नाही लिहिलं खूप खूप दिवसात... Writer's Blockला मी कायम हसत आल्ये.. असं काही अस्तित्वात नसतं हे माझं मत होतं/आहे. sometimes you are just not yourself! मला एक मित्र म्हणाला होता "लग्नानंतर तू कसं लिहितेस बघुया"... लग्नानंतर काही विशेष फरक पडेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं... मी अधिक आळशी बनेन हे तर अजिबातच वाटलं नव्हतं. आता लिहायचं ठरवलं आहे पण मी.. जानेवारी सुरु होय्च्या आधीचं resolution वगैरे...
बरेच दिवस पाण्याची टाकी वापरात नसेल आणि मग अचानक वापरात आली कि सुरुवातीचं पाणी कसं गढूळ येतं. (ह्या analogy इतकं गढूळ ) तसं होऊ शकतं blogचं.. भंपक पोस्ट पाडू शकते मी ह्या ब्लॉगवर! त्या तश्या नेहमीच टाकत आल्ये...
----
देवयानी खोब्रागडे बद्दल मिडीया कोंबड्यांना दाणे टाकावं तश्या बातम्या उधळतायत फक्त... इतक्या इतक्या बातम्या, लेख वगैरे आलेत गेल्या आठवड्यात ह्या विषयावर की नक्की आपण काय stand घ्यावा कळलंच नाहीये मला अजून.. बरेच प्रश्नच पडतात फक्त
१. माझा काही stand असायलाच हवा का?
२. जर तिने ठरल्याप्रमाणे पगार दिला असता तर तिच्या मोलकरणीला माझ्या नवर्यापेक्षा जास्त पगार असता का? (बिचारे IT वाले.)
३. भारतातल्या तिच्या गडगंज वगैरे मालमत्तेचा अमेरिकेतल्या वागणुकीशी काय संबंध?
४. "काहीतरी हेरगिरीचा मामला असायला हवा" FBवर इतकी मौक्तिके उधळणारा माझा विद्यार्थी परीक्षेत पेपर कोरा का ठेवायचा?
५. 'मौक्तिकं' किती वेगळाच शब्द आहे न?
----
गेले काही दिवस मला "आठवणीतल्या कविता" वाचायचं आहे. लहान असताना मला विशेष नाही आवडायचा तो पुस्तकांचा सेट.. कारण अर्थात बर्याच कविता कळायच्याच नाहीत. आता जितक्या आठवतायत अर्धवट, त्या मात्र पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटत आहेत. भारतातून मागवावं लागणार पुस्तक असं दिसतंय!
----
मध्यंतरी मी मुराकामीचं एक पुस्तक वाचत होते. मला का कोण जाणे बरेच दिवस मुराकामी बाई आहे कि पुरुष माहित नव्हतं. (म्हणजे मला मुराकामी बाई वाटत होती ) आतासारखं आधी काहीही नवीन ऐकलं कि गुगल करुन बघायचं वेड लागलं नव्हतं तेव्हा.. त्यामुळे बरेच दिवस मुराकामी म्हंटलं की बॉब कट मधली जपानी बाई माझ्या डोळ्यासमोर यायची... लिहिणारा, गोष्ट सांगणारा पुरुष आहे कि बाई ह्यावरूनही काहीवेळा गोष्टीत उगाच फरक पडत असतो.
आता काही प्रश्न पडला, काही अडलं, काही आठवत नसलं.. गुगल हाताच्या बोटांवर असतं , लगेच उत्तर देत असतं.. याहू आन्सर्स वर जगातले कुठलेही प्रश्न असतात.. अगदी कुठलेही... म्हणजे काहीच्या काही कुठलेही.. "असा कोणता प्रश्न आहे का जो याहूवर नाही विचारलाय?" हा पण प्रश्न आहे याहूवर...
तर anyway, माणसाला डोक्यासाठी curiosity असणं खूप गरजेचं आहे.. आणि अनेकदा गुगलला इतका सोप्पा access असणं ती curiosity नुसती शमवत नसतो तर मारत असतो... कारण उत्सुकते इतकीच महत्वाची असते कल्पकता, सर्जनशीलता... एखादं उत्तर माहित नसताना आपण ते शोधायचा प्रयत्न करणं.. ते बनवायचा प्रयत्न करणं, आठवणं (creativityला मराठीत काय म्हणतात ते गुगल केलं मी आत्ता) ... मी मुराकामीला जपानी बॉब कट मधल्या बाईचा चेहरा दिला होता... एका जपानी आज्जीने सांगितलेल्या गोष्टी म्हणून मी मुराकामीची पुस्तकं वाचत होते.. आणि (उगाचच असेल) मला तेंव्हा जास्त आवडल्या होत्या त्या गोष्टी!
-----
हे वर्ष मस्त होतं... पुढचं वर्ष अजून मस्त असू दे.. २०१४ साठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा... (तुम्हाला दोघांनाही...)
Sunday, December 22, 2013
Tuesday, July 23, 2013
पेपर क्रेन
कागज़ के दो पंख लेके, उड़ा चला जाए रे
जहाँ नहीं जाना था ये, वहीँ चला हाय रे
उमर का ये ताना-बाना समझ ना पाए रे
के देखे ना, भाले ना, जाने ना दाये रे
दिशा हारा ,कैमोन बोका, मोन्टा रे!
पायाशी एक मांजर दुपारचं जेवण जास्त झाल्यासारखी सुस्त बसलेली... बाजूच्या टेबलावरचा पंखा आणि खिडकीतून येणारा वारा एकमेकांत मिसळून कमी-जास्त होणारा... आणि त्या वार्यापासून कागद वाचवत ओरीगामिचे पेपर क्रेन करत बसलेली आज्जी...
एका उंच भिंतीला लागून बराच मोठा पेपर क्रेन्सचा ढीग... भिंतीपलीकडच्या एका लहानश्या खोलीतला लांब दाढीवाला माणूस रोज अशी डझनभर क्रेन्स टाकत असतो खिडकीतून बाहेर... तुरुंगातले शेवटचे दिवस मोजत... निदान हे पक्षी तरी उडतील ह्या आशेने...
Vanity Vanमध्ये बसलेला तो करोडो रुपये आणि करोडो हृदयांशी कायम खेळणारा... एक पेपर क्रेन जमत नाही म्हणून वैतागलेला..युट्यूब वरून व्हिडीओ बघत पेपर क्रेन करत बसलेला... दाराबाहेर त्यांचे पंटर त्याची वाट बघत उभे..
कोणालातरी impress करायला ओरिगामी शिकतोय म्हणे... as if his charm is not enough...
कपाळावरची बट मागे सारत मिस डूला वर्गात येते... गोंधळ घालणारी मुलं शांत होत क्राफ्टचा गृहपाठ बाहेर काढतात... लहान मोठे, निळे पिवळे , कच्चे पक्के पेपर क्रेन सगळ्या बेंचवर पसरलेले... एक बेंच मात्र रिकामा, रडवेला... मिस डूला त्या बेंचजवळ येणार इतक्यात दारातून त्याचा आवाज... "मिस डूला... पेपर क्रेन.." वर्गातली सगळी मुलं त्या करोडो रुपये अन हृद्यांशी खेळणाऱ्या माणसाला बघून हरखून जातात... मिस डूलाचे गालही गुलाबी होतात..."her homework... shes my niece...she left it in my car"... रिकाम्या बेंचवरची मुलगी हसायला लागते.
जॉब इंटरव्ह्यू साठी कंपन्यांचे उंबरठे घासत फिरणारा... आता रोजच्या इस्त्रीलाही पैसे द्यायला परवडत नाहीत म्हणून चुरगळलेला शर्ट टाईट इन केलेला... रोज दुपारी बागेत येऊन बसतो आईने दिलेला डबा खायला... डबा संपल्यावर रिजेक्शन लेटरचं पेपर क्रेन होतं त्याच्या... दिवसातला एकमेव आनंद देणारा क्षण त्याचा...
अनेकदा पहाट मावळत आली की घरी पोचत असतो दमून... केस, कपडे आणि चालणं सगळंच विस्कटलेलं... झोपायच्या आधी थरथरत्या हातांनी लहानसं पेपर क्रेन करून टाकतो एका काचेच्या बरणीत... 'सेक्स-जार' त्याचा... आज ही बरणी भरल्यावर तीही जाईल कपाटातल्या बाकी ९ बरण्याना सोबत करायला...
लहानपणापासून वाचलेली , तिची आवडती राजकन्येची गोष्ट... "राक्षस तिला पळवून नेतो तेव्हा तिच्या हारातले मोती टाकत जाते ती वाटेत... त्या मोत्यांचा माग काढत राजपुत्र शोधून काढतोच तिला... " आज कांचनजंगेच्या बेस केम्पहून वर चढायला लागल्यावर ती तिच्या पोलादी हातांनी नाजूक पेपर क्रेन सांडत गेली थोडथोड्या अंतरावर... पांढर्याशुभ्र बर्फावर लहानसे लाल क्रेन...
पोस्टातून निवृत्त झाल्यावर काहीच काम उरलं नाही... ते आता रोज सकाळी उठून पेपर क्रेन करतात आणि अनोळखी पत्त्यांवर पाठवत बसतात...
"कागदाची टोकचं मुळात जुळत नसतील तर पुढे क्रेन होणारच कसा?... घड्या नको तेव्हा उलगडणार नाहीत ह्याची काळजी सुरुवातीलाच घ्यावी लागते... चुकीची घडी पक्की बसली तर त्याच्या खुणा कायम राहतात कागदावर..." फावल्या वेळातल्या विवाह समुपदेशनात हल्ली त्यांना फावल्या वेळेतल्या "ओरिगामी एक छंद "चा उपयोग होतो...
बाईच्या जातीला राग शोभत नाही हे लहानपणापासून तिच्या मनावर बिंबवलेल... तिने तिची anger management शोधून काढली आहे... तिच्या डेस्कवर, ओट्यावर, बेडवर , गाडीत, पर्समध्ये पेपर क्रेन पसरलेले असतात...
६ तासांच्या प्रवासात, पहिले २ झोपेत, दुसरे २ नजरानजरेत .. नंतरचे २ लाजून हसण्यात आणि आधी कोणी बोलावं हा विचार करण्यात गेल्यावर ... ट्रेनमधल्या समोरच्या खिडकीतल्या तिचं स्टेशन येतं. तिला सामान उतरवायला मदत करून तो स्वतःला शिव्या देत जागेवर येऊन बसतो आणि तिच्या सीटवर एक दहा आकडी नंबर लिहिलेलं पेपर क्रेन दिसतं...
पेपर क्रेनचा टाटू केल्यावर artistने विचारलं "why not a real crane? some real bird? why paper crane?"... "I dont believe in what nature creates...its seldom perfect" ...लंगडतच ती दुकानातून बाहेर पडते...
टेक ऑफ घेताना तो डोळे घट्ट मिटून घेतो आणि हातांनी कागदाच्या घड्या घालत पेपर क्रेन करतो... अगदी पहिल्यांदा आज्जीने शिकवल्यासारखं.... आज्जीच्या केसांसारख्या पांढर्याशुभ्र ढगांमध्ये विमान पोचल्यावर ते क्रेन तो खिडकीत ठेवतो.. मनातल्या मनात आता आकाशात असणारी आज्जी शोधतो... गेली ४० वर्षं तो विमानातून असाच प्रवास करतो...
भांडण झाल्यावर एकमेकांशी बोलणं सोडलं आहे त्यांनी आता... एकमेकांची खुशाली कळवायला एक कपकेक आणि त्यावर पेपर क्रेन ठेवतात एकमेकांच्या दारासमोर अधूनमधून...
Pintrestवर बघून केलेलं..
.बेसनाने बरबटलेल..
.पावसात भिजलेलं...
शेवटचे श्वास घेणारं...
हातात चुरगळलेलं...
वाऱ्यावर उडणार.
.हजार वर्ष जगणारं...
इंस्ताग्रामवरचं ठिकठीकाणी फिरलेलं...
Spacestationमध्ये करेननी केलेलं....
जुनं, नवीन, क्रिस्प, सैल, लकी, अनलकी...
.१..१०..१००..५००... १००० पेपर क्रेन

Monday, June 10, 2013
वरच्या मजल्यावरची ती...
"आणि माझ्यानंतर?" वर्षाने हातातला पेपर खाली ठेवत विचारलं...
"वरच्या मजल्यावरच्या तिला" अभिने उत्तर दिलं...
"काय्य?" वर्षाने जरा जोरातच विचारलं...
शेजारी उभ्या असणार्या नर्सने डोळे वटारून तिच्याकडे पाहिलं... नर्सनी अभिला एका छोट्या डबीतून रंगीबेरंगी लहान मोठ्या ५-६ गोळ्या भरवल्या. पाणी भरून ग्लास तिने तयार ठेवलेलाच होता.
"वशे ह्या बयेला विचार कधी थांबवणारे हि हा अत्याचार?"
वर्षा नर्सकडे बघून कसनुसं हसली..
"Is he talking about me?"
"Oh.. nothing.. he is just kidding..." ती नर्सकडे बघत म्हणाली आणि परत अभिकडे मोर्चा वळवला "you are kidding right?? वरची बाई?? कुठली वरची बाई? आणि ती कुठे आली मधून? "
नर्स मधेच अभिला म्हणाली.. "whatever it is...you better be kidding man... because right now, your wife looks pretty angry to me"
वर्षा परत खोटं खोटं हसत नर्सला म्हणाली.. "oh no..he is just being his ass self as usual"
"naughty you..." म्हणत नर्सने अभिला एक चापटी मारली आणि खोलीबाहेर पडली...
अभि हसायला लागला "त्या बयेला खूपच आवडतेस तू , आणि तुही किती नाटकी बोलतेस तिच्याशी"
"हसू नकोस.. नाटकंही नको करूस आता... कोण वरची ती? काय बोलतोयस तू?"
हॉस्पिटलच्या कोपर्यातल्या स्पेशल रूममध्ये अभि बेडवर पडलेला होता... सगळी खोली सुतकी पांढरी दिसत होती फक्त वर्षांनी आणलेली लाल भडक गुलाबाची फुलं खोलीतली monotony मोडत होती. वर्षा बेडजवळच्या खुर्चीत पोक काढून, पाय बेडवर अभिच्या पायाला लावून बसलेली होती. खरं तर तिला अभिचं उत्तर ऐकून राग आला होता पण ती इतकी दमलेली होती कि ताठ बसून भांडायचीही शक्ती नव्हती तिच्यात...
"आपल्या घराच्या वरच्या घरी राहते ती..." अभि बोलायला लागला..
"नाव काय आहे तिचं? आणि ती का?" वर्षांनी परत विचारलं...
"बाई, बोलू देशील का मला?? सांगतोय ना... तिचं नक्की नाव नाही माहित मला... थांब आता मध्ये काही बोलू नकोस, ऐक फक्त... खूप टोमणे सुचत असणारेत तुला ठाउके मला.. पण ऐक फक्त आत्ता.. "
वर्षा काही न बोलता नुसती बसून राहिली..
"अगं वेडाबाई... खरंच नाही ठाऊक मला तिचं खरं नाव, तिचा नवरा तिला मिष्टी म्हणतो कधीतरी.. परवा एकदा राशोगुल्ला म्हणाला होता... म्हणजे नक्कीच भारतीय आहेत ते.. आणि बंगालीच जास्त करून.. "
"तू त्यांचं बोलणं ऐकतोस? "
"नाही राव.. ते बाल्कनीत बोलत असले तर येतं अंधुकस काहीबाही ऐकू.. मी कशाला मुद्दाम ऐकू?"
"पण तरी अभि... "
"श्श... थांब बोलू दे...कदाचित creepy वाटेल तुला जरा..पण तरी ऐक.. सकाळी आपल्या आधीच उठते ती.. आपल्या बेडरूमच्या खिडकीवर त्यांची बाल्कनी येते, तिथे उभी राहून गुणगुणत असते, मला वाटतं झाडांना पाणी घालत असते ... मोगऱ्यासारखं झाड आहे एक त्यांच्याकडे... मधूनच कधीतरी सुंदर वास येत असतो त्या फुलांचा... अंघोळ झाल्यावर smoke detectorsना चुकवून कधीतरी चंदनाची उदबत्ती लावते ती बाल्कनीत... तेव्हाही मस्त वाटतं...
सकाळी सकाळी कुकर लावते मग ती , तू ३ शिट्ट्या करतेस ना? ती ५ करते... आणि जवळजवळ रोज नॉनव्हेज असतंच... एक विशिष्ट वास येतो ना रोज नॉनव्हेज खाणार्यांच्या घरात तसा वास येतो त्यांच्याकडून, आपल्या किचनच्या बाल्कनीत उभं राहिल्यावर... खूप पळापळ चालू असते सकाळी तिची, तू इथे कामावर जायच्या तयारीत असतेस तेव्हा ती वर नवर्याला आणि मुलाला शाळा-ऑफिसात पाठवायच्या तयारीत असते.. मला वाटतं मुलाला सोडायला जाते ती शाळेत , कारण १० वाजेपर्यंत काहीच आवाज नाही येत त्यांच्याकडून.. तू ९:३० निघाल्यावर मी नुसता पडलेला असतो बराचवेळ , ती घरी आल्यावर बसतो मग ... मी मध्ये म्हणत होती ना, तुला चांदीचे पैजण घेऊया... ती घालते.. हलकासा आवाज येतो अधूनमधून.. गोड वाटतो खूप.. २ आठवड्यांपूर्वी एक पैजण तुटलं असावं तिचं, कारण हल्ली एकाच पायात असतं पैजण तिच्या.. हे माझं मानसिक असेल, पण ती एकटी असताना जास्त हलकी पडतात पावलं तिची.. मोकळी खूप.. कधीमधी नाचतेसुद्धा ती जरासं... काहीवेळा दुपारी मोठ्याने गाणी लावते...
११:३०-१२ ला अंघोळीला जाते ती.. "
"अभि? हे अति होतंय.."
"ऐक.. मला आवाज येतो , इथली अपार्टमेंटच तशी आहेत वशा...पाण्याचा आवाज येतो, खुपवेळ चालू असते अंघोळ तिची... तासभर वगैरे आरामात..."
"मग तू जातोस का तिला टॉवेल द्यायला?"
अभि हसून म्हणाला "वर्ष्या... ऐक ना... नाही जात मी , मी नाही भेटलोय अजून कधीच तिला...तिचा आवाज ऐकलाय फक्त..सोमवारी ती डिशवाशर लावते.. बुधवारी आख्खं घर vacuum clean करते...शनिवार-रविवार बर्याचदा बाहेरच असतात ते लोक.. तिचा मुलगा घरी आला ना कि प्रचंड धावपळ चालू असते त्या दोघांची.. मुलगा आणि त्याच्या मागे ती.. संध्याकाळी परत स्वयपाकघरात फिरत असतात पावलं तिची बराचवेळ.. परत ५ शिट्ट्या...मला माहित नाही रात्री आवाज का नाही करत ते जास्त बेडरूममध्ये , ते काही करतच नाहीत कि मोजूनमापून करतात ठाऊक नाही.. पण नाही ऐकले तसे आवाज कधीच..
आठवतं आपण इथे राहायला आल्यावर किती वैतागलो होतो तेव्हाच्या वर राहणाऱ्या चायनीज कुटुंबाला.. सारखे धावपळ करायचे, सामानाची हलवाहालव आणि त्यांचा आवाजी सेक्स... ते गेल्यापासून खूपच शांत वाटायला लागलं होतं मला... ही लोकं राहायला आल्यापासून चांगलं वाटतं आहे आणि जास्त आवाजही करत नाहीत..पण मला चाहूल लागते हल्ली, सवय झाल्ये कानांना अंदाज घ्यायची..
वर्षा.. त्या Accident नंतर, माझं हे असं झाल्यापासून तू दिवस-रात्र एक करून काम करत्येस, ऑपरेशनसाठी इतके पैसे उभं करणं कठीण आहे हे कळून-सवरूनही वेड्यासारखी राबतेस माझ्यासाठी दिवसभर, आणि रात्री येऊन रडतेस , मला वेळ देऊ शकत नाहीस म्हणून वेड्या... पण तू नसताना नकळत हि वरची बाई सोबत करते मला... आधार होता मला तिच्या आवाजाचा... तिला माहितीही नसेल मी असतो खाली तिचा आवाज ऐकत...
तू विचारत होतीस ना,उद्या डॉक्टरांनी डोळ्यावरची पट्टी काढल्यावर , दिसायला लागल्यावर सर्वात आधी कोणाला पाहायचं?
तू पहिली.. कारण सगळं ठाऊक असूनही तू माझ्या सोबत राहिलीस..
वरच्या मजल्यावरची ती दुसरी... कारण काहीच ठाऊक नसून तिनी माझी सोबत कधीच सोडली नाही..

Saturday, March 23, 2013
आमच्या लग्नाची गोष्ट...
लग्न झालं आमचं... आणि मग लोकं हजार प्रश्न विचारायला लागले...का? कसं? कुठे? कधी? वगैरे वगैरे... म्हंटलं एकदा लिहून टाकूयात आपली गोष्ट...
तर ही गोष्ट सुरु होते इसवी सन १९८४मध्ये... अहमदनगरच्या एका वाघमारे कुटुंबात एक Hazel eyes चा मुलगा जन्माला आला... लाडकं शेंडेफळ बनला... अतिशय हुशार वगैरे झाला .. पुढे जाऊन तो आपला हिरो होणारे.. तो २ वर्षाचा झाला तेव्हा रत्नागिरीच्या लेलेंना एक नात झाली... टपोर्या डोळ्यांची... अत्यंत सामान्य बुद्धीची वगैरे... पुढे जाऊन ती आपली हिरोईन आहे...
गोष्ट तेव्हा सुरु झालेली असली तरी मुळात ही दोघं भेटली एकमेकांना इसवी सन २०१० मध्ये... भेटली म्हणजे वाचलं एकमेकांनी लिहिलेलं... आपली हिरोईन इथेच, ह्याच ब्लॉगवर लिहायची काहीबाही.. आणि हिरोही ब्लॉग लिहित होता मस्तपैकी... इथून तिथून कुठूनतरी ती त्याच्या ब्लॉगवर पोचली... तिने त्याचा ब्लॉग वाचला आणि तिला तो जाम आवडला... तिने कमेंट केली.. तिची कमेंट वाचून तो तिच्या ब्लॉगवर आला आणि मग त्याला ती आवडली... so ही त्यांची पहिली भेट... मग ते लिखाणातून, कमेंट्समधून भेटत गेले.. मग असंच एकदा त्याचं खरं नाव कळल्यावर तिने त्याला मेल केला आणि त्याने तिला रिप्लाय दिला.. मग ते बोलायला लागले मेल्समधून... chat करायला लागल्यावर माणसं उथळ बडबडायला लागतात हे दोघांनाही माहित होतं.. दोघंही बोलणं टाळत होते... मग ओळखी निघत गेल्या... "ओह ती तर माझी मैत्रीण आहे.." "अर्रे तो तर माझा मित्र आहे".. मग ह्या ओळखींमधून एकमेकांबद्दल अजून माहिती कळायला लागली...
मधेच एकदा त्याने विचारलं "भेटायचं का?" ती म्हणाली "अर्थातच... नाही"... सगळं छान सुरु असताना भेटून वगैरे आहे ते बिघडवायचं नव्हतं तीला... भेट पुढे जात राहिली, पण मधल्या वेळेत वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क चालू होताच... त्याने तिला तार करून फोन नंबर कळवला.. तिने निळ्या पत्रावर प्राजक्त आणि जास्वंदीच्या गोष्टी त्याला लिहून पाठवल्या... त्याने तिला एकदा २२ रुपयांची मनीऑर्डर पाठवली... तिने त्याला तिचा आवाज CDवर रेकॉर्ड करून पाठवला... मग एकदा तो एक काम घेऊन आला तिच्याकडे , एका शोर्ट फिल्मच्या स्क्रिप्टसाठी मग ते रात्र रात्र जागून चर्चा करायला लागले... ती फिल्म काही बनली नाही पण आपली ही फिल्म तिथे अजून रंगत गेली...त्याला पुण्यात बसून तिच्या ठाण्याच्या घराजवळच्या कुत्र्यांचे आवाजही पाठ झाले..
१५ ऑगस्टला ती आली पुण्यात, तिच्या मित्राच्या साखरपुड्याला... आपटे रोडवरच्या एका हॉलमध्ये ती येणार म्हणून तो उगाचच त्या रस्त्यावर २-३ चकरा मारून गेला...अचानक तिला काय वाटलं म्हणून तिने सहज sms केला त्याला "भेटायचं का?" तो म्हणाला "अर्थातच.. हो"... आणि १५ मिनटात ते दोघं एकमेकांसमोर उभे होते आपटे सभागृहाच्या गेटवर... काय बोलायचं कळत नव्हतं दोघांना... पण awkward pauses टाळायला काहीही बडबडत होते दोघं.. तिने तर "झाडांवर करण्यात येणारं lighting" या विषयावर ५ मिनटाचं भाषण वगैरे दिलं होतं.. मग आधी बाईक आणि नंतर गाडीतून थोडावेळ गप्पा मारत, शांत बसत, उगाचच हसत फिरल्यावर तो मधेच थांबून म्हणाला तिला "मला असं आयुष्यभर गप्पा मारायला आवडेल तुझ्याशी" ती त्यावर फक्त हसली...
"च्यायला हाच मुलगा आवडायचा होता?? त्याचं आडनाव काही वेगळं नसू शकलं असतं का? " आठवडाभर खूप विचार केला तिने... सगळं इतकं perfect दोघांमध्ये... मग जात कशाला मध्ये येते कडमडायला? पण त्याने विश्वास दिला तिला.. "सगळं होईल आपल्या मनासारखं".. मग त्याने तिला विचारलं आणि तिने "हो" म्हंटलं... आणि त्यानंतर आठवड्याभरातच तो गेला अमेरिकेत कामासाठी महिनाभर ... दुष्ट कुठला.. पण ही सुरुवात होती फक्त, पुढे २ वर्षात अश्या हजार परीक्षा दिल्या दोघांनी मिळून वेगवेगळ्या... तिच्या घरचे नाही म्हणाले, त्याच्या घरचे नाही म्हणाले... "तो केसाने गळा कापेल तुझा".. "ती येऊन घर फोडेल आपलं" वगैरे वगैरे काहीही ऐकून घ्यावं लागलं त्या दोघांना स्वतःच्याच घरी स्वतःच्याच प्रेमाबद्दल... तरीही दोघं लढत राहिली.. समजावत राहिली... वेळ मिळेल तसा एकमेकांना भेटत राहिली... मुंबई-पुणे एक्सप्रेसवे त्याच्या सवयीचा बनला... तिच्या मित्र-मैत्रींणींना तो आवडायला लागला... तो भागच बनला तिच्या ग्रुपचा...
घरी सतत टेन्शन, बोलणी, राग ह्या सगळ्यातून एकमेकांसोबत मिळणारे एकुणेक क्षण celebrate करत होती दोघं... अधूनमधून भांडतही होती दोघं.. भांडायला कारणं कुठे लागतात "साडी घालत नाहीत नेसतात", "भात खात नाहीत जेवतात" ही कारणंही कधी कधी तिसरं महायुद्ध घडवू शकतात... मग थोडावेळ अबोला धरल्यावर दोघं हसायला लागायची... "काहीही भांडतो ना आपण"... पण हे अबोले, ही भांडण अजून पक्कं करत होती त्यांच्यामध्ल नातं... घरच्यांच्या विनवण्या करून झाल्यावर ती मिळेल त्या देवाला नवस बोलत होती.. "जोडीने येऊ दर्शनाला पण आता लग्न होऊ दे आमचं"... कधी एकीकडचा विरोध मावळतोय अस्म वाटत असताना नवीन विरोध सुरु होत होता...
अशी २-अडीच वर्ष गेल्यावर दोघंही कंटाळली होती.. "पळून जाऊन वगैरे लग्न करायचं नाही" हा निश्चय विसरावा लागणार असं वाटत होतं... परत एकदा बोलणी सुरु केली.. तो तिच्याकडे गेला.. ती त्याच्याकडे गेली.. एकमेकांच्या आई-वडिलांना विश्वास देत होतो... त्याच्याकडे give up केलं आई-वडिलांनी.. पण तिच्याकडे ऐकायला अजूनही तयार नव्हतेच... त्यात त्याला आता वर्षभरासाठी अमेरिकेत पाठवायची त्याच्या कंपनीची तयारी सुरु झाली होती... मग आता स्वतःच्या आयुष्याची सूत्र स्वतः हाती घेणं भागच होतं..
बाकी घरांमध्ये आधी कुटुंब भेटतात, मग बोलणी होतात, मग तारीख आणि कार्यालय ठरतं... पण इथे आधी तारीख ठरली , १८ फेब्रुवारी... "तुम्ही येऊन लग्न करून देणार असाल तर अत्युत्तम.. नाहीतर आम्ही लग्न करतोय त्यादिवशी" कार्यालय ठरलं... पत्रिका छापल्या... आणि मग अचानक चक्र फिरावी तसं दोन्ही घरचे सरसावले लग्नासाठी... लग्नाला २ आठवडे असताना लग्नाची तयारी सुरु झाली.. लग्नाआधी ३ दिवस दोन्ही कुटुंब भेटली आणि बोलणी झाली... दोघांची कपडे आणि दागिने खरेदी आदल्या दिवशी संपली rather संपवली ... आणि मग जवळच्या काही माणसांच्या साक्षीने "आमचं" लग्न मस्तपैकी पार पडलं... २ वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्ष उतरलं.. आयुष्यभर गप्पा मारणारोत आम्ही.. :)
आणि आता "touchwood" सगळं सुरळीत चालू आहे.. नवर्यासोबत अमेरिकेत आल्ये... आई-बाबा, सासू-सासर्यांसोबत रोज स्काईपवर गप्पा होतायत... आता नवीन स्वप्नं बघतोय आम्ही दोघं मिळून...

आता ही गोष्ट कुठे खरी खरी सुरु होत्ये...
"Happily Ever after starts here..." :)
Sunday, January 13, 2013
जांभाचं झाड
“आपलं जांभाचं झाड गेलं” आईनी सांगितलं. मी नुसती बघत राहिले.. दीपिका रडायला लागली.. आईच्या डोळ्यांतही पाणी होतंच.. माझ्या आत काहीतरी हललं.. उगाचच स्वयपाकघरात जाऊन मी पाणी पिऊन आले.. “मावशीचा फोन आला होता आत्ता.. आपलं बाजूचं अंगण त्यांच्या हद्दीत येतं.. ते तिथे कुंपण घालणार आणि मग ती जमीन विकणार.. ते झाड त्यांच आहे आता”
अर्धी नारळा-पोफळीची वाडी ते विकणार हे माहित होतंच.. तेव्हाही वाईट वाटत होतंच.. पण आता जास्त त्रास व्हायला लागला.. बाजूचं अंगण म्हणजे कित्ती काय काय आहे तिथे माहित्ये का??
शेकत्याच्या शेंगांचं झाड, मधुनाशिनिचा वेल, कांचनचं झाड, तुळशीची कित्येक सदैव उगवणारी रोपं, मी लावलेलं तगरीचं झाड, कित्तीतरी जुनं जास्वंदाच झाड, दिपूचं लीम्बाचं झाड, केवडा, बिटकी आंबा, गुंजेचा वेल... आप्पांनी लावलेली, बाबांनी जगवलेली नारळ आणि सुपारीची झाडं, बांबूचं बन आणि माझं, दीपिकाचं, आईचं, बाबांचं, आप्पा-आजीचं, दादा-ताईचं, मावश्या-मामांच, इंदू आजीचं जांभाचं झाड..
सगळं बदलणार आता.. थळचं घर आता नेहमीसारखं नाही राहणार... घरा शेजारून आता अजून एक कुंपण जाणार.. ह्यात चूक कोणाचीच नाही.. जमीन विकायला काढलेल्या मावश्यांची नाही, त्यांच्या आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित मुलींचीही नाही.. चूक असेल तर माझ्या आप्पांची आहे.. त्यांनी कधी माझं-तुझं केलंच नाही.. त्यामुळे आम्हालाही हा जमिनीचा भाग त्यांचा, हा आपला हे कधी माहीतच नव्हतं..
आप्पा महानगरपालिकेत होते मुंबईला.. शनिवारी सकाळी लवकर निघायचे ते अलिबागला यायला.. त्या काळात रस्तेही इतके चांगले नव्हते.. कधी बसने, कधी बोटीने, कधी कोणाच्या गाडीने आप्पा नियमित यायचे.. त्यांच्या दोन मुली, म्हणजे माझी आई आणि मावशी.. अजूनही तक्रार करतात “आप्पा सुट्टीला घरी नसायचेच..” कारण त्यांना वेध असायचे त्यांच्या थळच्या घराचे.. घर पडायला आलं होतं, झाडं सुकून चालली होतं.. आणि म्हणून आप्पा दर आठवड्याला येत होते त्यांच्या पूर्वजांची ठेव वाचवायला.. ज्या वयात नवर्याकडे नवीन दागिन्यांचा हट्ट करायचा त्या वयात माझ्या आजीने तिच्या पाटल्या ठेवल्या होत्या सावकाराकडे हे घर आणि जमीन वाचवायला.. आप्पांनी खूप कष्ट घेतले ह्या घरासाठी, ह्या झाडांसाठी..
खूप प्रेमानी लावलं असेल त्यांनी हे जांभाचं झाड... का लावलं, कसं लावलं, कधी लावलं माहित नाही मला.. कारण मला कळायला लागलं तेव्हा हे उंच झाड फळांनी बहरून येत होतं.. शाळेत मी आंब्यापेक्षा जांभ किती बेस्ट असतो हे सांगायचे लोकांना.. पांढराशुभ्र जांभ येतो ह्या झाडाला, एकदम गोड फळ... उन्हाळ्यात इतके जांभ येतात कि एखाद फांदी तरी वजनाने मोडून पडते ह्या झाडाची.. पिशव्या भरून जांभ घेऊन जातात आमच्याकडून लोक.. पोपटांचे थवे येतात जांभ खायला.. कधी न पाहिलेले पक्षीही जमतात ह्या झाडावर.. ऐसपैस पसरलेलं झाड आहे.. माजघरातून दिसतं, स्वयपाकघरातून दिसतं.. न्हाणीघरातूनही दिसतं.. लहानपणापासून आम्ही बघतोय हे झाड आणि तेही बघतं आहे आम्हाला आमच्या लहानपणापासून..
माझ्या आईला, मामा-मावश्यांनाही पाहतं आहे हे झाड लहानपणापासून... आमची बार्शी पाहिल्येत ह्या झाडाने, आमचे वाढदिवसही.. मी हात धुवायला जायचे ह्या झाडाखाली.. ह्या झाडाला पाणी मिळावं म्हणून.. कित्येक भातुकलीचे डाव मांडलेत ह्या झाडाखाली.. कित्येक भांडण झाल्येत आणि मिटली आहेत इथेच.. ह्या अंगणात badminton खेळायचो आम्ही.. फुल ह्या झाडात अडकल्यावर, दगडही मारले आहेत आम्ही.. पण झाड कधी चीडलं नाही आमच्यावर.. दरवर्षी हजारो जांभ देतच राहिलं.. दर आठवड्याला जाणारे आम्ही आता महिन्यातून एकदा जातो अलिबागला.. तेव्हा आम्हाला जितका आनंद होतो तितकाच आनंद होत असेल का ह्या झाडाला?? आप्पा गेले त्यावर्षी जांभ किडले हा फक्त योगायोग असतो का?? बाबा खूप विश्वासाने चढतात ह्या झाडावर जांभ उतरवायला.. झाडही तितकाच विश्वास ठेवत असेल का बाबांवर ते दुखवणार नाहीत ह्याचा?? आमची चिंगी मांजर सरसर चढायची ह्या झाडावर, कधीही पाडलं नाही तिला ह्या झाडाने.. पण जेव्हा ती समोरच्या विहरीत पडली तेव्हा ह्या झाडाला वाईट वाटलं असेल का आपल्याला पाय नाहीत त्याचं?? झाडाला पाय असते, झाडाला हलता आलं असतं तर हे कुंपण पडायच्या आधी ते आलं असतं का आमच्या हद्दीत??
बाबा नेहमी सांगतात, आपलं काहीही नसतं.. पूर्वपुण्याईतून आपल्याला जे मिळतं ते आपल्या वंशासाठी आपण सांभाळून आणि जमल्यास वाढवून पुढे पाठवायचं असतं.. आप्पांनी तेच केलं.. त्यांनी केलेल्या कष्टांची फळ आता दुसर्यांचे वंश चाखणार म्हणून काय झालं.. कुंपण घालणार्यांवर, स्वतः कधीही कष्ट न घेतलेली जमीन विकणार्यांवर माझा राग नाही.. फक्त त्यांनी खूप उशीर केला.. आठवणी तयार व्हायच्या आधीच ह्या मातीची किंमत व्हायला हवी होती.. आता हि जमीन कोण विकत घेणारे माहित नाही.. तो हे झाड काढेल, ठेवेल, काय करेल माहित नाही.. काय माहित कदाचित आमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल तो ह्या झाडावर..पण हे झाड मात्र आता त्याचं होणार.. कुंपणाची नजर चुकवत जांभ नक्की पडतील आमच्या भागात.. पण मग त्या जांभावर आता माझ्या-तुझ्या, आपल्या-त्यांच्या खुणा असणार..
रात्री मीपण रडले.. बाजूच्या अंगणासाठी नाही, वाडीसाठी नाही.. जांभाच्या झाडासाठीही नाही... माझ्या मुलांसाठी, माझ्या मावशीच्या नातवंडान्साठी .. त्यांना ह्या जाम्भाची गोडी कधीच कळायची नाही आता..
Subscribe to:
Posts (Atom)