर्षांनी बदलणार आहे, त्याचं ठिकाण ही नक्की नाहीये.. त्याच्या खाली असणारा अभिजीत तारा काही वर्षांनी आपला ध्रुव तारा बनणार".. काका सांगत होते! विष्णूनी ध्रुव बाळाला फसवलं? त्याला अढळ स्थान, कधीही न बदलणारं स्थान दिलंच नाही?
मी आता आकाशदर्शनाच्या कार्यक्रमाला जाणं बंद केलं, मला माझे बावळट असले तरी विश्वास तोडायचे नव्हते... मला अजुनही माझ्या आजी-आजोबांचे तारे एकत्र फिरताना दिसतात.. आणि काका म्हणायचे ते तारे प्रत्यक्षात एकमेकांपासुन काही प्रकाशवर्ष दुर आहेत! ह्यॅ... कशालाच काहीच अर्थ नाही!!

हिमालयात गेले असताना, तिथलं आकाश माझ्या अलिबागच्या आकाशापेक्षा श्रीमंत दिसलं...सगळं काही अनोळखी, नवीन असताना.. मला माझा व्याध, ध्रुव आपले जवळचे वाटत होते! अलिबागच्या घरातल्या खिडकीतुन कित्ती रात्री त्या चांदण्याशी बोलण्यात घालवल्या! पुण्यात खिडकीतुन फक्त दिसतात बाकीच्या घरांचे दिवे!..दुरवर ता-यांसारख्या खिडक्या आणि त्यातले दिवे पसरलेले!

म्हणुन मग आज त्या मुलाकडुन ते रेडियम-स्टार विकत घेतले.. घरी आल्या आल्या स्टुल, बेड, बेड्वर स्टुल असे अनेक प्रकार करुन त्या हिरवट चांदण्या आमच्या खोलीत चिकटवल्या.. त्यात सप्तर्षी बनवली, मृग, कृतिका, उत्तरा, शर्मिष्ठा माझ्या खोलीत आल्या! ... रात्री झोपेन तेन्व्हा माझ्याकडे माझे ते सगळे तारे हसुन बघत असतील!

रेडियम स्टार- अलिबागचं आकाश आणि माझ्या चांदण्या , एक चक्र पुर्ण झालं!!

Saturday, March 8, 2008

"तु तो मेरा बेटा है!"

sourabh आणि स्नेहा ह्यांचा "नाही चिरा... नाही पणती" वाचल्यावर मलाही माझे काही अनुभव आठवले. १९९९ची गोष्ट. एप्रिल-मे मधे मी आणि बाबा हिमालयात ट्रेकला जाणार होतो.

youth hostel कडुन आम्ही चंद्रखाणी पास ह्या कुलु-मनाली जवळच्या रुटवर जात होतो. मी तेन्व्हा ८वीत गेले होते. YHA च्या ट्रेकला येणारी बाकी सगळीचं माणसं माझ्याहुन वयाने बरीच मोठी होती. माझ्या वयाचा फक्त १ मुलगा होता, पण आमच्यात फक्त स्पर्धाचं होती... कोण आधी पुढे जातं ह्याची! आणि १-२ अपवाद सोडता आश्चर्यकारकरित्या मी पहिली पोचत होते! आणि माझा चालविता धनी होता "त्यागी चच्चा"



कुलूहुन आम्ही बेस कॅम्पसाठी बस घेतली तेंव्हा मी खुप खुप आनंदात होते, एकतर हिमालयाशी झालेली पहिलीच भेट होती. लांबवर बर्फाळलेली शिखरं दिसत होती. थंडगार हवा, पार्वतीचं खळाळतं पाणी.... स्वर्ग!!

कॅम्पवर पोचल्यावर तिथे तंबू बघुन मस्तचं वाटलं... एकदम adventure वगैरे करणारोत असं काही तरी...

तिथे गेल्या गेल्या तिथल्या instructorsनी सांगितलं... हा पुरुषांचा तंबु आणि हा बायकांचा! म्हणजे बाबा आणि मी वेगळे... दुसरी अट , आता इथे फक्त इंग्लिश किन्वा हिंदी बोलायचं, मराठी चालणार नाही!

माझा थोडा थोडा आत्मविश्वास कमी होयला लागला होता! आता काय होणारे, कोणास ठाउक?

इतक्यात आमच्याच ट्रेक टिम मधे असणारा एक ग्रुप तिथे आला... साधारण ८-१० हट्टे-कट्टे लोक त्यांच्या एका म्हातार्या लिडर बरोबर आले. त्यातल्या एकाने आमच्याकडे पाहिलं आणि विचारलं? "C-६? चलिये, आपका स्वागत है! हम मेरट कॅम्पके लोग है! मै खान, हम सब आर्मी के लोग है!"

एकाने माझ्याकडुन विचारलं "ये बच्ची चढ पायेगी?"

मला अस्सा राग आला होता, तुम्ही असाल आर्मीत म्हणुन काय झालं? मला का under-estimate करताय? तेवढ्यात त्यांच्यातलेच एक चाचा म्हणाले "अरे भाई क्यु नही चढेगी? हम सब से आगे भागेगी!" मला ते चाचा आवडले! म्हणजे माझ्यावर विश्वास दाखवला म्हणुनही आणि एकुणचं ते एकदम सही वाटले.

आमच्या ट्रेकला सुरुवात झाली. पहिला दिवस, मी sollidd टरकले होते, कारण practice trekला सगळी हवा निघाली होती. हळु हळु चालायला सुरुवात केली... एक एक माणुस overtake करायला लागल्यावर लक्षात आलं, आता मागे एकच group राहिलाय, जर तो ही माझ्यापुढे गेला, तर माझं खरं नाही! अचानक एका वळणानंतर "फौजी group" थांबलेला दिसला... मी म्हंटलं, चला आता ह्याचे taunts ऐका... तेवढ्यात मला बघुन त्यातले एक ’पांजा चच्चा’ म्हणाले... "अरे त्यागी, देख मेमसाब यहापे है!" ...
मला काहिच कळलं नाही, मी त्यांच्याइकडे न थांबता पुढेच चालत राहिले!
त्यातल्या त्यात आता आपल्या मागे अजुन काही जणं वाढली ह्याचं समाधान... थोड्या वेळाने, त्यागी चच्चा मागुन आले... "अरे बेटा तुम्हारे लियेही मै रुका था, चलो सबसे पहले पहुचना है ना?"... मला महित होतं ते काही शक्य नाहिये, म्हणुन मी फक्त त्यांच्याकडे बघुन हसले... काहिही न बोलता त्यानी हळुहळु चालण्याचा वेग वाढवला, मीसुद्धा त्यांचा वेग संसर्गजन्य असल्याप्रमाणे fast चालयला लागले. मगाशी मला overtake करणारी माणसं मागे पडायला लागली... आणि आम्ही आणि आमच्या पाठॊपाठ सगळा फौजी ग्रुप आला.. आम्ही आमच्या वाटाड्यापर्यन्त पोचलो होतो! बाबा co-leader असल्याने सर्वात शेवटी होते... आणि मी सर्वात पहिली! आमच्या दोघांमधे साधारण १ तासचं अंतर असावं... पण आता आधीच्या दोन दिवसातली भीती पळाली होती.. त्यागी चच्चा, खान्चा दोघांशी गप्पा मारत मी चढत होते!
अचानक एके ठिकाणी पाउसाला सुरुवात झाली, माझ्याकडे ओझं नको म्हणुन माझा raincoat मी बाबांना दिला होता..कारण मला महित होतं मी सर्वात शेवटी असणारे, त्यागी चच्चांनी लगेच त्यांची बरसाती दिली. मी त्यांना म्हंट्लं "आप रखलो" .. "तु तो मेरा बेटा है रे.. पेहेन जल्दी"
पावसाचा जोर वाढायला लागला.. आम्ही सगळे थांबलो... ते ८-१० फौजी आणि मी एक लहान मुलगी... खान्चाचा नी वर पाहिलं, एका बाजुला दरी आणि एका बाजुला डोंगर अश्या ठिकाणी आम्ही उभे होतो...त्यांनी वाटाड्याशी काहीतरी डिसकस केलं आणि म्हणाले
"Highway ले क्या?" हायवे? ते काय असतं? त्यागी चच्चा म्हणाले.. "अपने साथ बेटी है"...
"अरे शेरनी है, चढेगी" असं कॊणितरी म्हणालं... मला काही कळेना... त्यागी चच्चानी माझा हात धरला.. आणि जोरात ओरडले "जोरसे बोलो...." बाकी सगळे ओरडले "जय माता दी"... मी अजुनही blank...पण आता इथे काहीतरी वेगळं होणारे हे कळलं... एक वळण पार केल्यावर खान्चचा नी समोर बोट केलं.. यहासे चढेंगे... समोर एक खडा चढ, आणि पावसाने निसरडा झालेला...समोरची छान वाट सोडुन हे असं चढायचं?
वाटाड्या आणि पांजा चच्चा पुढे हौन पटापट वाट बनवायला लागले, वाटेत येणारी झुडुपं बाजुला सारयला लागले.
"मै नही यहासे..." म्हणेपर्यन्त त्यागी चच्चानी मला "चलॊ जवान, आगे बढो" म्हंट्लं...
"जोर से बोलो.. जय मात दी"
"अरे साथ्मे बोलो...जय माता दी"
"पैर नही थकते.. जय माता दी"
"बोलो बोलो ... जय माता दी"
माता माता की जय.. दुर्गा मात की जय.. अश्या अनेक घोषणा ते देत होते.. मी थकले होते, घाबरले होते.. पण त्या चढावरुन पटापट चढत होते.. त्यागी चच्चा "शब्बास बेटा" म्हणून माझ्या पाठोपाठ... हळु हळु त्याचा उत्साह माझ्यातही आला.. एका "जोर से बोलो..." ला मग मी पण "जय माता दी" ओरडले.. सगळ्याना तो वेगळा आवाज जाणवला असावा... सगळे हसले..."अरे हुई ना बात...!" मी पण एक्दम खुष झाले.. आणि तो चढ संपवुन टाकला... आम्ही आमच्या पहिल्या कॅम्पला पोचलो... मी लहान म्हणुन मला सर्वात पुढे ठेवलं... माझ्यानंतर साधारण २ तासांनी बाबा पोचले.. त्याना भेटल्यावर मला खुप आनंद झाला.. मी पहिली पोचले सांगितल्यावर, त्यांना विश्वासचं बसला नाही!

मग पुढे रोज मी त्यागी चच्चा बरोबर चालायला लागले.. त्यांच्याशी गप्पा मारत, त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा ऐकत... मलाही "मी काय मोहिमा फत्ते करत्ये" अश्या मस्तीत चालत होते... ते लोक कायम मस्ती करत, हसत-खेळत चालले होते... इतकी आनंदी लोकं मी कधी पाहिलीचं नव्हती...ही लोक सैन्यात आहेत..
इतरवेळि हि लोकं बंदुका घेउन शत्रुला मारायचा सराव करत असतात किंवा प्रत्यक्षात युद्धात असतात? कसं शक्य आहे? सैनिक असेही असतात, आनंदात, मजा करत हे आत्तापर्यन्त कधी पहिलचं नव्हतं!
रोज मी नविन नवीन गोष्टी त्यांच्याकडुन ऐकत होते... खान्चाचा कसे युद्धाला घाबरतात.. म्हणुन बाकी सगळे त्यांना चिडवत होते....

आम्ही मस्त धमाल करत होतो.. हिमाचल प्रदेश मधल्या हिमालयात... आणि तोच हिमालय पुढे काश्मिरात गेला होता, जिथे काहीतरी होतयं ह्याची कुणकुण लागली होती! रोज रात्री गाणि म्हणत नाचणा-या फौजी ग्रुपला आपल्या येणा-या रात्री कश्या असणारेत ह्याची कल्पना नव्हती.. कधिच नसते.. म्हणुनच कदाचित ते इतर वेळि इतक्या आनंदात असतात!

ट्रेकचा शेवटचा दिवस उजाडला... आज मला पहिलं वगैरे पोचायचं नव्हतं, फक्त शेवटचा दिवस enjoy करायचा होता... मी त्यागी चच्चांबरोबर नाहि गेले, मागेच हळु हळु चालले होते.. एके ठिकाणि ते थांबलेले दिसले... त्यांचे डोळे पाणावलेले होते "बेटा, अब कलसे हम हमारी राहपर .. और तुम वापस तुम्हारी स्कुल, पढाईमे लग जाओगी... हमे भुलना नही बेटा! अरे तु तो मेरा बेटा है, ऐएसे मै क्यु केहेता हुं पता है? तुम्हारी उम्र का मेरा एक बेटा है, जो मेरे गावमे रेहेता है.. वोभी तुम्हारी तरह स्कुल जाता है! उसे यहापे नही लेके आ पाया, असे वक्तहि नही दे सकता.. तुम्हे देखके हमेशा उसकी याद आती है! इस्लिये कहता हु, तु तो बेटा है मेरा"

ट्रेक संपला, घरी आले.. कारगिलच्या बातम्या यायला लागल्या.. युद्ध सुरु झालं...मी रोज प्रार्थना करत होते..."कोणत्याही बाबांना काहीही नकॊ होऊ दे... ज्यांच्या घरी त्यांची मुलं वाट बघतात्य त्यांना सुरक्षित ठेव.. युद्ध लवकर संपव... सगळे लवकर परत घरी येउ देत"

त्यागी चच्चा च्या मुलाला मी कधी पहिलं नाहिये पण आजही मला ट्रेक आठवला की आठवतात त्यागी चच्चा आणि त्यांचा गावाला असलेला मुलगा!

Wednesday, March 5, 2008

दिपु!!

५ मार्च १९९२...

आई घराबाहेर निघाली तेन्ह्वा इतकंच कळत होतं कि आई हॉस्पिटलमधुन येताना बाळ घेउन येणार आहे!!आजोबांच्या कडेवर बसुन मी आईला ठणकवुन सान्गितलं होतं..."आणलंस तर मुलगी बाळ आण, नाहीतर नको आणु" आणि आईनी खरचं माझं ऐकलं,
हॉस्पिटल मधे आजीबरोबर जाउन मला आमचं नवीन बाळ बघायचं होतं...आईच्या जवळ झोपलेलं गोरपान, छोटसं बाळ... कित्ति कित्ति गोड होतं ते, इवलीशी हनुवटी, इवलेसे गाल, आणि नाक तर नव्हंतच आमच्या बाळाला... मी हळुच त्यस सोट्या सोट्या बाळाच्या गालांना हात लावला, किति मऊ-मऊ होतं शोन्या आमचं!!

शाळेत, बसमधे, घसरगुन्डीवर सगळि-सगळिकडे मी भेटेल त्याला सांगत सुटले होते "आमच्याकडे ना बाळ आणलयं आम्ही छोटसं" ...मग घरात शेकाचे,धुपाचे वास यायला लागले, बाल्कनीतल्या दोरीवर पांढ-या पताका लागायला लागल्या, रोज सकाळी रडारडीनंतर पावडर-तीट लावा चा कार्यक्रम होयला लागला.... बाळाचं बारसं झालं, बोर-न्हाण झालं, बाळ हळु हळु मोठं होयला लागलं...

तिला आई, बाबा म्हणता यायला लागलं... पण अजुन ती ताई म्हणतचं नव्हती... "शी बुआ, असं कय बाळ आणलं आईनी, ती आल्यापासुन आई-बाबा तिलाच जास्त प्रेम करतात, तिलाच जवळ घेतात,माझ्यावर कोणी प्रेम करतचं नाही" वगैरे वगैरे विचार मनात यायला लागले....
मग हळु हळु आमच्या गोन्डस पिल्लुचा गोरा रंगही मधे यायला लागला...ताइ काळी, पिल्लु गोरि...."पण जाऊदे मला नाक तरी आहे, बाळाचं नाक नकटं आहे"

ताई ओरडते,रागावते पण तरिही पिल्लु रोज मी शाळेतुन यायच्या वेळेला बाल्कनीतल्या ग्रिल्समधे डोकं घालुन बसायचं माझी वाट पाहत... ताई तिच्या मैत्रिणिंसोबत खेळायला जाते तेंवा पिल्लुला नेत नाही, तरीही ताईच्या मागे मागे फ़िरत पाना-फ़ुलान्चि भाजी-पोळी ताईला खायला द्यायची!!!

एकदा पिल्लुचा भोन्ड्ला केला, त्यानंतर दुस-या दिवशी ही बया बाल्कनीत बसुन ऐलोमा-पैलोमा गात होती, आईनी जाउन पहिलं तर तिथे हलवा सान्डला होता आणि मुन्ग्या आल्या होत्या,आईनी तिला एक सणसणीत धपाटा मारला...तरीही पिल्लु आईला हसत हसत सांगत होती.."आई, थांब नं, मुंग्यांचा भोन्डला चालु आहे" मुंग्या पडलेला हलवा नेताना गोल गोल फ़िरत चालल्या होत्या.. आणि आमची पिल्लु त्यांच्यासाठी..ऐलोमा-पैलोमा गात होती...

नंतर, पिल्लु मोठी कधी झाली आणि शाळेत कधी जायला लागली कळलचं नाही... युनिफ़ोर्म, दप्तर, गळ्यात छोटिशी वॉटरबॅग, २ छोटे-छोटे बो बान्धुन रोज स्वारि शाळेत जायला लागली...मधल्या सुट्टीत ताई आपल्या वर्गात येईल याची वाट पाहत बसलेली असायची...ताईही रोज नव्या मैत्रिणिला बरोबर घेऊन लहान बहिण दाखवायला जायची... मग सुरु झाल्या परिक्षा, मार्क्स, स्पर्धा, नंबर........."ताईचा कायम पहिला नंबर...मझा का नाही? ...ताईला जास्त प्रेम करता, मला नाही....ताईला स्कॉलरशिप,माझी काहिच मार्कानि तर गेली न..ताईच हुशार, मी नाही"असं नाहिये गं मनु.. तु पण हुशार आहेस... मनुनी पण दाखवुन दिलिच लगेच तिची हुशारी, आणि मग तिला पुण्याच्या प्रबोधिनित ऍडमिशन मिळाली...

पण मनु एक वर्ष एकटी राहणार आत्याकडे? अजुन साहवीतचं आहे..इतक्या लहान वयात? पण ती तयार झाली...सोनं आमचं कसं एकटं राहिलं वर्षभर...तिच्या डायरीत काऊंट-डाऊन असायचं आम्ही तिला भेटायला कधी जाणार ह्याचं, बाहेरुन आमची छोटिशी पोरगी फोन करायची, शाहाण्यासारखी वागताना, सहावितली मुलगी कधी माझ्या भावन्डांशि भांडलीही नाहि... किती शहाणी झाली किती कमि वयात!!

मनु, टीव्ही बघणं मात्र कमी करायला हवंय... "आत्याकडे टीव्ही नाहि बघायचे ना मी कधी...आता स्वतःच्या घरी तरी बघुदेत".... झालं ही पोरगी आता शहाणी झाल्ये पण वर्षभर न पुरवुन घेतलेले लाड आता नविन घरात आल्यावर पुरवुन घेणारे!! अन लाड पुरवुन घेतले मनुने...अजुनही घेत्ये!!

तिला काय कळतयं, लहान आहे अजुन म्हणुन कधी काही बोललेच नव्हते तिच्याशी मनापासुन...
त्यादिवशी डायरी वाचली मी तिची (चोरुन) त्यात चक्क तिने तिच्या "क्रश" विषयी लिहीलं होतं!
अगं ए ह्या लहान मनीला कोणी मुलगा वगैरे पण आवडायला लागला? इतकी मोठी कधी झाली ही?

माझ्या "त्याच्याविषयी"ही मी सर्वात आधी तिलाच गाठुन सांगितलं, माझी लहान बहिण एकदम माझ्या मोठ्या बहिणीसारखं माझ्याशी बोलायला लागली... "ताई, नीट विचार कर!" वगैरे वगैरे मोलाचे सल्ले दिले, अजुनही देते :)
"आता काय तुला "तो" आलाय, तुला आमची गरज काय आहे?
तुला आता माझी काही किम्मतच नाहीये" वगैरे वाद सुरु झाले. पण माझ्याशी भांडणारी मुलगी, मी त्याच्याशी भांडल्यावर लगेच.. आमचं भांडण मिटवायला पुढे!
मी तिला सॉलिड्ड त्रास देते आणि ती तो परतवुन लावते :)

स्मार्ट आहे ती, मला ब्लॅकमेल करणं आता जमायला लागलं आहे कि तिला आता...
कॉलेजातल्या मैत्रिणिंबरोबर फिरायला लागली आहे...
घरातल्या निर्णयांमधे स्वतःचं मत ऐकवायला लागल्ये!
आता खरचं मोठी झाल्ये!

ती आहे म्हणुनचं नाहीतर तिच्या भाषेत "ताईशी ’बहिणी’ करणं सोप्पं नाहीये" :)
मी खुपदा तिच्याकडुन मला हवी तशी कामं करुन घेतल्येत, तिच्यावर माझे मूड काढल्येत, भांड-भांड भांडल्ये, अनेकदा तिला हवा तेंव्हा वेळ दिला नाहीये! "वाईट्ट" बहिण म्हणुन असणारे सगळे गुण (अवगुण) माझ्यात आहेत!
आणि तरीही ती कायम ती तिच्या गोड आवाजात "ताई, काही हवं आहे का? काय झालयं? आपण एक गंमत करुया का" सारखे प्रश्न विचारत असते, मला आनंदात ठेवत असते!

आता आम्ही दोघीचं राहताना जिथे मी तिची काळजी घ्यायला हवी तिथे तिचं माझी आई झाल्ये!
सॉरी दिपीका, खुप त्रास देते ना मी तुला?खुप स्वार्थी आहे ना गं मी? खरचं इतकी वाईट्ट आहे मी? मी अशी असुन देवाने तुला माझी बहिण का गं बनवलं मग?कदाचित तुचं मला सांभाळुन घेउ शकतेस म्हणुन...

थॅन्क्स दिपु... माझी बहिण झाल्याबद्दल!

Thursday, February 28, 2008

दही-टिंकी! :)

मी पुण्याला राहायला आल्यावर आई अलिबागला राहायला निघुन गेली. मला कंटाळुन नाही राव, पण आता आम्ही दोघी बहिणी एकट्या (?) राहु शकतो म्हणुन!
त्यामुळे आता स्वयपाकघरावर आमचंच राज्य आलं! (स्वयपाक मधल्या य वरचा अनुस्वार माझ्या डोक्यात जातो, म्हणुन लिहिला नाहिये... हा शब्द स्वयपाकच वाचावा, स्वयंपाक नाही!)
आता आम्ही तिथे हवं ते करायला लागलो, हवं ते म्हणजे काहीच्या काही पदार्थ बनवायला लागलो! नेहेमीचा टाईमपास म्हणजे घरातलं उपलब्ध सामान बघायचं, ते गुगलमध्ये टाईपायचं १०१ रेसिपी हजर होतात. त्यातली interesting वाटेल ती रेसिपी करायची! आम्ही तिबेटियन मोमो करुन पाहिले, गाजराचं सॅण्डविच केलं, कोबीचा पुलाव केला, १-२ प्रकारचे पास्ते केले.. आणि बरचं काहि अजुन विचित्र!!!!
आणि हे सगळं करताना ना आम्ही असं मानतो कि आपण कोणत्यातरी कुकरी-शो वर आहोत आणि मग एखाद्या काल्पनिक कॅमे-याकडे बघुन पदार्थ बनवतो. with our special comments! (आत्ता हे लिहिताना realise होतयं कि आम्ही जरा जास्तचं विचीत्र आहोत :) )

आज मात्र जरा वेगळा दिवस होता! दिपीकाला अचानक दहिवडे खावेसे वाटले. नेटवर रेसिपी पाहणार होतो पण म्हंटलं instant पिठं मिळतात ना... करु त्याचेच! एका नामांकित कंपनीचं instant दहिवडा पीठ आणलं. कंपनीचं नाव सांगत नाहीये कारण १) आम्ही केलेली रेसिपी त्यांना अभिप्रेत नाहीये. आणि २) त्या कंपनीकडुन मला पैसे मिळाले नाहीयेत त्यांची पब्लिसिटी करायला (अजुन तरि) :)
so आता आजचा पदार्थ (नाही, रोज रेसिप्या नाही लिहिणारे इथे)
आज दहिवड्याचा बेत होता पण माझी बहिण इतकी धसमुसळी आहे की बदाक्कन पाणी घातलं त्या पिठात! आता जे सेमि-लिक्विड होयला हवं होतं ते मस्त पाणी-पाणी झालं. पण दही तर आता मस्त चाट मसाला, तिखट, मीठ वगैरे घालुन फेटलं होतं. मस्त चव लागत होती! मग आता काय करावं ह्या विचारात होतो... त्या पीठात रवा घातला, सोडा घातला तरी काही जास्त फरक पडेना! मग जरा डोकं लढवलं... असं पीठ उत्तप्प्यांच असतं, म्हंटलं उत्तप्पे घालावे अन दह्यासोबत खावे! पण मज्जा येत नव्हती... मग बहिणीनं तिचं डोकं लावलं, लावायलाचं हवं होतं तिनेच घोळ केला होता ना! फ़्रायपॅन वर उत्तप्प्याप्रमाणे छोटे छोटे गोल बनवले (आणि त्या गोलांचं नामकरण केलं "टिंक्या" )

(माफ करा, डेकोरेट वगैरे करता येत नाही मला! पण प्रयत्न केला.. फोटु काढायचा होता ना!!)

आणि मग हा पदार्थ दह्यासोबत खाल्ला. खायचे भरपुर प्रकार आहेत. एक तर दह्यात बुडवुन खा! त्यावर दहि-कांदा घालुन खा! चिंगु चटणी (चिंच-गुळाची चटणी) वगैरे वगैरे... ते तुमच्या आवडिवर आहे.आणि ह्या पदार्थाचा plus point म्हणजे चवीला ब-यापैकी दहिवड्यासारखं आणि विदाउट तेल! कुठेतरी "ताईचा सल्ला: तव्यावर कांदा घासावा म्हणजे पिठ तव्याला चिकटत नाही " हे वाचलं होतं आणि it works! :). त्यामुळे आज तेल न वापरता हा प्रकार केला!

उत्तर आणि दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक अनोखा मेळ ह्या पदार्थाद्वारे आम्ही घडवला! (टाळ्या...)
मी sollidd पकवत्ये ना? (श्लेष लक्षात घ्यावा!)

तर हा पदार्थ तुम्ही घरी करुन बघा, आणि आम्हाला नक्की कळवा कसा झाला ते! तुमच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत... तो पर्यन्त "मस्त खा आणि स्वस्थ रहा" :D


p.s. हा पदार्थ केलाच तर जेव्हा टिंक्या तव्यावर घालाल तेन्व्हा mobileवर बोलणे टाळा नाहीतर...



Friday, February 22, 2008

हमार टुनटुनवा!!

साधारण ४ वर्षापुर्वीची गोष्ट, मी आणि कामना BMMच्या प्रवेशपरीक्षेसाठी (entrance test) मुंबईला जात होतो! बसमधे बाजुला बसलेला एक मुलगा सतत त्याचा mobile वाजवत होता. आम्ही दोघी पक्क्या "अलिबागकर" त्यामुळे... "कशाला लागतात mobile ह्या वयात? चैन आहे नुस्ती" वगैरे वगैरे बोलत होतो. मुंबई क्या चीज है? हे अजुन कळलं नव्हतं तोपर्यन्त! entrance testला पण "आजची तरुणपिढी"छाप विषय होता, आता नक्की आठवत नाही. पण आम्ही दोघींनीही कॉलेजातल्या मुलांना mobileसारख्या वस्तुचं व्यसन लागतयं वगैरे लिहिलं होतं. परिक्षेला आलेल्या बाकी "मुंबईकरांकडॆ" ..काय style मारताय्त भावाने आम्ही बघत होतो.



झालं, दोघीही तिथे select झालो, अलिबाग सोडुन मुंबैत रहायला आलो. आता आमच्या वर्गात बर्याच लोकांकडे mobile होता. group-project वगैरे असेल तर आमचे वांदे होयला लागले, आम्हाला मेसेज मिळायचेच नाही... मग लक्षात आलं की mobile ईथे चैन नाही already गरज बनला आहे.

मग "बाबा mobile असणं किती गरजेचं आहे" हे बाबांना पटवायला काही दिवस गेले. आणि मग २५ डिसेम्बर २००४ला मला mobile मिळाला... तेसुद्धा surprise बरं का? दिपीकाने हातात box ठेवला... "बघ बघ काय आहे"...boxच्या आकारावरुन तो mobile आहे हे लक्षात आलं होतं... मी खुश होते! रॅपर फाडलं, आता mobileचा खोका दिसायला लागला, आणि मला हसावं की रडावं कळेना... आनंद होत होता.. कारण mobile मिळाला होता... पण नोकिआ ३३१५? :।



FM नाही, कॅमेरा नाही.. काहीचं नाही... साधेस्ट मॉडेल! मला थोडा राग पण आला होता... पण मग म्हंटलं ठीक आहे. त्याच्याबरोबर airtelचं सिम फ़्री होतं :)... मग दुस-या दिवशी वर्गात "तेजु तेरा mobile दिखा ना" असं १०वेळा ऐकल्यावर mobile बाहेर काढला. "यार ठिक है, atleast अभी contactme तो रहोगी" ... "३३१५ बहोत स्टर्डी मॉडेल है रे" असे sympathyवाले टोमणे मला कळत होते. मला माझा Mobile खरचं आवडत नव्हता! मी तो बाहेर कोणासमोर काढायचे नाही. पण मग हळु-हळु त्याबद्दल थोडा आपलेपणा वाटायला लागला...यार, कसाही का असेना, आता आपला आहे! माझा स्वतःचा आहे!

मग त्याच्याबरोबर (३३१५बरोबर) Love-hate relationship सुरु झालं. i used to hate it पण मला हवाही होता... मग मला कोणि त्याच्यावरुन चिडवलं की मीसुद्धा माझा आवाज चढवायचे "माझा mobile हा real mobile आहे! तुमच्या मोबईलसारखा मुळूमुळू आवाज नाहिये, आख्या bldg.ला ऐकु जाईल असा दणदणित आवाज आहे. आणि ३-४ मजल्यावरुन खाली टाकलात तरिही काही होणार नाहीये माझ्या पठ्ठ्याला! तुमच्यासारखा delicate darling नक्किच नाहिये! हा.. बोलायचं कामचं नाही! फोटो काढायला digi-cam आहे माझ्याकडे आणि मी स्वतः गाते, मला FM नकोय (शेवटचं argument फक्त for sake of an argument होतं :P) खरं सांगु तर ही सगळि कारणं बाबांनी मला दिली होती जेन्व्हा मी त्यांना मोबाईल बदलुन मागितला होता!

कायम वाटतं हा जिवंत असता तरं? आईचा कॉल आल्यावर मी थिएटरमधे असुन लायब्ररीत आहे सांगताना त्याने मला डोळा मारला असता! पलिकडच्या व्यक्तिला smart उत्तर देताना माझ्याकडे बघुन smart smile दिलं असतं! मग मी कधी लाजल्यावर हा पण लाजला असता! मला चिडवलं असतं... मी रडताना पाठीवरुन हात फिरवला असता! मी भांडताना मला शांत केलं असतं!

तो इतक्यांदा पडला, पण कधिही तक्रार नाही केली! मी त्याला इतक्या शिव्या दिल्या पण सतत माझ्याबरोबरच होता.. मी एकटि असताना फक्त तोच तर होता माझा आधार! मी हसले, रड्ले, लाजले, भांडले... सगळं ह्याच्याच साक्षीने! माझा गुंडु mobile! मी कायम मजेत म्हणायचे "ईट का जवाब ३३१५से" :)

परवा त्याला धक्का लागुन तो पडला... ह्यावेळि दमला होता बहुतेक... त्याच्या चेहेर्याला लागलं.. तुमच्या भाषेत त्याची screen तुटली.. पण तरिही रडला नाही.. अजुनही माझ्याबरोबर आहे. आणि कायम माझ्याबरोबर राहिल! आता मोठा झालाय, थोड्या कुरबुरी करतो.. पण माझा तेवढा गुण नाही पण वाण लागणारचं ना त्याला! कोणितरी त्यादिवशी म्हणालं "असल्या निर्जीव गोष्टीत काय जिव गुंतवायचा? बदल तो मोबाईल आता" नाही यार नाही जमणार.. मला ह्याने कायम साथ दिलिये.. ह्याच्या शेवट्च्या श्वासापर्यन्त मी त्याला साथ देणारे.. तो फक्त माझाच राहिल!

Saturday, February 16, 2008

My Dream House! :)

मी ज्या शाळेत शिकायला जाते मुलांकडुन तिथे ह्या आठवड्यात आम्ही त्यांना त्यांचं dream house काढायला सांगितलं होतं! मुलांनी इतकी भन्नाट घरं काढली...


मी तर बघतचं बसले होते. चॉकलेटांचं घर, पाण्यातलं घर, हिरेजडित घर आणि अशी ब-याच प्रकारची घरं मुलांनी काढली! मी माझ्या तुट्पुंज्या शब्दात काय सांगु? फोटोच बघा!


हे candy ने बनलेलं घर आहे, ज्याचं छत आइस्क्रिमनी बनलेलं आहे. आणि बाजुला जे पाण्यासारखं दिसतयं ना ते रसना आहे बरं का...





हे बर्गर-नुडल्स हाउस आहे! mmm home yummy home :), ह्या घराच्या आर्किटेक्टला विचारलं "अरे कोणी खाउन टाकेल ना तुझं घर" तर त्यावर तो लगेच म्हणाला " घरावर जि मिरची दिसत्ये ती एक वेपन आहे, कोणी खायला आलं की ती तिखट सोडेल"





हे भन्नाटेस्ट घर आहे, हे हत्तीच्या आकाराचं घर, ज्याला चाकं आहेत..ते चालू शकतं आणि तुम्ही किल्लीने लॉक उघडलं की चाक वेगळि होतात आणि हत्तिला जे वरती पंख दिस्ताय्त ना त्यांनी हे घर उडु शकतं.. हत्तिच्या पोटात टॉफींचा साठा आहे...आणि जर कोणि शत्रु आले तर hidden पाण्याचा मारा आहे हत्तीच्या सोंडेमधुन आणि गंमत म्हणजे ह्या घराला हि-यांचं फेन्सिंग आहे :)


हे पाण्यावरचं घर आहे.. आणि महत्वाचं म्हणजे हे बोलकं घर आहे! त्याचे डोळे आणि मिश्या दिसतायंत ना?


ह्या आर्किटेक्टनी मला १० वेळा ह्या प्राण्याचं/superhero/ कोणितरी mon (digimon or pokemon) नाव सांगितलं पण मला काही आठवत नाहीये... तर त्याच्या एका पायातुन घरात जायचं आणि दुसर्यातुन बाहेर :)


हे घर indo-pak borderवर बांधलं जाणार आहे. तोफा आणि शस्त्रांनी भरलेलं हे घर पाकिस्तानी शिपायांना मारणारे!


हि-यांचं घर :)


आणि सर्वात शेवटी...

अद्रुश्य घर :) :)


अशी अजुन बरीच छान घरं तिसरीतल्या पिल्लांनी काढली!
आपण 2bhk, 3bhk आणि त्यातल्या त्यात काही जणं बंगला... ह्याच्या पुढे स्वप्न बघतचं नाही ना?माणसं जसजशी मोठी होतात, स्वप्नं लहान होत जातात ना?

Tuesday, February 12, 2008

:|

आज ह्या अवघड वाटेवरुन जाताना,
आठवत्ये मला जुनी सोप्पी वाट...
आठवतोय तो आनंदी प्रवास...

ती वाट सोप्पी होती?
कि ती तुझी साथ होती?
जिनं कधी वाटेतले अडथळे जाणवुचं दिले नाहीत?


(राव copy नाहीये... मला पण होता येतं senti! कधीकधी)

आज माझ्या काही जुन्या मित्र-मैत्रिणिंची खुप आठवण येत्ये.. आत्ता अगदी काय खुप अवघड वाट वगैरे नाहीये, पण i need those people back in my life with me... नाहीये ना पण शक्य...सगळे आपल्या-आपल्या कामात आता दंग आहेत... मलासुद्धा कित्त्ती... दिवसांनी आज आठवताय्त सगळे!
miss those old good days!! :

Saturday, February 9, 2008

...

ओघळलेले ते दोन अश्रु तळहातावर घेतले...
हातांमधे एक ताकद आल्यासारखं वाटलं...

बाबा तुम्ही सुरु केलेलं हे सेवाव्रत पुढेही असंच चालु राहिल...
आनंदवनात आनंद फुलत राहील!

तुम्हाला आम्ही वाहु शकतॊ फक्त सेवांजली!

Wednesday, February 6, 2008

तेरी खुशी, मेरी खुशी...

मी बावळट्ट आहे.. हे महित्ये मला पण माझ्या आजुबाजुची ते मला कायम प्रुव्ह का करुन देतात माहित नाही!
म्हणजे मलाच काल काही गरज नव्हती पण उगाच काहीतरी senti वगैरे झाल्यासारखं झालं ! त्याला म्हंट्लं "तेरी खुशी मे मेरी खुशी है!" तो हसला आणि म्हणाला "ठीक है तो अभी मै सो रहा हुं, मेरी सुबह call करके उठा देना...m khush wen m sleeping"

मग माझ्या बहिणिला पकडलं, जरा senti गप्पा मारुन झाल्यावर म्हणाले.."पिल्ल्या तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे" लगेच तिने लाडॆलाडे विचारलं ’मग आज मी शाळेत नको जाउ?"

यार, काय हे? मी expect करत होते कि समोरचाहि मला म्हणेल कि ’नाहि ग बाई, तु आनंदात रहा, खुश रहा.. आम्हाला तेवढंच पुरे" .... नाहीच ना पण!!रहा बाबा खुश.. शेवटि काय? "तुम्हारी खुशीमेही मेरी खुशी आहे ना?"

काल अभिषेक बच्चन आणि माझ्या एका crushचा वाढदिवस होता... "xxx@#xx मला ditch करुन दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करणाऱ्या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी... :(
मी कालचा दिवस त्यामुळे ’काळा दिवस’ म्हणुन साजरा केला.
कालचा संपुर्ण दिवस sunday फिल्मच्या गाण्यातली.. "बेहोशिया, बेताबिया, बेकरारी 24/7" हि ओळ तोंडात बसली होती!

man this is what i call " a real Sad day"

Tuesday, February 5, 2008

सुरणाची भाजी

जगात अप्रतिम सुरणाची भाजी फक्त आणि फक्त माझी आजीच करु शकायची!
मला आठवतं एकदा अश्विनीने मला विचारलं होतं की "तुझ्यामते स्वर्ग म्हणजे काय?"
मी लगेच उत्तर दिलं होतं..."स्वर्ग आपल्या हिमालया सारखा दिसत असेल, मस्त background music असेल, सगळे हसरे आणि त्यामुळे सुंदर दिसणारे चेहरे असतिल आणि महत्वाचं म्हणजे आज्जीच्या हातचं जेवण असेल"

माझी आज्जी, आज्जुकली, एन्चिकुन्चिपुन्चि (नाही ही भाषा कुठली हे मला ही माहित नाहिये :) ) जगातली उत्तम सुगरण होती. (असं सगळ्यांना त्यान्च्या आज्जीबद्दल वाटत असेल. माझी हरकत नाही! कारण तुम्हाला माझ्या आज्जीच्या हातची चव चाखायला मिळाली नाही ना!!)

मी खायला लागल्यापासुनच आज्जीच्या हातच्या प्रत्येक पदार्थाची फॅन आहे. तेंव्हा तर फॅन हा शब्द पण माहित नव्हता! तिने केलेला भात.. म्हणजे नुस्ता भातसुद्धा चविष्ट असायचा! (ह्यात कुठलीही अतिशयोक्ति नाहिये राव), मग त्यात तिने कालवलेला तुप-मीठ-कैरिचं लोणचं-भात म्हणजे आह्ह्ह!!! काय यार सगळि पंचपक्वान्नं गेली तेल लावत अश्या भातापुढे!! मी १२वित असेपर्यंत तिच्याकडुनच भात कालवुन घ्यायचे जेंव्हा ती असायची, नंतर काय ती दुष्ट बाई आम्हाला सोडुनच गेली... ए आज्जे अजुन माझा राग कमी झालेला नाहीये... तु चिंच-गुळाची आमटी बनवुन देईपर्यंत तरी कमी होणार नाही आहे. ताक-भात आणि त्यावर चिंच-गुळाची typical कोकणस्थी आमटी! माझ्या आईला सुद्धा नाही जमत. मला कळत नाही सगळ्या आज्या, आयांना स्वयपाक करायला नीट का शिकवत नाहीत? आज्जी आईपेक्षा १०पट उत्तम स्वयपाक करायची!

मला भात देताना भाताची विहिर करुन त्यात आमटी घालुन द्यायची आज्जी! तिने केलेले आमटितले गोळेही मस्त असायचे! मी त्याला आमटीतले बटाटे म्हणायचे... आज्जी आमच्याकडे आली किन्वा मी आज्जीकडे गेले की हा मेन्यु ठरलेला असायचा! ती स्वत: मात्र पोळी कुस्करुन त्यावर आमटी घेउन खायची, ते combo पण सही लागतं!

तिची अजुन एक speciality होती ती म्हणजे "उकड", हा पण बहुतेक कोकणस्थीच पदार्थ आहे. चाच-पोहे खावे तर तिच्याच हातचे! वाटाण्याची उसळ, उपमा, शेकटाच्या शेंगांची भाजी... अजुन अशि कित्ती कित्ती नावं सांगु! अहो ती बाई , कोबीची भाजी सुद्धा मिटक्या मारत खावी अशी करायची.

गोड पदार्थांमध्ये सुकेळी, गुळ्पापडीच्या वड्या specialch!

फक्त नेहेमीचे पदार्थच नाही पण तिच्या भाषेत ’मॉड-र्र-न’ पदार्थपण ती छान करायची! रगडा-पॅटिस, पाव-भाजी, पाणी-पुरी..एक्दम झक्कास! ती स्वतः खव्वय्येगिरीत expert होती, आधीच्या पिढीतली असुन बाहेरच्या पदार्थांशी तिचं काहीही वाकडं नव्ह्तं. वडापाव, चाट, क.दा तिचे फेवरेट होते.

म्हणुन कदाचित आम्ही नाही म्हणत असुन जायच्या आदल्या दिवशी प्रबोधिनीच्या इथली दाबेली खावुन घेतली... बाकी सगळ्यांना अतृप्त ठेवुन स्वतं तृप्त हॊउन गेली! देव नक्किच जाडा झाला असणारे वरती!

(आज तिची आठवण येउन मी सुरणाची भाजी केली, सुरण खाजरा निघाल्यामुळे २ घासांपेक्षा जास्त नाही खाउ शकले. आज्जी इतकी मस्त भाजी कशी करायची काय महित? .. तर म्हणुन नाव - सुरणाची भाजी :) )

Tuesday, January 29, 2008

Love story (which is not a Love story)

hey, happy anniversary! anniversary kasali?
aah comeon dont tell me tu visarlas!
are asa kay kartos varshabharapurvi aaj aapla breakup (official..lol) zala nahi ka...
hehe, i know abhi sollidd fase ho.. samaz nahi aa raha kaise react kare na?
hehe gotcha hero :)
neways hows life.. i mean to say hows life without me? hehe!
dont worry boss, mi guptmadhali kajol ani pyar tune kya kiya madhli urmila honyacha vichar sodllay!
bcoz fortunately or unfortunately U r not at all like bobby or fardeen!n waisebhi idea itna khas nahi tha!hain na?
chalo take care!
bbye!!

तिने हा मेल लिहिला आणि चक्क पाठवला...माझ्यात असं धाडस नसतं झालं म्हणजे ह्याहुन खरमरीत मेल मला लिहिता येइल पण पाठवणं नाही जमायचं राव! माझेही नाही का वर्ड फाईलमधे अश्रु वाहिले...
हा मेल झाल्यावर आम्ही दोघी गप्पा मारत बसलो होतो... तिने "चला आता अभ्यास करायला हवा" म्हणुन पुस्तक उघडलं पण मी मात्र विचार करत बसले होते!
पात्रं मिळाली कि लगेच माझं script writing सुरु होतं...
--------
अजुन साधारण ८-१० वर्षानी, जेव्हा हि दोघंही त्यांच्या तिशीच्या आसपास असतील, अचानक त्यांची भेट होइल त्याच्या paintingsच्या प्रदर्शनात... दोघंही आधी एकदा एकमेकांकडे बघतील... पण आधी कोणी हसायचं म्हणुन शांत चेहेरा ठेवतील, त्याला जास्त वेळ थांबता नाही येणार तो हसेलच!


ती: "hi, कसा आहेस?"

तो: "कसा दिसतोय?"

ती: (तु कधीपासुन असे टिपीकल रिप्लाय द्यायला लागलास?) आह, let me see.. as usual.. टकाटक! आणि मी?

तो:जरा जाड झालीस! (shweet... as usual)

ती: (कधितरी खरं बोल रे) yeah i know..थोडिशी!! :)

तो: so, कसं वाटलं प्र-द-र्श-न? (क्युट घाटी होतीस... मी मराठीच बोल्णार..hehe)

ती: खरं सांगु तर.. मला अजुन एकाही चित्राचा अर्थ कळला नाहीये!

तो:"अजुनही dumbo आहेस! चल दाखवतो...
हे चित्र आहे ना, ते कदाचित कळेल तुला... मुलगा-मुलगी मधे friendshipही असु शकते फक्त.. love च असणं गरजेचं नाही ना.. हा बघ हा रंग........

तो बोलत होता ती त्याच्याचकडे बघत होती...

ती: inspiration कोणाकडुन मिळालं हं?

तो: यार, कायम तुझ्याशीच inspiration मिळतं मला! :)

ती: आहा!! (flirt!! अजुनहि हा मुलगा वेडाच आहे ना! लग्न केलं का ह्याने? शी बाबा... मुलं मंगळसुत्र घालत नाहीत त्यामुळे काहिच कळत नाही... पण असं कसं विचारणार.. त्यामुळे त्याला वाटेल कि मी त्याच्याचसाठी थांबल्ये...त्याला वाटेल की त्याला कळेल?)

मग अचानक भानावर आली आणि चित्राकडे पाहायला लागली... त्याने तिच्याकडे पाहिलं.

तो:(हिनी लग्न नाही केलं अजुन? मंगळसुत्र कुठे दिसत नाहीये, म्हणा आजकाल कुठे घालतात मुली असलं काही!) तो तुम्हारी शादी होगई?

ती: नई यार, तुमने छोड दिया.. बाकी कौन करेगा मुझसे शादी..wat abt u? (खरंच माहित नाही लग्न अजुन का नाही केलं ते.. तुझंही नको झालं असु दे..प्लीज)

तो: बस क्या? तु मला सोड्लं न की मी तुला! और यार, कोणी तुझ्यासारखं मिळेल तर मी विचार करेल ना!

ती: हा.. वोह भी तो है! (करेल नाही करेन... अजुनही इतकी वाईट मराठी?)

तो: hmm ( माझं ग्रामर करेक्ट नाही केलंस.. "क-रे-न” )

ती: तो चलो.. हम दोनो शादी करले? (हो म्हण हा.. मी सिरिअसली विचारत्ये)

तो: क्यु नही? करुया ना! hehehe (i am serious, हसु नको ना गं)

ती: चला as usual मजाक मजाकमधे तरी हो म्हणालास! (खरंखुरं ’हो’ म्हणाला असतास तर...)

तो: तेरा contact number दे ना!.. रुक यहा इस bookमे i need ur comment... म्हणजे मला कळेल ना.. dumbosना किती कळतं माझ्या चित्रातलं! hehehe...

ती: जरुर boss

" i know मुला-मुलीमध्ये फक्त प्रेमाचचं नातं असायला पाहिजे असं नाही... फक्त मैत्रीला प्रेमाचं नाव देणं चुकचं रे! पण म्हणुन असलेलं प्रेम ही निव्वळ मैत्री आहे असं समजणं हा गुन्हा आहे! all the best for future! U will पक्का get someone like me.. ह्यावेळि तिला जाऊ देवु नको"

-------

अजुन पुढे गोष्ट रंगवायची होती मला.. पण ती म्हणाली.. "बाईसाहेब.. खुप जास्त hopes ठेवता तुम्ही.. आता जरा अभ्यास करुया का? स्वप्नरंजन नंतर करा!"

मला माझ्यातल्या तिचा अश्यावेळेला राग येतो!

Monday, January 28, 2008

भन्नाट!

मला बाकी कोणतेच शब्द सापडत नाहियेत!

३ वर्ष mass media शिकुन, त्यातलं १ वर्ष जाहिरात-शास्त्र शिकुन, आत्ताही त्यात masters करताना अश्या भन्नाट गोष्टी मी नाही बनवु शकत! gr8 आहे!


ह्याला PSA म्हणु शकता! आमच्या गावात rather आमच्या खेड्यात ग्रामपंचायतीकडुन हे रंगवुन घेतलेलं आहे!

हे गावच्या प्राथमिक शाळेच्या भिंतीवरचं चित्र आणि "संदेश" आहे!


मी कितितरी दिवस हा फोटु माझ्या orkut album मधे लावला होता... तेव्हा खरं तरं मज्जा म्हणुन पण आता मी मजेत म्हणत नाहीये.. पण खरचं मला हे खुप आवड्लं आहे! खेड्यांमधे जिथे मुलीची ४थी झाली की लग्नाची बोलणी सुरु होतात, "गाव कि भोली-भाली छोरी" म्हणुन गैरफायदा घेणारे अनेक लोक तिच्या आजुबाजुला असतात, तिथे जेन्व्हा रोज सकाळ-दुपार मुलगी हे वाचते, नक्किच ह्याचा परिणाम तिच्यावर होणारच! कदाचित आपल्याला हे खुप साधे-सुधे, वरवरचे शब्द वाटतात, अनेक जण ह्याला हसतीलहि पण थोडावेळ विचार करुन पाहिलं तर खरचं हे माझ्या मनाला कुठेतरी स्पर्शून जातयं! फक्त खेडेगावच कशाला ना? शहरातसुद्धा जर मुलिंनी (आणि शब्द पुल्लिंगी करुन मुलांनी) हे साधे शब्द डोक्यात ठेवले तरी life will be much more better! वाया जाणारी youth power वगैरे म्हणुन बाकी लोक हिणवतात तसं नक्किच होणार नाही.... हा, राव पण जर तुम्हाला सगळ्या युवा वर्गाने हा मंत्र आचरणात आणावा असं वाटत असेल तर ह्याचं ३ कडव्यांचं गाणं बनवा, आणि रेहेमान किंवा शंकर-अहेसान-लॉयला संगीत द्यायला सांगा! huh!!


मला वाटलं नव्ह्तं मी त्या भित्तीचित्रावर इतकं लिहिन म्हणुन! :)


next one though not much inspiring to me ;) , मला आवडलं..कदाचित because of its simplicity!! :)


Thursday, January 24, 2008

अनामिक ब्लॉगर :D

लई झालं बघा आता क्ष ताई...
yukk, oh god.. माझ्यासारखी मुलगी जी गणितामधेही कोणत्या आकड्याला "क्ष" म्हणताना हळहळायची...(म्हणजे काय उठसुट कोणताही आकडा "क्ष" काय?, तुम्ही ०.९ ला सुद्धा "क्ष" मानता आणि ९,९९,९९९ला सुद्धा! हे म्हणजे अति नाही का होत?)

आणि आज ती स्वतःला क्ष म्हणत्ये! विचार करा काय मानसिक अवस्था असेल माझी!

आणि हे सगळं का? का? तर फक्त एकदा...फक्त एक्दाच एक अनामिक ब्लॉगर म्हणुन नावारुपाला(?) यायचयं...
(मी स्वत:ला फिल्मसिटीच्या देवळात घंटा पकडुन उभी आहे, वारा आहे, पाला पाचोळा उडतोय...घंटा हलताय्त...असं इमॅजिन करुन पाहिलं...हे वाक्य जास्त प्रभावी वाटतं...)
छे!! पण कदाचित नियतीला ते मंजुर नसावं, जे मला हवं ते सुख मला मिळालचं नाही
( अलका कुबल..आई गं...)

खरंतरं हा अनामिक प्रवास खडतर होण्यामागे काही कारणं आहेत!

१) माझ्या आधीच्या ब्लॉगचा वाचकवर्ग : त्यांनी मला भरपुर प्रेम दिलं, भरभरुन कौतुक केलं... खरतरं माझी स्तुती करुन घेण्याची वाईट सवय त्यांनीच लावली...आणि खरंतरं ते मला इतकं miss करायला लागले म्हणुन सांगू, मग ब्लॉग परत लिहिणं सुरु केलं, पण त्यांना कसं कळणार मी परत आल्ये ते... म्हणुनचं काही जणांना माझ्या ह्या ब्लॉगविषयी सांगावं लागलं...
(ओये, आधिच्या वाचकांनो ज्यांना माहित्ये मी कोण आहे.. त्यांनी तोंड मिटा! मला माहित्ये मी जरा वाढवुन-चढवुन सांगत्ये.. पण मला जरा स्वतंविषयी चांगलं बोलु दे की)

२) Addicted to comments : अगदी भरपुर comments येत नसल्या तरी येत होत्या राव... अगदी 0 comments बघणं म्हणजे काय? कोणत्याही मुरलेल्या ब्लॉगरला विचारा शुन्य commentsचं दुखणं काय असतं ते! हां आता ज्यांना already भरपुर प्रतिक्रिया येतात ते माज करु शकतात.. "की मी प्रतिक्रियांसाठी लिहित नाही तर स्वतःसाठी लिहिते"... तर अनामिक झाल्यापासुन तो problem व्हायला लागला ना! माझीपण काहि "हे आपली" आहे कि नाही?

३) माझी लिहिण्याची पद्धत : काल माझ्या एका मित्राने सांगितलं कि मी लिहिते त्याचे विषय, त्याची शैली लोकांना माहित झाली आहे... त्यामुळे मी (आम्ही) कोण हे कोणालाही कळु शकेल! (कोण ह्या शब्दाआधी फक्त आम्ही हाच शब्द शोभुन दिसतो.. म्हणुन कंसात आम्ही लिहिलयं, नाही तर नको ते गैरसमज व्हायचे).

४) माझ्या महान मैत्रिणी आणि मित्र : काही जणांना ना दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही... (हाय रे दैवा!..उसासा) मी तुला ओळखतो हे सांगायचं, commentsमधे नाव लिहुन पुढे प्रतिक्रिया द्यायची! simply महान :)...

कुठे ट्युलिप, सर्किट, संवादिनी, सिमी..(ह्यातल्या सिमीलाच ओळखते).. अजुन काही नविन छान ब्लॉग वाचले गेल्याकाही दिवसात.. जे अत्यंत सक्सेसफुली आपली identity disclose न करता ब्लॉग लिहितात.. आणि कुठे मी जिची आठवड्याभरात ही अवस्था झालीये! :।

बघु आता ह्या पामर अनामिकेचं rather जास्वंदीनामिकेचं काय होतं ते!

मी काय जास्त खोटं बोलले नाहिये वरति पण माझी खुर्ची अचानक दोन बोटं खाली झाल्यासारखी वाटत्ये... जमिनीला लागेल हो नाहीतर आता...

Wednesday, January 23, 2008

ये कि आता...

खुप सही वाट्तयं, एकदम मस्त वाट्तयं...
खुप हल्कं, अचानक धुंद वाटायला लागलं आहे...
आकाश, जमिन, सगळया वातावरणात एक अनोखी नशा भरल्ये!
(नाही मी काही दारु वगैरे घेतली नाहिये.. पण खरचं असं होतं आहे)
पण तु इथे का नाहीयेस? ये कि रं इथे... हे सगळं संपायच्या आधी ये ना!!

मी स्वप्नांमधे, तुझ्यामध्ये हरवुन जात्ये!
असं का होतयं?
माझ्या इच्छा, माझी स्वप्नं तारा बनुन तुटुन जातायतं!
असं का होतयं?
मला माहित्ये उद्या तु माझ्या बरोबर असणारेस...
पण मी आज हे जे अनुभवत्ये, ते उद्या असेलचं असं नाही ना रे!!
म्हणुन हे सगळे छान-छान क्षण संपुन जायच्या आधी ये ना!

एकदा आग लागल्यावर, येणार्या वार्याबरोबर ती वाढतच जाते ना...
तुझ्या आठवणींमधे माझं तसचं होतयं रे!
आता स्वतःला खुप जपुन ठेवलं, आता मन out-of-control जातयं...
तुझीच जादु आहे सगळी...
तु दिलेल्या आनंदाचं दाट धुकं पसरायला लागलं आहे, मला आता माझ्या
स्वतःच्या वाटा सापडेनाश्या झाल्यात!
मला तुचं आता हात धरुन ह्यातुन बाहेर काढु शकतोस...
मी हरवुन जायच्या आत ये की रे!
ही नशा उतरुन जायच्या आधी ये!
वाट बघत्ये रे hero!!
आता ये कि रे!

Sunday, January 20, 2008

My Fair Lady...

काल कॉलेजमधे कंटाळा आला होता, आम्ही फक्त ४ जणी "हजर" होतो... मग करायचं काय? म्हणुन लायब्ररीमधुन फिल्म आणली.

खरं तरं लायब्ररीत गेल्यावर खेळण्यांच्या दुकानात लहान मुलांचं जसं होतं ते माझं होतं... मला सगळं काही हवं असतं, एक काही हातात घेतलं कि शेल्फ मधलं दुसरं दुष्ट पुस्तक किंवा vhs, cd, कॅसेट जे काही असेल ते खुणावायला लागतं, मग हातातलं सोडवत नाही आणि sollidd cofuse व्हायला होतं हो!

काल पण तसचं झालं, मी हातात ३-४ vhs घेउन उभी होते, पण ठरवता येत नव्हतं... मग मैत्रिण म्हणाली "मला ह्या सगळ्यांबद्द्ल सांग, मी ठरवते काय बघायचं ते!"
हातातली my fair ladyची vhs घेउन म्ह्टंल, ’ती फुलराणी’ ह्यावरुन लिहिलयं पुलंनी...तिने पुढचं काही ऐकलचं नाही.. "wow, चल चल हेच बघुया" म्हणुन मी मुकट्याने हातातल्या बाकींना नाईलाजाने टाटा केला!

पण मला त्याचा मुळि म्हणजे मुळीच पश्चाताप होत नाहीये...
बेस्ट म्हणजे बेस्ट फिल्म आहे!
पण तरीही ती फुलराणी आधी बघितल्यामुळे, एलिझाचं just you wait आणि ती फुलराणीचं ’तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्यांची comparison झालीच.. मला कोणत्याही conclusionवर यायचं नाहिये... कोणतं जास्त चांगलं हे ठरवणारी मी कोणिही नाही हे मला महित्ये... फक्त दोन्ही एक्द एकत्र नक्कि बघा/वाचा/ऐका!

Just you wait, 'enry 'iggins,
just you wait!
You'll be sorry, but your tears'll be to late!
You'll be broke, and I'll have money;
Will I help you? Don't be funny!
Just you wait,
'enry 'iggins, just you wait!
Just you wait, 'enry 'iggins,
till you're sick,
And you scream to fetch a doctor double-quick.
I'll be off a second later And go straight to the the-ater!
Oh ho ho, 'enry 'iggins, just you wait!
Ooooooh 'enry 'iggins!
Just you wait until we're swimmin' in the sea!
Ooooooh 'enry 'iggins!
And you get a cramp a little ways from me!
When you yell you're going to drown
I'll get dressedand go to town!
Oh ho ho, 'enry 'iggins!
Oh ho ho, 'enry 'iggins! Just you wait!
One day I'll be famous!
I'll be proper and prim;
Go to St. James so often I will call it St. Jim!
One evening the king will say:
'Oh, Liza, old thing,I want all of England your praises to sing.
Next week on the twentieth of MayI proclaim Liza Doolittle Day!
All the people will celebrate the glory of you
And whatever you wish and want I gladly will do.
''Thanks a lot, King' says I, in a manner well-bred;
But all I want is 'enry 'iggins 'ead!
''Done,' says the King with a stroke.
'Guard, run and bring in the bloke!'
Then they'll march you,
'enry 'iggins to the wall;
And the King will tell me:
'Liza, sound the call.'
As they lift their rifles higher,
I'll shout:'Ready! Aim! Fire!
'Oh ho ho, 'enry 'iggins,
Down you'll go,
'enry 'iggins!
Just you wait!

तुला शिकवीन चांगलाच धडा! (मला type करायचा कंटाळा आला, आणि netवर्ही सापडेना...)