मी त्या सगळ्या मुलांच्या घोळक्यामध्ये बसलेले होते आणि त्या पिल्लांना विचारलं, "14 फेबला काय असतं?" सगळे चिवचिवले( rather कावकावले) , व्हॅलनटाईम्स डे... मी अवाक होऊन बघत बसले, म्हणजे मुलांना हा दिवस माहित्ये म्हणुन नाही..कारण हल्ली शाळेत न जाणा-या मुलांनाही हा ठाऊक असेल... मी अवाक झाले ह्याला कारण म्हणजे १०-१२ वर्षांनंतरही मुलं valentine हा शब्द मी जसा चुकवायचे तसच चुकवतात.. :)
मला खरं तरं ३-४थीतल्या पोरांबरोबर व्हॅलनटाईन डेची activity घ्यायची नव्हती..पण आम्ही बापडे विद्यार्थी, शिक्षकांचं ऐकावं लागतं ना! खास काही करायचं नव्हतं त्यांना एखादी प्रेमाची गोष्ट वाचुन दाखवायची होती आणि मग त्यांच्या "Love" ह्या conceptबद्दल त्यांना विचारायचं होतं... मी चौथीत होते तेव्हा आमच्या वर्गात कोणी "Love" असं म्हंट्लं तरी आम्ही "ईईई...असं काय बोलतोस?" "ए, असं काही बोलायचं नसतं" वगैरे म्हणायचो, मराठी मिडीयम असल्याने Love हे फक्त सिनेमात हिरो-हिरोईन मधे असतं त्यालाच म्हणतात हा आमचा समज होता. पण आत्ताची ही "फोर्थ ग्रेड" मधली मुलं smart आहेत!
मला एक सुंदर पुस्तक मिळालं होतं My friend, the Sea म्हणुन. एका तामिळ मुलाचं समुद्राविषयीचं प्रेम, समुद्राशी त्याची मैत्री... त्सुनामी आधी आणि नंतरचं... इतक्या साध्या, सोप्प्या शब्दातलं Narration पण तरीही वाचुन डोळ्यांत पाणी आलं..जितक्यांदा वेगवेगळ्या वर्गांत वाचुन दाखवलं तितक्या वेळेला माझा गळा जड झाला होता. गोष्ट वाचुन दाखवल्यावर मुलंही भारावलेली होती...त्याच moodमधे त्यांच्याशी प्रेम आणि मैत्रीबद्दल बोलणं बरं होतं... कारण इतर वेळी बोलले असते तर "whom do you love?" विचारल्यावर मुलांनी त्यांच्या GF किंवा crushची नावं सांगितली असती. हो... ३-४थीतल्या पोरांना हे सगळं माहित्ये...त्यांचे crush असतात. आमच्या ह्या कोर्समध्ये मी एकटी मिडीयाची विद्यार्थीनी असल्याने असं काही मुलं म्हणाली की लगेच मी वर्गात मधोमध बसल्ये, आजुबाजुला आमच्या बाई आणि बाकी सगळ्या त्यांच्या students माझ्याकडे बोट दाखवताय्त "तुम्हीच केलंत हे... mediaचा परिणाम" वगैरे म्हणताहेत असं दृश्य फ़िशाय लेन्सनी बघितल्यावर जसं दिसेल तसं डोळ्यासमोर उभं राहातं.
मुलांना मी गोष्ट वाचुन दाखवली आणि मग माझ्या झोळीतुन गुलाबी रंगाचं एक heart shape card बाहेर काढलं... ही तिसरीतली मुलं आणि गुलाबी रंगाचं कार्ड बघुन... "yukk..its pink, its so girly" वगैरे म्हणतात. stereotype इतके दणदणीत भरल्येत ना हया पोरांच्या मनात. मी मुलगी असुन मला कधीच गुलाबी मनापासुन नाही आवडला आणि कायम मला निळा रंगाचं आकर्षण होतं, शाळेत असताना कधी माहितच नव्हतं असं काही असतं ते!
मग म्हंटलं जाऊ दे, गुलाबी नको तर नको.. निदान तुम्हाला Love म्हणजे काय असतं असं वाटतं हे तर सांगा.. आणि मग पोरं जे काय सुटल्येत म्हणुन सांगु... त्यांच्यापैकी काहींची उत्तरं अशी होती:
"Love is sharing." पोरगी smart होती. तिला पेन्सिल हवी होती माझ्याकडुन म्हणुन आधी हे उत्तर दिलं आणि मग लगेच माझ्याकडे पेन्सिल मागितली.
"Love is an abstract noun. You cant actually touch it!" चौथीतली पोरं आत्ताच abstract noun शिकल्येत ग्रामरमध्ये त्यामुळे हे उत्तर मला ४-५ जणांनी दिलं.
"Love is love, no words can define it." हे माझंही उत्तर आहे. rather अनेक प्रश्नांना माझं हेच उत्तर असतं जेव्हा मला त्याबाबतीत विचार करायचा नसतो. हे उत्तर दिलेला एक गुट्टु पो-या माझ्याकडे कायम असाच बघत असतो "काय पकवुन राहिल्ये ही..हिला काय करायचं love..हिला कोणी bf नाही का? आमच्यासोबत V day साजरा करत्ये".
"Love is happyness." मला happyness चं हे spelling खुप cute वाटतं. आणि त्या मुलाच्या शिकाऊ कर्सिव अक्षरात हा शब्द अजुन सुंदर दिसला. pursuit of happyness आठवला.
"Love is the feeling I get when my mom hugs me." विशाल हायपर ऍक्टिव्ह मुलगा आहे त्याच्याकडुन मी ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती केली. पण मी प्रश्न विचारताच तो ताडकन उठत ओरडुन ओरडुन हे म्हणाला. आणि मग त्याला ते उत्तर मी लिहायला लावायच्या आधी दुस-या ग्रुपमध्ये पळुनही गेला.
"Love is playing and laughing with each other. "दोन अगदी जिवाभावाच्या सख्यांनी हे सेम उत्तर लिहीलं होतं, मी विचारलं सारखं उत्तर का? तर एक्मेकींकडे बघुन हसल्या आणि मग म्हणाल्या आम्हाला दोघींना असंच वाटतं.
Love rulez! ( no comments.. bcoz it does :D )
Love is friendship हे उत्तर ऐकुन मला कु.कु.हो.है चा शाहरुख आठवला. हे उत्तर देणारा रोहित सुद्धा तसलाच cute आहे, मस्त खळ्या पडतात त्याला
"Love is spending time with you family." हे उत्तर दिलेलं मुलगी तिच्या आईबाबांबरोबर राहात नाही. मला लहान मुलं अशी emotional झाली की खुप जड जातं. माझे डोळे भरुन आले होते खरं तरं तिचं उत्तर बघुन तेवढ्यात एका पिंटुकल्याने पुढचं उत्तर दिलं...
"Love is the thing people do when they come closer". आणि हे उत्तर सांगताना त्याचे डोळे चमकले. मी त्याला म्हणाले मला नाही कळलं.. तर लगेच म्हणाला like they do in the films... मग माझे डोळे चमकले :) ... माझ्यासारखं आहे कोणितरी ज्याला तिसरीत असताना love चा इतकाच अर्थ माहित्ये.
"Love means giving gifts to your family and friends." हे उत्तर वाचल्यावर मला हुश्श झालं... V day चं इतकं marketing केलं, मुलांमध्ये consumerism भरणा-या advertisersचे थोडेतरी तरी कष्ट कामी आले म्हणायचे!
मी एखादा प्रश्न विचारल्यावर माझ्या आजुबाजुला बसलेल्या सगळ्यांचा गलका, मग मी त्यांचं उत्तर ऐकावं म्हणुन त्यांनी केलेली धडपड, "whom do you love?" विचारल्यावर तिसरीतल्या एका गुंड्याने " I love my mom, dad, my fish, my doggie and you" असं दिलेलं उत्तर... मी गोष्ट सांगितल्यावर काही मुलांचे भरुन आलेले डोळे... एक्मेकांची चिडवाचिडवी... आणि तास संपल्यावर सगळ्यांचा मला "happy valentimes day" wish करायला झालेला गलका! मी त्यांचा शब्द नाही बदलला... मला बदलावासा वाटलाचं नाही. हा गेल्या २२ वर्षांमधला सर्वात मस्त V Day होता माझा!!